गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्‍नागिरी एज्युकेशन सोसायटीचे र. प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय हे रत्‍नागिरी शहरातील अग्रगण्य असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९४५ साली झाली. या महाविद्यालयास बहुमोल शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सहभाग घेऊन एकूण दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

कला विभाग[संपादन]

  • भाषाविभाग-

महाविद्यालयामध्ये पाच विविध भाषांचे अध्यापन केले जाते. या पाच विभागांमध्ये इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत उर्दु या भाषांचा समावेश होतो. या पाच भाषांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात सुसज्ज संगणक कक्ष उपलब्ध आहे. याच्या मदतीने एखाद्या विषयासंदर्भात दृकश्राव्य माहिती विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मिळविता येते. [१]

  • इंग्रजी भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.अतुल पित्रे

  • मराठी भाषा विभाग :

विभागप्रमुख-प्रा.शिवराज गोपाळे

  • हिंदी भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.चित्रा गोस्वामी

  • संस्कृत भाषा विभाग :

विभागप्रमुख-डॉ.कल्पना आठल्ये

  • उर्दु भाषा विभाग :

विभागप्रमुख-प्रा.दानिश गनी

शास्त्र विभाग[संपादन]

महाविद्यालयाला विस्तृत असा शास्त्र विभाग आहे. या शाखेंतर्गत अनेक उपशाखांचे सम्मिलीकरण केले आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित तसेच व्यावसाईक अभ्यास्क्रमातर्गत संगणक विद्यान , सूक्ष्मजीवशास्त्र, जीवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र यांचा समावेश केला गेला आहे.

क्रीडा विभाग/जिमखाना विभाग[संपादन]

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असा क्रीडा विभाग आहे.

  1. ^ सहकार