राजश्री देशपांडे
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | Rajshri |
| आडनाव | देशपांडे |
| जन्मस्थान | औरंगाबाद शहर |
| व्यवसाय | अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक |
| कार्य कालावधी (प्रारंभ) | 2011 |
राजश्री देशपांडे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. पान नलिन यांच्या अँग्री इंडियन गॉडेसेस या नाटकातील तिच्या अभिनयासाठी तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.[१] त्यानंतर तिने सनल कुमार शशिधरन यांच्या सेक्सी दुर्गा या चित्रपटात मुख्य पात्र साकारले आणि नेटफ्लिक्स मालिका सेक्रेड गेम्समधील तिच्या अभिनयासाठी तिला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. २०२३ मध्ये, देशपांडे यांना ट्रायल बाय फायरमधील तिच्या कामासाठी २०२३ च्या फिल्मफेर ओटीटी पुरस्कारांमध्ये नाटक मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
जीवन
[संपादन]राजश्री देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील एका कामगार कुटुंबात झाला. ती तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिने सिंबायोसिस लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून जाहिरातीत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिने जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले पण लवकरच तिला अभिनयात काम करायला मिळाले. तिने मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमधून चित्रपट निर्मितीमध्ये डिप्लोमा देखील केला आहे.
देशपांडेला 'इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा' अर्थात स्तनाचा कर्करोगाचा पहिल्या टप्प्यातील आजार झाला. ४ मार्च २०२४ रोजी तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत या आजाराशी संबंधित शस्त्रक्रिया झाल्याचे कळवले.[२]
कारकिर्द
[संपादन]देशपांडेने २०१२ मध्ये आमिर खान अभिनीत 'तलाश' चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती २०१३ मध्ये दूरचित्रवाहिनी मालिका 'कुछ तो लोग कहेंगे' आणि '२४: इंडिया' मध्ये दिसली. त्यानंतर ती सलमान खानच्या 'किक' मध्ये एका छोट्या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर परतली. २०१५ मध्ये ती 'हराम'[१] या मल्याळम चित्रपटातही दिसली, ज्यात तिची दुहेरी भूमिका होती. हिंदी चित्रपटसृष्टीत, पान नलिनच्या 'अँग्री इंडियन गॉडेसेस' मधील लक्ष्मीच्या भूमिकेने तिला एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले. या चित्रपटाला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिला रनर अप - पीपल्स चॉईस पुरस्कार मिळाला.[३] आणि रोम चित्रपट महोत्सवात पीपल्स चॉईस पुरस्कार मिळाला.[४] देशपांडे ने २०१७ मध्ये सनल कुमार शशिधरन यांच्या 'सेक्सी दुर्गा' चित्रपटात प्रमुख भूमिका[५] साकारली होती. या चित्रपटाने रॉटरडॅम चित्रपट महोत्सवात टायगर पुरस्कार जिंकला होता.[६]
देशपांडेने जानेवारी २०१८ मध्ये जेम्स वॉटकिन्स दिग्दर्शित बीबीसी वनच्या 'मॅकमाफिया' या मालिकेतून डिजिटल पदार्पण केले. अनुराग कश्यप दिग्दर्शित नेटफ्लिक्स शो 'सेक्रेड गेम्समध्ये' देखील ती दिसली होती.[१][३] त्यामध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नी सुभद्राची भूमिका साकारली व ह्या भूमिकेबद्दल तिचे कौतुक झाले होते.[७] काही प्रेक्षकांनी तिच्यावर पॉर्न स्टार असल्याचा आरोप केला तेव्हा एक वाद निर्माण झाला, कारण या मालिकेत एक नग्न लैंगिक दृश्य होते. अभिनेत्रीने उत्तर दिले की तिने काहीही चुकीचे केले नाही.[७] २०१८ मध्ये तिने नंदिता दासच्या 'मंटो' या चित्रपटात इस्मत चुगताईची भूमिका साकारली होती.[४]
२०२५ मध्ये, देशपांडेला 'सत्यशोधक' मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मराठीसाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार मिळाला.[१]
अभिनय सूची
[संपादन]चित्रपट
[संपादन]| वर्ष | चित्रपट | भूमिका | भाषा | नोंदी | संदर्भ |
|---|---|---|---|---|---|
| २०१२ | तलाश | प्रिया | हिंदी | ||
| २०१४ | किक | मिसेस शर्मा | |||
| २०२५ | हराम | अमीना | मल्याळम | ||
| अँग्री इंडियन गॉडेसेस | लक्ष्मी | हिंदी | |||
| २०१६ | एली एली लामा सबचथानी | गंगा | मराठी हिंदी इंग्लिश |
