राजकुमारी ॲन
daughter of Queen Elizabeth II and Prince Philip, Duke of Edinburgh | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Anne Elizabeth Alice Louise | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट १५, इ.स. १९५० Clarence House (लंडन) Princess Anne Elizabeth Alice Louise of Edinburgh | ||
नागरिकत्व | |||
कोणत्या देशामार्फत खेळला | |||
निवासस्थान |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
सदस्यता |
| ||
पद |
| ||
मातृभाषा |
| ||
उत्कृष्ट पदवी |
| ||
कुटुंब |
| ||
वडील | |||
आई | |||
भावंडे |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
राजकुमारी ॲन किंवा ॲन, प्रिन्सेस रॉयल (ॲनी एलिझाबेथ ॲलिस लुईस; जन्म १५ ऑगस्ट १९५०) ही ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य आहे. ती राणी एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची दुसरी मुलगी आणि एकुलती एक मुलगी आहे. ती राजा चार्ल्स तिसऱ्याची एकुलती एक बहीण आहे. ॲनचा जन्माच्या वेळी ब्रिटिश सिंहासनाच्या वारसाहक्कात तिसरा क्रमांक होता आणि आता ती १७ वी आहे.[१] १९८७ पासून ती "प्रिन्सेस रॉयल" अशी ओळखली जाते.[२][३][४]
क्लेरेन्स हाऊस येथे जन्मलेल्या ॲनचे शिक्षण बेनेन्डेन स्कूलमध्ये झाले आणि प्रौढत्वात आल्यावर तिने शाही कर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात केली. १९७१ मध्ये एक सुवर्ण पदक आणि १९७५ मध्ये युरोपियन इव्हेंटिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य पदके जिंकून ती एक प्रतिष्ठित अश्वारूढ बनली.[५] १९७६ मध्ये, ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेणारी ती ब्रिटिश राजघराण्यातील पहिली सदस्य बनली. १९८८ मध्ये ती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची सदस्य झाली.[६]
ॲन राजाच्या वतीने अधिकृत कर्तव्ये पार पाडते.[७] ती रायडर्स फॉर हेल्थ आणि केअरर्स ट्रस्टसह ३०० हून अधिक संस्थांच्या संरक्षक किंवा अध्यक्षा आहे. विकसनशील देशांमधील क्रीडा, विज्ञान, अपंग लोक आणि आरोग्य यावरील धर्मादाय केंद्रांमध्ये तिचे कार्य चालते. ती सेव्ह द चिल्ड्रेनशी पन्नास वर्षांहून अधिक काळ निगडीत आहे आणि तिच्या अनेक प्रकल्पांना भेट दिली आहे.[७]
ॲनने १९७३ मध्ये कॅप्टन मार्क फिलिप्सशी लग्न केले; १९८९ मध्ये ते वेगळे झाले आणि १९९२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुले आहेत, पीटर फिलिप्स आणि झारा टिंडल आणि पाच नातवंडे. १९९२ मध्ये तिच्या घटस्फोटाच्या काही महिन्यांतच, ॲनने कमांडर (नंतरचे व्हाईस ॲडमिरल) सर टिमोथी लॉरेन्स यांच्याशी लग्न केले.
