Jump to content

राऊल हिमेनेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राऊल हिमेनेझ
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वमेक्सिको संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलामेक्सिको संपादन
दिलेले नावRaúl, Alonso संपादन
आडनावJiménez संपादन
Second family name in Spanish nameरॉद्रिगेझ संपादन
जन्म तारीख५ मे 1991 संपादन
जन्मस्थानTepeji del Río de Ocampo Municipality संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्पॅनिश भाषा संपादन
व्यवसायassociation football player संपादन
Position played on team / specialityफॉरवर्ड संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2011 संपादन
खेळ-संघाचा सदस्यWolverhampton Wanderers F.C. संपादन
खेळफुटबॉल संपादन

राऊल अलोन्सो हिमेनेझ रॉद्रिगेझ तथा राऊल हिमेनेझ (५ मे, १९९१:तेपेही देल रियो, मेक्सिको - ) हा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कडून आंतरराष्ट्रीय आणि व्हॉल्व्हरहॅम्प्टन वाँडरर्स कडून क्लब फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सहसा आक्रमक फळीतून खेळतो. त्याचे वडील व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते आणि त्याचे कुटुंब मेक्सिकोमधील हिदाल्गो प्रांतातील होते. हिमेनेझने क्लब अमेरिका या स्थानिक क्लबच्या युवा अकादमीमध्ये फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्याने वरिष्ठ प्रथम श्रेणी संघात पदार्पण केले.[]

क्लब अमेरिकानंतर २०१४ मध्ये तो स्पेनच्या अॅटलेटिको माद्रिद क्लबमध्ये सामील झाला. तेथे एक हंगाम खेळल्यानंतर तो पोर्तुगालच्या बेनफिका क्लबमध्ये गेला. बेनफिकासाठी त्याने १२० सामन्यांत ३१ गोल केले आणि सलग दोन लीग विजेतेपदे जिंकली. २०१८ मध्ये त्याला इंग्लंडच्या व्हॉल्व्हरहॅम्प्टन वाँडरर्स क्लबमध्ये तात्पुरता पाठवण्यात आले. नंतर वाँडरर्सने त्याला कायमस्वरूपी संघात घेतले. २०२३ मध्ये हिमेनेझने फुलहॅम क्लबमध्ये प्रवेश केला. तेथे तो प्रीमियर लीगमधील सर्वाधिक गोल करणारा मेक्सिकन खेळाडू झाला. फुलहॅममधील करार संपल्यानंतर, जुलै २०२६ मध्ये तो पुन्हा एकदा व्हॉल्व्हरहॅम्प्टन वँडरर्स संघात परतला.[]

वाँडरर्ससाठी २०२२मध्ये खेळत असताना हिमेनेझ

आंतरराष्ट्रीय स्तरावर हिमेनेझ २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेक्सिकोच्या २३ वर्षांखालील संघाचा भाग होता. तो २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ च्या फिफा विश्वचषकात मेक्सिकोतर्फे खेळला. २०२६ च्या विश्वचषकात उपउपांत्य फेरीत (राउंड ऑफ १६) इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने पेनल्टीवर गोल केला. परंतु मेक्सिकोचा २-३ असा पराभव झाला.[] मेक्सिकोच्या राष्ट्रीय संघासाठी तो ४७ गोलसह सर्वकालीन सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.[]

कारकीर्द

[संपादन]
२०२५मध्ये हिमेनेझ

आंतरराष्ट्रीय

[संपादन]
राष्ट्रीय संघवर्षसामनेगोल
मेक्सिको २०१३२१
२०१४
२०१५१४
२०१६
२०१७१२
२०१८१३
२०१९१२
२०२०
२०२१
२०२२१०
२०२३
२०२४
२०२५
२०२६
कुठेही एकूण१२८४७

क्लब

[संपादन]
क्लबहंगामलीगराष्ट्रीय कपलीग कपयुरोपीय स्पर्धाइतरएकूण
विभागसामनेगोलसामनेगोलसामनेगोलसामनेगोलसामनेगोलसामनेगोल
क्लब अमेरिका२०११–१२लिगा एमएक्स[]१८१८
२०११–१२लिगा एमएक्स१८१८
२०१२–१३लिगा एमएक्स३९१४४४१४
२०१३–१४लिगा एमएक्स३५१६३९१९
२०१४–१५लिगा एमएक्स
एकूण९६३६१०५३९
अॅटलेटिको माद्रिद२०१४–१५ला लीगा[]२१२८
एकूण२१२८
बेनफिका२०१५–१६प्रिमेइरा लिगा[]२८४०
२०१६–१७प्रिमेइरा लिगा१९३११२
२०१७–१८प्रिमेइरा लिगा३३४३
एकूण८०१८१५११४३१
व्हॉल्व्हरहॅम्प्टन वँडरर्स२०१८–१९प्रीमियर लीग[]३८१३४५१७
२०१९–२०प्रीमियर लीग३८१७१५१०५५२७
२०२०–२१प्रीमियर लीग१०११
२०२१–२२प्रीमियर लीग३४३६
२०२२–२३प्रीमियर लीग१५२०
एकूण१३५४६१११५१०१६७६३
फुलहॅम२०२३–२४प्रीमियर लीग[]२४२९
२०२४–२५प्रीमियर लीग३८१२४३१४
२०२५–२६प्रीमियर लीग३६४२१०
एकूण९८२८११४३१
कारकीर्द एकूण४३०१२९३८१०२३३३१३५२८१६२

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Raúl Jiménez biography". MLSsoccer.com (इंग्रजी भाषेत). २०२६-०७-०८ रोजी पाहिले.
  2. "Raúl Jiménez profile and transfer history". Transfermarkt (इंग्रजी भाषेत). २०२६-०७-०८ रोजी पाहिले.
  3. "Inglaterra derrota a México en un vibrante partido de Octavos de Final". El Universal (स्पॅनिश भाषेत). २०२६-०७-०५. २०२६-०७-०८ रोजी पाहिले.
  4. "Raúl Jiménez - stats, career and market value". FotMob (स्पॅनिश भाषेत). २०२६-०७-०८ रोजी पाहिले.
  5. 1 2 3 4 5 "Raúl Jiménez - stats, career and market value". FotMob (स्पॅनिश भाषेत). २०२६-०७-०८ रोजी पाहिले.