Jump to content

रहना है तेरे दिल में

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
র‍্যাহনা হ্যায় তেরে দিল মেঁ (bn); Rehna Hai Tere Dil Mein (id); रहना है तेरे दिल में (mr); रहना है तेरे दिल में (hi); రెహానా హాయ్ తీరే దిల్ మెయిన్ (te); Rehnaa Hai Terre Dil Mein (de); Rehnaa Hai Terre Dil Mein (en); می‌خواهم در قلب شما باشم (fa); Rehnaa Hai Terre Dil Mein (cy); रहना है तेरे दिल में (सन् २००१या संकिपा) (new) película de 2001 dirigida por Gautham Menon (es); ২০০১ সালে মুক্তিপ্রাপ্ত হিন্দি ভাষার চলচ্চিত্র (bn); film sorti en 2001 (fr); હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર (gu); 2001. aasta film, lavastanud Gautham Menon (et); película de 2001 dirixida por Gautham Menon (ast); pel·lícula de 2001 dirigida per Gautham Menon (ca); 2001 film by Gautham Menon (en); Film von Gautham Menon (2001) (de); ୨୦୦୧ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର (or); 2001 film by Gautham Menon (en); film út 2001 fan Gautham Menon (fy); film din 2001 regizat de Gautham Menon (ro); cinta de 2001 dirichita por Gautham Menon (an); pinicla de 2001 dirigía por Gautham Menon (ext); film India oleh Gautham Menon (id); film från 2001 regisserad av Gautham Menon (sv); filme de 2001 dirigit per Gautham Menon (oc); фільм 2001 року (uk); film uit 2001 van Gautham Menon (nl); film del 2001 diretto da Gautham Menon (it); 2001 की गौतम मेनन की फ़िल्म (hi); ᱒᱐᱐᱑ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ (sat); סרט משנת 2001 (he); filme de 2001 dirixido por Gautham Menon (gl); فيلم أنتج عام 2001 (ar); ffilm trac sain gan Gautham Menon a gyhoeddwyd yn 2001 (cy); filme de 2001 dirigido por Gautham Menon (pt)
रहना है तेरे दिल में 
2001 film by Gautham Menon
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
Performer
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २००१
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

रहना है तेरे दिल में (ज्याला RHTDM या नावानेही ओळखले जाते), हा २००१ चा गौतम मेनन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात आर. माधवन, सैफ अली खान आणि दिया मिर्झा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट दिग्दर्शकाच्या स्वतःच्या तमिळ चित्रपट मिन्नाले (त्याच वर्षी प्रदर्शित झालेला) चा रिमेक आहे, ज्यामध्ये माधवननेही त्याचीच भूमिका साकारली होती. हा दिया मिर्झाचा पहिला चित्रपट आहे तसेच तमिळ अभिनेता, माधवनचा अधिकृत बॉलीवूड पदार्पण चित्रपट आहे. त्याने आधी इस रात की सुबह नही चित्रपटामधील "चुप तुम राहो" गाण्यात अप्रमाणित भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट माधव "मॅडी" शास्त्री (माधवन) आणि रीना मल्होत्रा (मिर्झा) यांच्या प्रेमकथेभोवती फिरतो. रीना ही राजीव "सॅम" समरा (खान) सोबत लग्न करणार आहे, जो अमेरिकेत स्थायिक झालेला एक तरुण आहे आणि मॅडीचा माजी कॉलेज प्रतिस्पर्धी आहे. जरी चित्रपट प्रदर्शित होताना बॉक्स ऑफिसवर चांगला कामगिरी करू शकला नाही, परंतु टीव्हीवर पुन्हा दाखवल्यामुळे लोकप्रियता मिळाली आणि त्याला एक कल्ट दर्जा मिळाला आहे.[][]

हा चित्रपट ३० ऑगस्ट २०२४ रोजी पुन्हा प्रदर्शित झाला, त्याने ₹३.५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि इतिहासातील १६ व्या क्रमांकावर सर्वाधिक कमाई करणारा पुन्हा प्रदर्शित झालेला भारतीय चित्रपट ठरला.[]

संगीत

[संपादन]

चित्रपटाचे संगीत हॅरिस जयराज यांनी संगीतबद्ध केले होते, तर समीर यांनी गीते लिहिली होती. "दिल को तुमसे" या गाण्याचे सूर नंतर हॅरिसने काखा काखा (२००३) या तमिळ चित्रपटात "ओंद्रा रेंदा" म्हणून पुन्हा वापरले.

सर्व गीतांचे गीतकार आणि संगीतकार आहे समीर

गाणे[][]
क्र. शीर्षकसंगीतकारगायक अवधी
१. "रेहना है तेरे दिल में"  हॅरिस जयराजसोनू निगम, कविता कृष्णमूर्ती 5:07
२. "ओह मामा मामा"  हॅरिस जयराजसोनू निगम 4:35
३. "कैसे मैं कहू तुझसे"  हॅरिस जयराजसोनू निगम 1:04
४. "झरा झरा"  हॅरिस जयराजबॉम्बे जयश्री 4:58
५. "बोलो बोलो"  हॅरिस जयराजशान 5:55
६. "दिल को तुमसे पुआर हुआ"  हॅरिस जयराजरूप कुमार राठोड 5:31
७. "सच कह रहा है"  हॅरिस जयराजके.के. 5:28
८. "चुराया चुराया (आया रे आया कोई आया रे)"  विशाल-शेखरबाबुल सुप्रियो, प्रीती आणि पिंकी 3:50
९. "ना सोने के बंगले में" (चित्रपटात नाही.)आदेश श्रीवास्तवके.के., अनुराधा श्रीराम 6:28
१०. "तुझे देखा जबसे जाना दिवाना" (चित्रपटात नाही.)आनंद राज आनंदशान, सुनिधी चौहान 5:23
११. "सोहनी सोहनी" (चित्रपटात नाही.)आदेश श्रीवास्तवसुखविंदर सिंग, वसुंधरा दास 5:39
१२. "झरा झरा (क्लब मिक्स)" (चित्रपटात नाही.)हॅरिस जयराजडिजे साहिल, बॉम्बे जयश्री 3:07
एकूण अवधी:
57:05

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "How 'Rehnaa Hai terre dil mein' became cult classic despite having toxic obsession elements". jagrantv (इंग्रजी भाषेत). 2024-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ "'Gangs of Wasseypur' to 'RHTDM': List of cult classic re-releasing on August 30". Editorji (इंग्रजी भाषेत). 2024-08-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Rockstar to Laila Majnu: PVR INOX bets on re-releases to bring people back to theatres". CNBCTV18 (इंग्रजी भाषेत). 2024-09-19. 2025-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ "Rehnaa Hai Terre Dil Mein – All Songs – Download or Listen Free – Saavn". 19 October 2001. 3 November 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Zara Zara - Club Mix (Full Song) - DJ Sahil AiM, Bombay Jayashri - Download or Listen Free - JioSaavn". 16 July 2024. 9 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 December 2024 रोजी पाहिले.