Jump to content

योग व त्याचे उद्देश (पुस्तिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योग व त्याचे उद्देश ही पुस्तिका म्हणजे श्रीअरविंद लिखित योग अंड इट्स ओब्जेक्ट्स या लेखाचा अनुवाद आहे. श्रीअरविंद यांनी हा लेख १९१२ मध्ये लिहिला होता. श्री.स.रा.आठले यांनी या लेखाचा अनुवाद केला आहे. []

लेखनाविषयी

[संपादन]
योग व त्याचे उद्देश
लेखक श्रीअरविंद घोष
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)योग अंँड इट्स ओब्जेक्ट्स
अनुवादकश्री.स.रा.आठले
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारवैचारिक लिखाण
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद मंडळ, पुणे
पृष्ठसंख्या५०

श्रीअरविंद यांची प्रखर साधना ज्या काळात चालू होती त्या काळातील हा लेख आहे. त्या लिखाणावर श्रीमदभगवद्गीतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. पण त्याच वेळी स्वानुभवावर आधारित काही नवीन मांडणी केली असल्याचेही येथे लक्षात येते. पारंपरिक योगाची मर्यादा आणि पूर्णयोग, अध्यात्मयोग यांची आवश्यकता येथे प्रतिपादन करण्यात आली आहे. साधकाने काय करावे किंवा काय करू नये याचे मार्गदर्शन येथे करण्यात आले आहे.

येशू ख्रिस्त, महमंद पैगंबर, चैतन्य महाप्रभू आणि रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणुकीचा समन्वय करण्याचे सुतोवाच येथे करण्यात आलेले आहे.

वैयक्तिक मुक्तीपेक्षा सकल मानवतेत आत्मिक शांती, आनंद, शुद्धि, पूर्णता यांचे अवतरण घडविणे अधिक महत्त्वाचे आहे, या विचाराने या लेखनाची परिसमाप्ती होते. हा विचार हे पूर्णयोगाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पारंपरिक योगापेक्षा पूर्णयोग कसा वेगळा आहे याचा काही विचार या पुस्तिकेत समाविष्ट झाला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. योग व त्याचे उद्देश, अनुवादक- श्री.स.रा.आठले, श्रीअरविंद मंडळ, पुणे