Jump to content

रंजना पगार-गवांदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲड. रंजना पगार-गवांदे या संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या, वकील, लेखिका आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्या आहेत.[][] त्या अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध, जात पंचायत विरोध आणि महिला न्याय हक्क या विषयांवर कार्य करतात. त्या महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार समितीच्या शासकीय सदस्य आहेत. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव म्हणून त्या कार्यरत आहेत.[]

ॲड. रंजना पगार-गवांदे
Adv. Ranjana Pagar Gawande
जन्म २५ ऑगस्ट १९६२
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बी.एस्सी.(एल.एल.बी)
पेशा सामाजिक कार्यकर्त्या, वकील, लेखिका
जोडीदार प्रा. अशोक गवांदे
पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार

प्रारंभिक जीवन व शिक्षण

[संपादन]

रंजना पगार-गवांदे या संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी बी.एस्सी., एल.एल.बी हे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

व्यवसाय

[संपादन]

रंजना पगार-गवांदे या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय संगमनेर येथे गेल्या तीन दशकांपासून आपला वकिलीचा व्यवसाय करत आहे.

माध्यमांतील सहभाग

[संपादन]

महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, पुण्यनगरी, पुढारी, दिव्यमराठी, तरुण भारत, केसरी इ. मराठी वृत्तपत्रांत तसेच द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस इ. इंग्रजी वृत्तपत्रांनी वेळोवेळी रंजना पगार-गवांदे यांच्या कार्याची दाखल घेऊन लेख प्रसिद्ध केले आहेत. दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग या सदरात त्यांनी सामाजिक प्रश्नांवर स्तंभलेखन केले आहे.[][] महाराष्ट्र अंनिस वार्तापत्र, वनस्थळी, बहिणा, मिळून साऱ्याजणी, अक्षर आयान इ. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांचे प्रबोधनामातक लेख प्रसिद्ध झाले आहेत. झी २४ तास, टीव्ही९ मराठी, एबीपी माझा , न्यूज १८ लोकमत, साम टीव्ही आदी वृत्तवाहिन्यांवर विविध परिसंवादात त्या सहभागी झालेल्या आहेत.

सामाजिक कार्य

[संपादन]

रंजना पगार-गवांदे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये राज्य सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांसंदर्भात महाराष्ट्रभर व्याख्याने व जनजागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात दारूबंदी मोहिमेसाठी ८१० ग्रामपंचायतींचे दारूबंदी ठराव मिळवण्यात त्यांना यश आले.[] व्यसनमुक्ती अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, महिला मेळावे आणि ग्रामसभांमध्ये प्रबोधनपर कार्यक्रम घेतले असून बालविवाह प्रतिबंध, स्त्रीभ्रूण हत्या विरोध, जातपंचायत विरोध आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याविषयी त्यांनी कार्यशाळा व जनजागृती कार्यक्रम घेतले आहेत. बालविवाह या अनिष्ठ प्रथेबाबत प्रबोधनमात्मक व्याख्याने आयोजित करून आजपर्यंत महाराष्ट्रातील १८४ बालविवाह रोखण्यात त्यांना यास मिळाले आहे. मुख्यतः अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १०० पेक्षा जास्त भोंदू बाबांचा भांडाफोड गवांदे यांनी केला आहे.[]

क्रोमार्य चाचणी व चारित्र्य परीक्षा यांसारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी गवांदे यांनी पुढाकार घेतला आहे. चेटकीण प्रथा, भानामती यांविरोधात कृतिशील भूमिका घेऊन राज्यभर प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.

इंदुरीकर महाराज प्रकरण

[संपादन]

२०२० मध्ये, कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर तालुक्यातील ओझर येथे आपल्या कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. संभोगाची वेळ आणि मुलाचे लिंग यावर त्यांनी केलेली टिप्पणी ही गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (PCPNDT) कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायद्याचे उल्लंघन करते असा दावा ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी केला होता तसेच इंदुरीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती.[] सदर प्रकरणात त्यांनी सर्वोच्च न्यालयापर्यंत लढाई लढली. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा (PCPNDT) यानुसार कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात गवांदे यांनी महत्वाची आणि कायदेशीर भूमिका बजावली.[]

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू गडगे बाबा प्रकरण

[संपादन]

मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांच्या गाठी मंत्राद्वारे बरे करण्याचा दावा करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्त धाम सरकार चालवणारा राजेंद्र गडगे या भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यासाठी गवांदे यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर या भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला.[१०]

जात पंचायती बरखास्त करण्यात यश

[संपादन]

जात पंचायतीच्या माध्यमातून होत असेलेल्या शोषणाला प्रखर विरोध करून ही प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या माध्यमातून अ‍ॅड.रंजना पगार-गवांदे यांनी प्रयत्न करून नंदीवाले, गोपाळ जोगी, मसणजोगी, वैदू, यांसह अनेक जात पंचायती बरखास्त केल्या.[११][१२][१३] १७० हुन अधिक पीडित कुटुंबांची त्यांनी जात पंचायतीच्या जोखडातून मुक्तता केली आहे.[१४][१५][१६]

स्त्री- पुरुष समानतेसाठी शनी शिंगणापूर येथील लढा

[संपादन]

शनि शिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी होती. अ‍ॅड.रंजना पगार-गवांदे यांनी याविरोधात प्रत्यक्ष सहभाग घेऊन लढा दिला.[१७]

पर्यावरण संरक्षण

[संपादन]

फटाकेमुक्त दिवाळी अभियान, पर्यावरण पूरक गणपती इ.अभियान राबवून तसेच पुरण पोळी होळीत न जाळता त्या पोळ्या गरीब वस्त्यांवर जाऊन वाटप करणे, नागपंचमीच्या दिवशी जीवंत सापांना दूध पाजणे, गारुड्यांना बोलावणे यासारख्या रूढींना विरोध करत त्याऐवजी सापांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत प्रबोधन करत गवांदे यांनी पर्यावरण संरक्षण तसेच सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.

