रंगानंदाचे पितृप्रेम (लोककथा)
रंगानंदाच्या पितृप्रेमामुळे वडिलांची तुरुंगातून सुटका कशी झाली हे सांगणारी ही कथा.
कथेचा आशय
[संपादन]ही एकोणिसाव्या शतकातील कथा आहे. रंगानंद नावाचा एक बारा वर्षांचा मुलगा होता.
त्याचे वडील शेतकरी होते. त्यांनी सरकारी जमीन कसायला घेतली होती, परंतु त्या वर्षी पीक आले नाही आणि त्यावेळी लागू असलेल्या कायद्यानुसार त्याला तुरुंगात जावे लागले. वडील तुरुंगात असताना, त्यांचा वाढदिवस आला पण ते घरी नसल्याने आई रडू लागली. आईचे दुःख रंगानंदाला बघवले नाही.रंगानंद चित्तूरला पळाला आणि त्याने चित्तूरच्या जिल्हा न्यायाधीशाचे दार ठोठावले.
न्यायाधीशांनी मुलाची कहाणी ऐकली आणि म्हणाले की, ''मी तुझ्या वडिलांना एकाच अटीवर सोडू शकतो. पण ते त्यांची शिक्षा भोगण्यासाठी परत तुरुंगात येतील याची निश्चिती म्हणून मला काहीतरी वचन पाहिजे. किंवा ओलीस म्हणून काहीतरी रक्कम त्यांनी मला दिली पाहिजे.''
रंगानंद म्हणाला, "आमच्याकडे पैसे नाहीत, पण मी स्वतःला गहाण ठेवीन आणि मी माझ्या वडिलांच्या जागी तुरुंगात राहीन."
त्याचे उत्तर ऐकून न्यायाधीशाच्या हृदयाला पाझर फुटला. त्याने वडिलांच्या सुटकेचा आदेश काढला. अत्यानंदाने रंगानंद तुरुंगाकडे धावला. वडील आणि मुलगा आनंदाने त्यांच्या घरी निघाले आणि त्या रात्री ते पोहोचले.
तात्पर्य
[संपादन]निःस्वार्थ प्रेमामध्ये मोठी ताकद असते. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.