विवाह आणि आपत्ये
[संपादन]१९६९ मध्ये घोडेप्रेमींसाठी एका पार्टीत ॲनची भेट मार्क फिलिप्स या पहिल्या क्वीन्स ड्रॅनून गार्ड्समधील लेफ्टनंटशी झाली.[८] २९ मे १९७३ रोजी त्यांच्या विवाहाची घोषणा झाली.[९][१०] १४ नोव्हेंबर १९७३ रोजी, या जोडप्याने वेस्टमिन्स्टर अॅबी येथे समारंभात लग्न केले. टेलिव्हिजनवर दाखवलेल्या ह्या समारंभाचे अंदाजे १०० दशलक्ष प्रेक्षक होते.[११] त्यानंतर त्यांनी गॅटकॉम्बे पार्क येथे वास्तव्य केले. फिलिप्सला अर्ल बनवण्याचा प्रस्ताव करण्यात आला, जो त्याने नाकारला. परिणामी त्यांची मुले उपाधीविना जन्माला आली.[१२] ॲन आणि तिच्या पतीची दोन मुले होती: पीटर (जन्म १९७७) आणि झारा फिलिप्स (जन्म १९८१). ॲन आणि फिलिप्स यांना पाच नातवंडे आहेत.[१३] ३१ ऑगस्ट १९८९ रोजी, ॲन आणि फिलिप्स यांनी वेगळे होण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला.[८][१४][१५] या जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी क्वचितच एकत्र पाहिले गेले होते आणि दोघेही इतर लोकांशी प्रेमाने जोडलेले होते. त्यांनी त्यांच्या मुलांचा ताबा सामायिक केला आणि सुरुवातीला जाहीर केले की "घटस्फोटाची कोणतीही योजना नाही."[१६][१७] १३ एप्रिल १९९२ रोजी पॅलेसने घोषणा केली की ॲनने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, ज्याला दहा दिवसांनंतर अंतिम रूप देण्यात आले.[१८][१९]
रॉयल नौदलातील कमांडर टिमोथी लॉरेन्सला ॲन भेटले जेव्हा ते रॉयल यॉट ब्रिटानियावर सेवा करत होते.[२०] १९८९ च्या सुरुवातीस, लॉरेन्सची राणीसाठी नियुक्ती झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांचे संबंध विकसित झाले. १९८९ मध्ये, लॉरेन्स व ॲन यांच्या खाजगी पत्रांची देवणघेवण द सन वृत्तपत्राने उघड केले. या जोडप्याने १२ डिसेंबर १९९२ रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसलजवळ क्रॅथी कर्क येथे विवाह केला.[२१] ह्या खाजगी विवाह समारोहात सुमारे ३० पाहुण्यांना आमंत्रित केले होते.[२२] त्यावेळच्या चर्च ऑफ इंग्लंडच्या विपरीत, चर्च ऑफ स्कॉटलंडने विवाह हा संस्कार न मानता धर्माचा अध्यादेश मानत असे आणि काही विशिष्ट परिस्थितीत घटस्फोटित व्यक्तींच्या पुनर्विवाहाला परवानगी देत असे.[२३]
अपहरणाचा प्रयत्न
[संपादन]२० मार्च १९७४ रोजी, प्रिन्सेस ॲन आणि मार्क फिलिप्स एका धर्मादाय कार्यक्रमातून बकिंगहॅम पॅलेसमध्ये परतत असताना एका फोर्ड एस्कॉर्टने त्यांच्या कारला थांबण्यास भाग पाडले. एस्कॉर्टचा ड्रायव्हर इयान बॉल याने बाहेर उडी मारली आणि पिस्तुलाने गोळीबार करण्यास सुरुवात केली. इन्स्पेक्टर जेम्स बीटन, ॲनचे वैयक्तिक पोलीस अधिकारी, तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बॉलला निःशस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कारमधून बाहेर पडले. बीटनचे बंदुक जाम झाले आणि त्याला बॉलने गोळी घातली[२४]. जवळ असलेले पत्रकार ब्रायन मॅककॉनेलने देखील हस्तक्षेप केला आणि त्याच्या छातीत गोळी लागली.[२५] बॉल ॲनच्या कारजवळ आला आणि तिला सांगितले की तिचे अपहरण करून तिला खंडणीसाठी रोखून धरण्याचा त्याचा इरादा आहे. बॉलने ॲनीला कारमधून बाहेर पडण्यास सांगितले.[२६]
अखेरीस, ॲन लिमोझिनच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडली, सोबत तिची लेडी-इन-वेटिंग, रोवेना ब्रॅसी होती. पदचारी रॉन रसेल नावाच्या माजी बॉक्सरने बॉलला ठोसा मारला आणि ॲनला घटनास्थळापासून दूर नेले. त्या वेळी, पोलिस कॉन्स्टेबल मायकल हिल्स घटनास्थळी आले; त्यालाही बॉलने गोळी मारली होती, पण त्याने आधीच इतर पोलिसांना बोलावले होता.[२७] डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल पीटर एडमंड्सने पाठलाग केला आणि शेवटी बॉलला अटक केली. वेगवेगळ्या स्रोतांनी सांगीतले की बॉल २ ते ३ दशलक्ष पाउंडची रक्कम मागून ती राष्ट्रीय आरोग्य सेवेला देण्याचा हेतूने हे अपहरण करत होता [२८] बॉलने खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचा गुन्हा कबूल केला. सप्टेंबर २०२२ मध्ये ब्रॉडमूर हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्य कायद्याखाली त्याला अजूनही ताब्यात ठेवण्यात आले होते व त्याला छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनियाचे) निदान झाले होते.[२९]
संदर्भ
[संपादन]- ^ Winsor, Morgan (8 September 2022). "Queen Elizabeth dies at 96: How the British royal line of succession changes". abcnews.go.com. ABC. 8 September 2022 रोजी पाहिले.
