Jump to content

येरेव्हान मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करेन डेमिर्च्यान येरेव्हान सबवे (येरेव्हान मेट्रो)
Կարեն Դեմիրճյանի անվան Երևանի մետրոպոլիտեն (Երևանի մետրո)
प्रजासत्ताक चौक स्थानकावरील कारंजा
प्रजासत्ताक चौक (येरेव्हान मेट्रो)
मालकी हक्क येरेव्हान नगरपालिका, आर्मेनिया सरकार
स्थान येरेव्हान, आर्मेनिया
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग
मार्ग लांबी १३.४ कि.मी.
एकुण स्थानके १०
दैनंदिन प्रवासी संख्या ८१,००० (२०२३)[]
वार्षिक प्रवासी संख्या २.९६ कोटी[]
सेवेस आरंभ ७ मार्च १९८१[]
कार्यकारी अधिकारी बाबकेन सेद्रक्यान
मार्ग नकाशा
येरेव्हान मेट्रो
नाझरबेक्यान
अजापन्याक
बरेकामुत्यून
मार्शल बाग्राम्यान
येरितासार्दाकान
प्रजासत्ताक चौक
झोराव्हार आंद्रानिक
सासूनचा डेव्हिड
सासूनचा डेव्हिड आगार
गोऱ्त्सारानायिन
शेंगाव्हित
गारेगिन न्झदेह चौक
चारबाख आगार
चारबाख
येरेव्हान मेट्रोचा नकाशा

करेन डेमिर्च्यान येरेव्हान सबवे (आर्मेनियन : Կարեն Դեմիրճյանի անվան Երևանի մետրոպոլիտեն करेन डेमिर्च्यानी अन्वन येरेव्हानी मेट्रोपॉलिटेन ; डिसेंबर १९९९ पासून), किंवा येरेव्हान मेट्रो (आर्मेनियन : Երևանի մետրո) ही आर्मेनियाची राजधानी येरेव्हान येथील जलद वाहतूक व्यवस्था आहे. ७ मार्च १९८१ रोजी उघडण्यात आल्यावर ही माजी सोव्हिएत संघातील आठवी मेट्रो प्रणाली होती. हे मेट्रो व्यवस्था सरकारच्या मालकीची असून, परिवहन आणि दळणवळण मंत्रालयाच्या करेन डेमिर्च्यान येरेव्हान सबवे सीजेएससी द्वारे चालवली जाते.

इतिहास

[संपादन]

युद्धोत्तर काळात आर्मेनियन सो.सा.ग. ची राजधानी असलेल्या येरेव्हानमध्ये लक्षणीय वाढ झाली, जेव्हा ती. शहराच्या अतिशय असमान भूदृश्यामुळे, मोठ्या संख्येने लोकांची शहरात वर्दळ कार्यक्षमतेने करू शकणारी केवळ एक भूमिगत प्रणालीच असेल असे दिसू लागले. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आर्मेनियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन पहिले सचिव अँटोन कोचिनयान यांच्या मार्गदर्शनाखाली जलद वाहतूक व्यवस्थेच्या पहिल्या योजना तयार होऊ लागल्या. सुरुवातीला, ही योजना संपूर्ण भूमिगत मेट्रो प्रणालीऐवजी जलद ट्रॅम प्रणालीवर संकल्पना केंद्रित करत होती. या काळात, सोव्हिएत शहर अभियांत्रिकी नियोजन विभागाने स्पष्टपणे सांगितले होते की मेट्रो व्यवस्था फक्त दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांनाच दिली जाईल, पण येरेव्हानमध्ये लोकसंख्या बांधकामाच्या सुरुवातीला (१९७२) या आकड्या पेक्षा काम होती. तरीसुद्धा, ज्या बोगद्यांमध्ये ट्राम लाईन्स बसवल्या जाणार होत्या ते अशा संकल्पनेने बांधले गेले होत्या ज्यामुळे या मार्गांना संपूर्ण भूमिगत मेट्रो प्रणालीत रूपांतरित करणे शक्य होते.

१९७८ च्या अखेरीस जेव्हा ही प्रणाली पूर्णपणे भूमिगत मेट्रो म्हणून उघडली जाईल अशी योजनांची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा ४ किलोमीटर (२.५ मैल) लांबीचे बोगदे खोडदून झाले होते, (अतिरिक्त नोकरशाही अडथळे टाळण्यासाठी ही प्रणाली उघडेपर्यंत अधिकृतपणे "जलद ट्रॅम" म्हणूनच ओळखली जात होती).

७.६ किलोमीटर (४.७ मैल) लांबीची ४ स्थानकांसह, आठवी सोव्हिएत मेट्रो प्रणाली म्हणून ७ मार्च १९८१ रोजी, ही सेवा उघडण्यात आली यामध्ये तेव्हापासून, आता येथे १३.४ किलोमीटर (८.३ मैल) लांबीचा[] दहा स्थानक असलेला मार्ग वापरीत आहे.