देवदासी प्रथा

[संपादन]

देवदासी प्रथा बंद करण्यासाठी गवांदे यांनी प्रयत्न केले असून याबाबत राज्यभर अनेक व्याख्याने दिली आहेत.[१८]

भूषविलेली पदे

[संपादन]
  1. राज्य सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती[]
  2. कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अहिल्यानगर
  3. अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा दारूबंदी आंदोलन
  4. उपाध्यक्ष, इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर
  5. मा. उपाध्यक्ष संगमनेर बार असोसिएशन
  6. सदस्य, महिला व बालकल्याण समिती, अहमदनगर
  7. सदस्य, महिला तक्रार निवारण समिती, प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी

सन्मान व गौरव

[संपादन]

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IndianOil) यांनी रंजना पगार-गवांदे यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या कार्याची दखल घेत त्यांचा 'हर एक काम देश के नाम' या मोहिमेत समावेश केला. या मोहिमेअंतर्गत इंडियन ऑईलने गवांदे यांच्या कार्यावर आधारित व्हिडिओ अधिकृत सामाजिक माध्यमांवर विशेष पोस्टद्वारे प्रकाशित करून त्यांचा गौरव केला.

पुरस्कार

[संपादन]
  1. महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार (२०१९)
  2. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा आदिशक्ती पुरस्कार (२०२२)
  3. लोकसत्ता नवदुर्गा पुरस्कार (२०१९)[१९]
  4. युआरएल फौंडेशन मुंबई यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार
  5. दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाचा सामाजिक गौरव पुरस्कार (२०१६)
  6. राष्ट्रसंत गाडगे महाराज पुरस्कार - २०२१ (शब्दगंध साहित्य परिषद)

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुलेंमुळेच महाराष्ट्र पुरोगामी:अंनिसच्या राज्य सचिव लेखिका ॲड. रंजना गवांदे-पगार यांचे प्रतिपादन‎". Divya Marathi.
  2. "Case filed against Marathi preacher over 'odd-even' remark for girl-boy child". The Hindu. 2020-06-26.
  3. Pendhare, Pradeep (2026-03-23). "Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा 'खरात पॅटर्न'? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी..." Politics News on Sarkarnama. 2026-06-24 रोजी पाहिले.
  4. "बुवा-बाबांच्या षडयंत्रातून कायमचे सोडवणारी पंचसूत्री". Loksatta. 2026-04-25. 2026-06-24 रोजी पाहिले.
  5. "समाज वास्तवाला भिडताना : नको नको ज्योतिषा माझ्या दारी येऊ..." Loksatta. 2025-07-19.
  6. "समाज वास्तवाला भिडताना : सामाजिक बहिष्कृततेचा ग्रामपंचायत ठराव". Loksatta. 2025-07-05. 2026-06-24 रोजी पाहिले.
  7. "black magic case : घरासमोर 'काळी जादू'चा खेळ? बाहुलीवर टाचण्या, जावयाचं गुपित उघड होताच धक्का!". sarkarnama. 2026-03-29.
  8. टीम, एबीपी माझा वेब (2020-06-26). "Indurikar Maharaj |पुत्रप्राप्तीसाठी केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलं; इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल". ABP Majha. 2026-06-24 रोजी पाहिले.
  9. "इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; उच्च न्यायालयाचा आदेश कायम". Pudhari. 2023-08-09.
  10. "अहिल्यानगर : वडगावपानचा भोंदूबाबा राजेंद्र गडगे अखेर जेरबंद, दत्तधाम सरकार मठामार्फत चमत्काराचे दावे". Loksatta. 2026-04-18. 2026-06-24 रोजी पाहिले.
  11. "वैदू समाजाची मुख्य जातपंचायत बरखास्त". Loksatta. 2025-03-16.
  12. author/admin (2015-03-16). "वैदू समाजाची जात पंचायतीला मूठमाती". Lokmat. 2026-06-24 रोजी पाहिले.
  13. "वैदू समाजाची अनिष्ट जातपंचायत बरखास्त, अंनिसने घेतला पुढाकार". Divya Marathi.
  14. "समाजातल्या कुप्रथांवर विवेकी प्रहार - Marathi News | Loksatta Durga Award 2019 Adv Ranjana Gawande Zws 70 - Latest Vishesh News at Loksatta.com". Loksatta. 2019-10-04. 2026-06-24 रोजी पाहिले.
  15. माझा, नितीन ओझा, एबीपी (2023-03-21). "जातपंचायतीचा जाच! श्रीरामपूरमध्ये डाॅक्टर कुटुंबावर बहिष्कार, तीन महिन्यापासून त्रास". ABP Majha. 2026-06-24 रोजी पाहिले.
  16. "वैदू समाजातील जात पंचायत बरखास्त". Maharashtra Times. 2015-03-16.
  17. "शनि शिंगणापुर मंदिर में महिला के पूजा से बवाल, मूर्ति के शुद्धि‍करण के बाद 6 सेवादार निलंबित". Aaj Tak. 2015-11-29.
  18. "समाज वास्तवाला भिडताना : मुरळी". Loksatta. 2025-06-07. 2026-06-24 रोजी पाहिले.
  19. "दुर्गा पुरस्कार.. प्रेरणेची प्रकाशबीज". Loksatta. 2019-11-02.