रत्‍नचिकित्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नचिकित्सा या पानावरून पुनर्निर्देशित)

या संपूर्ण लेखास कृपया संदर्भ देण्यास मदत करा ही विनंती. आयुर्वेदिक पद्धतीने रत्‍नांवर प्रक्रिया करून त्यापासून औषध बनवून व ते रोग्यास देऊन किंवा ज्योतिष्यशास्त्रानुसार रोग्यास विशिष्ट रत्‍न धारण करावयास लावून करण्यात येणाऱ्याया रोगचिकित्सेस रत्‍नचिकित्सा म्हणतात.

आयुर्वेद[संपादन]

यात काही विशिष्ट पद्धतीने त्या रत्‍नांचे भस्म तयार करण्याची पद्धत आहे. जसे- मौक्तिकभस्म, माणिक्यभस्म, गोमेदमणि भस्म, तार्क्ष्य भस्म, वैडूर्य भस्म, पुष्पराग भस्म, नीलम भस्म, राजावर्त भस्म, वैक्रांतभस्म, प्रवाळ भस्म इत्यादी.

ज्योतिष[संपादन]

एखाद्या रोग्याच्या शरीरात एखाद्या विशिष्ट रसायनाची कमतरता एखाद्या विशिष्ट रत्‍नाच्या धारणाने कमी होते अशी धारणा आहे.

रत्‍नांचे आयुर्वेदिक गुण दर्शविणारा तक्ता[संपादन]

क्र. रत्‍न निघणारे किरण धन वा ऋण त्रिदोष चव गुण आयुर्वेदिक रोगशामक गुण
हिरा निळे धन कफ आम्ल वातशामक कफ प्रधान ज्वर, संग्रहिणी, नेत्ररोग, निद्रानाश, नासारक्तस्त्राव, दन्तशूल, नाडीव्रण, उन्माद, रजोरोध इत्यादी.
माणिक रक्त ऋण पित्त कटु कफशामक पांडुरोग, निर्बलता, श्वेताणुवृद्धी विकार, चित्तक्षोभ, व्यंग इत्यादी.
पन्ना हरित धन कफ सर्व ६ रस वात-कफ-पित्तशामक श्वास, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, सूर्यावर्त, वातप्रकोप, शीत व वातपित्त, चक्कर येणे इत्यादी.
नीलम जांभळे उदासिन वायु लवण वातशामक चर्मरोग,प्रदर, गृध्रसी, अपस्मार, आमवातज शूल, श्वेत कुष्ठ, कमी रक्तदाब, संधिवात, प्रवाहिका, अपतानक इत्यादी.
मोती पिवळसर धन कफ कषाय कफ-पित्तशामक दाह, श्वास, कफप्रधान कास, जुना आमवात, मूत्राशय प्रदाह, पित्ताशयाश्मरी, मानसिक त्रास, उन्माद, रक्तस्राव, मासिकधर्मविकृती, राजयक्ष्मा इत्यादी.
प्रवाळ पिवळे ऋण पित्त कषाय कफ-पित्तशामक आमवात, शुष्कार्श, वातार्श, मलावरोध, बधिरता, मधुमेह, यकृतविकार, वातनाडीक्रियाह्रास, मानसिक शक्तिक्षय इत्यादी.
पांढरा पुष्पराग आकाशी उदासिन वायु मधुर वात-पित्तशामक स्वरयंत्रप्रदाह, कंठविकार, तृषारोग, वांती, अपचन, प्रवाहिका, कामला, दंतशूल, मानसक्षोभ, डांग्या खोकला इत्यादी.

हे सुद्धा पहा[संपादन]