Jump to content

य. वि. चंद्रचूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंत विष्णू चंद्रचूड
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख१२ जुलै 1920 संपादन
जन्मस्थानपुणे संपादन
मृत्यू तारीख१४ जुलै 2008 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
अपत्यधनंजय चंद्रचूड संपादन
व्यवसायन्यायाधीश संपादन
पदभारताचे सरन्यायाधीश संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाआय.एल.एस. विधी महाविद्यालय, नूतन मराठी विद्यालय संपादन

यशवंत विष्णू चंद्रचूड (१२ जुलै १९२०; पुणे, मुंबई प्रांत – १४ जुलै २००८; मुंबई) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. खेड तालुक्यातील कन्हेरसर हे त्यांचे मूळ गाव आहे. यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे २२ फेब्रुवारी, १९७८ पासून ११ जुलै, १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने सरन्यायाधीशपद भूषविले. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.

जीवन

[संपादन]

यशवंत विष्णू चंद्रचूड यांचा जन्म १२ जुलै, १९२० रोजी तत्कालीन ब्रिटिश भारताच्या मुंबई प्रांतातील, पुणे येथे झाला. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर १९४० साली मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. १९४२ साली पुण्याच्या विधी महाविद्यालयातून एलएल.बी. ही कायद्याची परीक्षा ते उत्तीर्ण झाले [].

१९ मार्च, १९६१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर त्यांची नियुक्ती झाली.[].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील य. वि. चंद्रचूड यांचे लघुचरित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
मिर्झा हमीदुल्ला बेग
भारताचे सरन्यायाधीश
फेब्रुवारी २२, १९७८जुलै ११, १९८५
पुढील:
पी.एन. भगवती