येथील अभियांत्रिकी काम इतके उच्च दर्जाचे होते की १९८८ च्या आर्मेनियन भूकंपात मेट्रो संपूर्ण प्रजासत्ताकला लकवा देणाऱ्या भूकंपाचा सामना करू शकली आणि दुसऱ्या दिवशीही किरकोळ नुकसानासह मेट्रो चालू राहिली. तथापि, येरेव्हान आणि आर्मेनियामधील इतरत्र नष्ट झालेल्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी निधी वळवण्यात आल्यामुळे बहुतेक विस्तार प्रकल्प थांबले.

२८ डिसेंबर १९९९ रोजी, मेट्रोचे नाव जलद ट्रॅम प्रणालीची संकल्पना मेट्रो प्रणालीमध्ये बदलण्याची जबाबदारी घेणाऱ्या करेन डेमिरच्यन यांच्या नावावर ठेवण्यात आले. हे नामांतर डेमिरच्यान यांचा आर्मेनियन संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्याने केले गेले.

नामांतरे

[संपादन]

सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर आणि आर्मेनियाच्या स्वातंत्र्यानंतर, १९९२ मध्ये तीन स्थानकांची नावे बदलण्यात आली. आर्मेनियन वंशाचे सोव्हिएत लष्करी कमांडर इव्हान क्रिस्टोफोरोविच बग्राम्यान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सन्मानार्थ दहा वर्षांपूर्वी चौथ्या स्थानकाचे नाव बदलण्यात आले होते.

येरेव्हान मेट्रोची गाडी
स्टेशन मागील नाव(ने) वर्षे
मार्शल बाग्राम्यान सारलांदझी १९८१-१९८२
प्रजासत्ताक चौक लेनिन चौक १९८१-१९९२
गारेगिन न्झदेह चौक स्पांदार्यान चौक १९८७-१९९२
झोराव्हार आंद्रानिक होक्तेंबेरियान १९८९-१९९०

प्रवासीसंख्या आणि इतर आकडेवारी

[संपादन]
प्रजासत्ताक चौक मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार
प्रजासत्ताक चौक मेट्रो स्थानकाच्या आत

आज येरेव्हान मेट्रो १३.४ किलोमीटर (८.३ मैल) लांबीच्या एकाच मार्गावर चालते, ज्यात शेंगवित-चारबाख शाखेवर एक वेगळी शटल सेवा आहे.[] सकाळी ७:०० वाजेपासून ते रात्री ००:०० वाजेपर्यंत दर पाच मिनिटांनी गाड्या धावतात. भाडेवाढ होण्यापूर्वी दररोज सुमारे ६०,००० प्रवाशांना सेवा दिली जात असे,[] २०१२ मध्ये, १.४९ कोटी प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.[] परंतु भाडे दुप्पट झाल्यानंतर प्रवासी संख्या जवळजवळ २०% ने कमी होऊन रोजी ५०,००० झाली.[] या प्रणालीमध्ये सुमारे १,२०० कामगार काम करतात. येरेव्हान मेट्रोचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल टायमर/घड्याळेगाडी सुटायची वेळ मोजतात, म्हणजेच जेव्हा एखादी गाडी निघते तेव्हा हे घड्याळ "००:००" वर रीसेट होतात आणि पुढची ट्रेन सुटेपर्यंत मोजत राहतात. प्रवाशांना हे माहित असले पाहिजे की, सर्वसाधारणपणे गाड्या दर ५ मिनिटांनी येतात / सुटतात.

विस्तार योजना

[संपादन]

शहराच्या लोकसंख्या वाढीबद्दल (१९८६ मध्ये दहा लाखांपर्यंत पोहोचली) आशावाद असूनही, आज मेट्रोला निधीची कमतरता आहे आणि ती अजूनही शहराची मुख्य वाहतूक पद्धती बनू शकली नाही. १९८९ पासून (चारबाखमधील एका फलाटाच्या स्थानकासाठी एक छोटी शटल सेवा सोडून) मेट्रोचे जवळजवळ कोणतेही विस्तारीकरण झालेले नाही. १९८८ च्या भयानक भूकंपात झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी अजूनही तरतूद करावी लागत असलेल्या शहराच्या अर्थसंकल्पात मेट्रोला प्राधान्य दिले जात नाही. पुढील विस्तार अचप्न्याक आणि नजरबेक्यान स्थानकांपर्यंत असेल (ज्यांचे बांधकाम १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच थांबले आहे).

