योग गॅलरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


योग गॅलरी[संपादन]

योगशास्त्र[संपादन]

उत्कृष्ट जगण्याची योगा ही एक कला आणि विज्ञान आहे .भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून योग विज्ञानाचे महत्त्व सांगितले आणि अगीकारले आहे.योगा मुळे आपले मन , शरीर बलवान आणि सुंदर बनते. योग हा मानसिक आणि शाररीक पातळीवर असणारे आजार मुळापासून बरे करण्यास मदत करते. पुरातन काळात भारतीय संस्कृतीमध्ये राजे , महाराजे, ऋषी , मुनी,सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात योगशास्त्र वापरत असत. त्यमुळे त्यांचे जगणे अजून आनंदमय होत असे.आजही हिमालयात अनेक ऋषी - मुनी योगसाधना करतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक लहान - थोर मंडळीनी योगविज्ञान शिकले पाहिजे . योगाचे दोन प्रकार असतात एक म्हनजे ध्यानधारणा करून आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयावासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन,ताडासन,मास्य्सान ,धनुरासन हे काही प्रकार होत. अनुक्रमे मंड्या,उंची वाढवणे,पोट,शरीर यासाठी ही आसने फार लाभ दायक आहेत. आजकाल शाळेत शाररीक शिक्षण च्या तासाला खेळ आणि योगासने शिकवली जातात. हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वाढत्या वयातले उत्तम औषध आहे. शाररीक संतुलनाचा हा एक महा मार्ग आहे.

दुर्धर शाररीक आजारांनी ग्रासलेल्या लोकांना , मानसिक आजारी असलेले लोक,कामाच्या ताणापासून मुक्ती हवी असलेल्यांना ध्यानधारणा हा एक राजमार्ग आहे. थोड्याश्या जागेतही , रोज थोडा वेळ दिला तरी आपण ध्यानधारणा करू शकतो.


मानसिक जडन घडन मध्ये योग़शास्त्रा चा फार मोलाचा वाट आहे. भारतातच नव्हे तर जगभरात योग शास्त्र प्रचिलित आहे. संपूर्ण दुनियेत निरनिराळी लोक योगशास्त्राची मदत घेतात.

संपर्क[संपादन]