तीन भाषेत | [८] |
| मुंबई सेंट्रल | गौरी | हिंदी | |||
| २०१७ | सेक्सी दुर्गा | दुर्गा | मल्याळम | ||
| मॉम | डी के ची पत्नी | हिंदी | |||
| २०१८ | मंटो | इस्मत चुगताई | हिंदी उर्दू |
दोन भाषेत | [९] |
| २०१९ | निर्वाणा इन | मोहिनी | हिंदी | ||
| द स्काय इज पिंक | अनिता टंडन | ||||
| कनपुरीये | कोहिनूर | [१०] | |||
| २०२० | चोक्ड | नीता | |||
| २०२१ | कॉलर बॉम्ब | रिटा | [११] | ||
| २०२२ | मन कस्तुरी रे | वकील | मराठी | ||
| २०२३ | जोरम | मुक्ता | हिंदी | ||
| २०२४ | सत्यशोधक | सावित्रीबाई फुले | मराठी | ||
| छोटे नवाब | असगरी | हिंदी | |||
| २०२५ | ठग लाइफ | कनिका | तमिळ | पाहुणे कलाकार |
मालिका
[संपादन]| वर्ष | मालिका | भूमिका | नोंदी | संदर्भ |
|---|---|---|---|---|
| २०१२-१३ | कुछ तो लोग कहेंगे | सुहासिनी | ||
| २०१३ | २४ | एजंट वीणा | ||
| २०१८ | मॅक माफिया | . मंजू | ब्रिटिश मालिका | |
| सॅक्रेड गेम्स | सुभद्रा | नेटफ्लिक्स | ||
| २०१९ | परछाई | वैशाली | झी फाइव्ह | |
| २०२२ | द फ्रेम गेम | शोभा त्रिवेदी | नेटफ्लिक्स | |
| २०२३ | ट्रायल बाय फायर | नीलम कृष्णमूर्ती | नेटफ्लिक्स | [१२] |
| २०२५ | ब्लॅक वॉरंट | . प्रतिभा सेन | नेटफ्लिक्स | |
| रंगीन | नैना जोशी | अँमेझॉन प्राईम |
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 "नवाजुद्दीन सिद्दीकी संग एक्ट्रेस ने दिया इंटीमेट सीन, हुआ पछतावा, बोलीं- 'फिर सेक्स तो...'". Jansatta (हिंदी भाषेत). 30 December 2023. 4 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 February 2024 रोजी पाहिले.
- ↑ "४३ वर्षीय अभिनेत्री राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, करण्यात आली सर्जरी, म्हणाली- "आजार लवकर लक्षात आला पण..."". दैनिक लोकमत. ४ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- 1 2 "'Angry Indian Goddesses' wins runner-up award at TIFF". The Indian Express. 21 September 2015. 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2018 रोजी पाहिले.
- 1 2 "Rome Film Fest: 'Angry Indian Goddesses' Wins People's Choice Award". The Hollywood Reporter (इंग्रजी भाषेत). 1 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Rajshri Deshpande in a Malayalam erotic satire". The Times of India. 29 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Sasidharan's Sexy Durga wins a coveted award at Rotterdam Film Festival". Hindustan Times. 6 February 2017. 4 October 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 January 2018 रोजी पाहिले.
- 1 2 "India Netflix actor Rajshri Deshpande 'disgusted by porn star label'". BBC News. 19 July 2018. 20 July 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 July 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Rajshri back to Mollywood". The Times of India. Kochi, India. 3 October 2015. 20 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 June 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Manto biopic: Rajshri Deshpande eager to enter the world of Nawazuddin Siddiqui". Hindustan Times. 23 March 2017. 26 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 June 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Aparshakti relives days of struggle with Kanpuriye". Outlook India. 23 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 October 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Jimmy Sheirgill's crime thriller film Collar Bomb to premiere on Disney + Hotstar in July". Outlook India. 25 June 2021. 25 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2021 रोजी पाहिले.
- ↑ Kumar, Anuj (14 January 2023). "'Trial by Fire' Netflix series review: Anatomy of a man-made disaster". The Hindu. 16 January 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2023 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील राजश्री देशपांडे चे पान (इंग्लिश मजकूर)