योआखिम ल्योव
Appearance
योआखिम ल्योव (जर्मन: Joachim Löw; ३ फेब्रुवारी १९६० , श्योनाउ, पश्चिम जर्मनी) हा एक माजी जर्मन फुटबॉलपटू व जर्मनी राष्ट्रीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक आहे. २००४-०६ दरम्यान जर्मन संघाचा उप-प्रशिक्षक असलेला ल्योव २००६ पासून प्रशिक्षकपदावर आहे. त्याने आजवर २००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो २००८, २०१० फिफा विश्वचषक, युएफा यूरो २०१२, २०१४ फिफा विश्वचषक व युएफा यूरो २०१६ ह्या प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मनीच्या प्रशिक्षकाचे काम पाहिले आहे.
जर्मनीच्या प्रशिक्षकपदापूर्वी ल्योव फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट, फेनर्बाचे एस.के., कार्ल्सरुहेर एस.से. इत्यादी क्लबांचा प्रशिक्षक राहिला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |