राजपुताना



राजपुताना तथा राजपूतांची भूमी, [१] हा भारतीय उपखंडातील एक प्रदेश होता. यात प्रामुख्याने सध्याचे राजस्थान राज्य तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात या शेजारील राज्यांचे काही भाग [१] आणि दक्षिण पाकिस्तानच्या सिंध प्रांताचा लगतचा भाग समाविष्ट होता. [२]
मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला अरवली टेकड्यांच्या पश्चिमेकडील मुख्य वसाहतींना राजपुताना म्हणून ओळखले जाऊ लागले. [३] ईस्ट इंडिया कंपनीने सध्याच्या राजस्थानच्या प्रदेशात असलेल्या त्यांच्या मांडलिक राज्यांसाठी राजपुताना एजन्सी म्हणून नाव दिले. [४] राजपुताना एजन्सीमध्ये २६ राजपूत आणि २ जाट संस्थाने आणि दोन सरदारकींचा समावेश होता. १९४९मध्ये याचे नाव राजस्थान असे केले गेले. [४]
१८०० मध्ये जॉर्ज थॉमस या ब्रिटिश सैनिकाने या प्रदेशाला आपल्या मिलिटरी मेमरीज या लेखात राजपुताना एजन्सी असे संबोधले. [५] इतिहासकार जॉन की यांनी त्यांच्या " इंडिया: अ हिस्ट्री" या पुस्तकात म्हटले आहे की राजपुताना हे नाव ब्रिटिशांनीच तयार केले होते. १८२९ मध्ये फेरिश्ताच्या इस्लामिक भारताच्या सुरुवातीच्या इतिहासाच्या भाषांतरात जॉन ब्रिग्जने हा उल्लेख घेतलेला दिसतो.
राजपुतानाचे क्षेत्रफळ अंदाजे ३४३,३२८ चौरस किमी (१३२,५५९ चौरस मैल) आहे आणि ते दोन भौगोलिक विभागांमध्ये मोडते:
- अरावली पर्वतरांगांच्या वायव्येस असलेला एक प्रदेश ज्यामध्ये थर वाळवंटाचा काही भाग समाविष्ट आहे. हा प्रदेश वाळूने व्यापलेला असून ओसाड आहे.
- पर्वतरांगाच्या आग्नेयेस असलेले सुपीक पठार.

राजपुताना प्रदेशात २३ राज्ये, एक सरदारकी, एक जहागीर आणि अजमेर-मेवाडचा ब्रिटिश जिल्हा होता. येथील बहुतेक राज्यकर्ते राजपूत होते. यांनी सातव्या शतकापासून हे येथे राज्य करू लागले. जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर ही येथील सर्वात मोठी राज्ये होती. १९४७ मध्ये, ही राज्ये अनेक टप्प्यांत भारतात विलीन होउन राजस्थान राज्य अस्तित्वात आले. आग्नेय राजपुतानातील काही जुने भाग आता मध्य प्रदेशचा भाग आहेत आणि नैऋत्येकडील काही भाग आता गुजरातचा भाग आहेत.
नोंदी
[संपादन]- ^ a b "Rajputana". Encyclopædia Britannica.
- ^ "Rajput". Encyclopædia Britannica.
- ^ Bose, Manilal (1998). Social Cultural History of Ancient India. Concept Publishing Company. p. 27. ISBN 978-81-702-2598-0.
- ^ a b R.K. Gupta; S.R. Bakshi (1 January 2008). Studies In Indian History: Rajasthan Through The Ages The Heritage Of Rajputana (Set Of 5 Vols.). Sarup & Sons. pp. 143–. ISBN 978-81-7625-841-8. 30 October 2012 रोजी पाहिले.
- ^ F. K. Kapil (1999). Rajputana states, 1817-1950. Book Treasure. p. 1. 24 June 2011 रोजी पाहिले.
संदर्भ
[संपादन]- लो, सर फ्रान्सिस (संपादक) द इंडियन इयर बुक अँड हूज हू १९४५-४६, द टाइम्स ऑफ इंडिया प्रेस, मुंबई.
- शर्मा, निधी सरंजामशाहीतून लोकशाहीकडे संक्रमण, आलेख पब्लिशर्स, जयपूर, 2000 .