- ^ "Supplement to the London Gazette of Friday, 12th June 1987". London Gazette (50947). 13 June 1987.
- ^ "Princess Anne's colourful royal career". BBC. 21 November 2002. 13 February 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 November 2017 रोजी पाहिले.
- ^ Reslen, Eileen (12 August 2018). "Why Princess Charlotte Won't Automatically Inherit the Title of Princess Royal". 29 August 2023 रोजी पाहिले.
- ^ "Senior European Championship Results". British Eventing Governing Body. 11 December 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 September 2012 रोजी पाहिले.
- ^ Llewely, Abbie (29 September 2020). "Boris Johnson's frank assessment of Princess Anne exposed". Express. 7 October 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "The Princess Royal". The Royal Family. 17 September 2022.
- ^ a b Longworth, R. C. (1 September 1989). "Princess Anne To Separate From Husband". Chicago Tribune. 14 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Princess Anne's wedding". BBC News. 5 June 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Iconic weddings: Princess Anne and Mark Phillips". Hello!. 27 July 2011. 15 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Princess Anne's Marriage – Events of 1973". UPI.com. 1973. 12 February 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "1977: Princess Anne gives birth to Master Phillips". BBC News.
- ^ "The Princess Royal". royal.uk. 2 October 2015. 14 July 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "But No Divorce Is Planned : Princess Anne, Husband Split". Los Angeles Times. 31 August 1989. 19 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Kaufman, Joanne; Cooper, Jonathan (24 April 1989). "A Crisis Rocks a Royal Marriage". People. 7 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "1989: Royal couple to separate". BBC. 31 August 1989. 20 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Rule, Sheila (1 September 1989). "Princess Anne and Husband Agree to Separate". The New York Times. 15 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Princess Anne's Divorce Final". Deseret News. 23 April 1992. 12 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Brozan, Nadine (24 April 1992). "Chronicle". The New York Times.
- ^ "In Quiet Scottish Ceremony, Anne Marries Naval Officer". The New York Times. 13 December 1992. 14 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "1992: Princess Royal remarries". BBC. 16 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Tuohy, William (13 December 1992). "Britain's Princess Anne Remarries : Wedding: Scottish ceremony brings a tiny bit of joy to a year that saw more than one royal marriage fail". Los Angeles Times. 19 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Worship on the Web" (PDF). Church of Scotland. 4 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 1 April 2013 रोजी पाहिले.
- ^ "On This Day > 20 March > 1974: Kidnap attempt on Princess Anne". BBC. 20 March 1974. 17 December 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2008 रोजी पाहिले.
- ^ Roy Greenslade (17 July 2004). "Obituary: Brian McConnell". The Guardian. UK. 5 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2011 रोजी पाहिले.
- ^ Agence France-Presse (2 January 2005). "Kidnap the Princess? Not bloody likely!". The Age. 25 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Royal Rewind – kidnap attempt on Princess Anne". The Crown Chronicles (इंग्रजी भाषेत). 20 March 2017. 12 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 February 2018 रोजी पाहिले.
- ^ "Princess foiled 1974 kidnap plot". BBC. 1 January 2005. 3 January 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2008 रोजी पाहिले.
- ^ Easton, Kaitlin (12 September 2022). "Iconic moment Queen's daughter Princess Anne snapped back at crazed gunman". Daily Record.