रखिन राज्य
Jump to navigation
Jump to search
रखिन हे म्यानमारमधील एक राज्य असून सिट्टवे हे राजधानीचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार ४० लाख लोकसंख्येचे राज्य आहे. या राज्यात बौद्ध धर्म बहुसंख्य असून ते राज्याच्या लोकसंख्येच्या ६४% आहे. राज्याच्या उत्तर भागात मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या रोहिंग्या समाजाची वस्ती आहे. ७,२३,००० रोहिंग्या समाजाची टक्केवारी एकूण राज्याच्या लोकसंख्येच्या २५% आहे. म्यानमारमधील लष्करी राजवटीने रोहिंग्या समाजाला नागरिकत्व नाकारून त्यांच्या म्यानमारमधील अस्तित्वावरच प्रश्न निर्माण केला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणानुसार रोहिंग्या हा जगातील सर्वात पीडित अल्पसंख्याक समाज आहे.