रश अवर (१९९८ चित्रपट)
१९९८मध्ये प्रदर्शित इंग्लिश चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | लॉस एंजेलस पोलिस विभाग, International police cooperation | ||
याचे नावाने नामकरण |
| ||
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
Performer |
| ||
वितरण |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
मालिका |
| ||
कालावधी |
| ||
मूल्य |
| ||
| |||
![]() |
रश अवर हा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला नाट्यमय विनोदी चित्रपट आहे. यात जॅकी चॅन आणि क्रिस टकर यांची पात्रे एकमेकांशी अगदी विरोधाभासी असून ते चिनी राजदूताच्या अपहरण झालेल्या मुलीला वाचवतात. टॉम विल्किन्सन, क्रिस पेन आणि एलिझाबेथ पेन्या यांनीही या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.
या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याने २४ कोटी डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. जगभरात मिळालेल्या व्यावसायिक यशानंतर रश अवर २ (२००१) आणि रश अवर ३ (२००७) हे त्याचे पुढील भागही तयार केले गेले.
सांस्कृतिक प्रभाव
[संपादन]रॉटन टोमॅटोज या चित्रपटांच्या पुनरावलोकनांचे एकत्रीकरण करणाऱ्या संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी रश अवर हा चित्रपट कारणीभूत समजला जातो. या संकेतस्थळाचे संस्थापक सेन डुओंग हे जॅकी चॅनचे चाहते आहेत. चॅनच्या हाँगकाँगमधील अॅक्शन चित्रपटांची सर्व पुनरावलोकने गोळा केल्यानंतर हे संकेतस्थळ तयार करण्याची त्यांना कल्पना आली. चॅनचा पहिला मोठा हॉलिवूड चित्रपट असलेल्या रश अवरच्या प्रदर्शनाआधी त्यांनी दोन आठवड्यात संकेतस्थलाचे कोडिंग करून चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही काळापूर्वी ते प्रदर्शित केले. [१] [२]
पुढील भाग
[संपादन]२००१ मध्ये प्रदर्शित झालेला रश अवर २ हा चित्रपट प्रामुख्याने हाँगकाँगमध्ये आधारित होता. २००७मध्ये याचा तिसरा भाग रश अवर ३ प्रदर्शित केला गेला. हा चित्रपट प्रामुख्याने पॅरिसमध्ये घडतो.[३] टकरने या तिसऱ्या भागासाठी २.५ कोटी डॉलरचे मानधन मिळाले तर चॅनने आशियामध्ये चित्रपटाचे वितरण हक्क मोबदला म्हणून घेतले. [४]
२००७ मध्ये रश अवर ३ च्या प्रदर्शनाच्या सुमारास रॅटनरने चौथा भाग बनवण्याचे सूतोवाच केले होते. हा चित्रपट मॉस्कोमध्ये घडणार होता होता. अनेक वर्षे नकार दिल्यानंतर २०१७ मध्ये चॅनने रश अवर ४ साठी संभाव्य स्क्रिप्टला मान्यता दिली. २०२५ पर्यंत हा चित्रपट तयार झालेला नव्हता. [५] [६] [७]
संदर्भ
[संपादन]- ^ "20 Years Later, Rush Hour Is Still a Buddy-Cop Gem". Rotten Tomatoes. September 18, 2018. April 13, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 14, 2018 रोजी पाहिले.
- ^ Semley, John (2018). Hater: On the Virtues of Utter Disagreeability. Penguin Books. pp. 26–27. ISBN 978-0-7352-3617-2. August 3, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 14, 2018 रोजी पाहिले.
- ^ "Chan Says Tucker Holding Up Rush Hour 3". The Associated Press. July 10, 2005. April 26, 2006 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 25, 2006 रोजी पाहिले.
- ^ Associated Press (September 30, 2007). "FOXNews.com – Jackie Chan Admits He Is Not a Fan of 'Rush Hour' Films – Celebrity Gossip | Entertainment News". Fox News. November 9, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Shirley Li (October 6, 2017). "Jackie Chan teases that 'Rush Hour 4' is close to being a reality". EW. August 20, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 20, 2019 रोजी पाहिले.
- ^ Chris Tilly (August 13, 2014). "Jackie Chan Downplays Talk of Rush Hour 4 and Drunken Master 3". IGN. August 20, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 20, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Jackie Chan Says Rush Hour 4 Is Happening, but There's a Catch". E! Online. October 5, 2017. August 20, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 20, 2019 रोजी पाहिले.