या कारणांशिवाय, भूकंपापूर्वी आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर आलेल्या आर्थिक संकटांपूर्वी मेट्रो महत्त्वाच्या निवासी जिल्ह्यांना जोडण्यात यशस्वी झाली नसल्यामुळे, मिनीबस मार्गांनी येरेव्हानच्या शहरी वाहतुकीचा कणा म्हणून काम केले आहे. २००४ मध्ये, मेट्रोची वार्षिक प्रवासीसंख्या १.२१ कोटी होती. पण अलिकडच्या वर्षांत कारण शहरातील गर्दीच्या रस्त्यांमुळे हा ट्रेंड उलटा झाला आहे. प्रवासी मेट्रोला जलद, स्वच्छ आणि परवडणारा परिवहन पर्याय म्हणून पाहण्यास पुन्हा सुरुवात करत आहेत.[] २०१६ पर्यंत, मेट्रोची वार्षिक प्रवासी संख्या १.५४ कोटी वार्षिक प्रवाशांपर्यंत वाढली होती. २०१७ पर्यंत, वार्षिक प्रवासी संख्या १.६२ कोटी प्रवाशांपर्यंत वाढली.[१०] २०१९ पर्यंत, प्रवाशांची संख्या २.०२ कोटी वार्षिक प्रवाशांपर्यंत वाढली.[११]

१५ मे २०१९ रोजी, येरेव्हानच्या मुख्य वास्तुविशारदांनी पुष्टी सांगितले की येरेव्हान मेट्रोचा विस्तार सुरू करण्याची योजना आता सुरू आहे. अजप्न्यक जिल्ह्यातील नवीन मेट्रो स्थानकाच्या संकल्पनेचे काम लवकरच पूर्ण होईल आणि २०२० च्या सुरुवातीला बांधकाम सुरू होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.[१२] २०१९ मध्ये, येरेव्हानचे महापौर हायक मारुत्यान यांनी घोषणा केली की मेट्रोला उत्तरेकडे दावतशेन जिल्ह्यापर्यंत वाढवण्याचे प्राथमिक काम सुरू झाले आहेत.[१३]

नूतनीकरण

[संपादन]

३० वर्षांपूर्वी स्थापनेनंतर पहिल्यांदाच येरेव्हान मेट्रोचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले, ज्यामध्ये युरोपियन संघाने सुमारे $४.१ कोटी निधी दिला. भूमिगत मेट्रोच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या पूर्वअटांपैकी एक - ड्रेनेज सिस्टीमचे बांधकाम पहिले केले जाईल. याव्यतिरिक्त, युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटच्या मदतीने, बोगद्यांच्या मध्ये देखील श्रेणीवाढ करण्यात आली, मेट्रो गाड्यांचे नूतनीकरण करण्यात आले आणि नवीन प्रमाणबद्ध उपकरणे बसवण्यात आली.[१४] २०१२ पर्यंत हे नूतनीकरण पूर्णपणे संपले होते.[१५]

टोकन

[संपादन]

तिकिटांऐवजी, प्रवाशांना टोकन विकले जातात, जे नंतर स्टेशन फलाटावर पोहोचण्यासाठी चक्रद्वारातून प्रवेश करायला वापरले जातात. २००९ पासून जारी केलेल्या केशरी प्लास्टिक टोकनवर एका बाजूला मेट्रोचे प्रतीक चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला ससूनच्या डेव्हिडचा पुतळा दर्शविला आहे.

येरेव्हान मेट्रोचे टोकन
२००९ पर्यंत जारी केलेले टोकन
२००९ पर्यंत जारी केलेले टोकन 
मे २०१८ मध्ये जारी केलेले प्लास्टिकचे टोकन, ज्यामध्ये मार्गिकेचे प्रतीक चिन्ह दिसते
मे २०१८ मध्ये जारी केलेले प्लास्टिकचे टोकन, ज्यामध्ये मार्गिकेचे प्रतीक चिन्ह दिसते 
मे २०१८ मध्ये जारी केलेले ससूनचे डेव्हिड यांचा पुतळा दर्शविणारे प्लास्टिकचे टोकन
मे २०१८ मध्ये जारी केलेले ससूनचे डेव्हिड यांचा पुतळा दर्शविणारे प्लास्टिकचे टोकन 

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Քաղաքապետարանը հայտնել է, որ Երևանի մետրոն կհամալրեն մեկ շարժակազմով" (अर्मेनियन भाषेत). Armenia Today.
  2. ^ "Քաղաքապետարանը հայտնել է, որ Երևանի մետրոն կհամալրեն մեկ շարժակազմով" (अर्मेनियन भाषेत). Armenia Today.
  3. ^ "Yerevan authorities negotiating new metro line projects with banks". ArmeniaNow.com. 27 March 2013. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Yerevan authorities negotiating new metro line projects with banks". ArmeniaNow.com. 27 March 2013. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Yerevan authorities negotiating new metro line projects with banks". ArmeniaNow.com. 27 March 2013. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "Union of consumers: Doubled fare for Yerevan Metro will reduce number of passengers". ArmeniaNow.com. 22 June 2011. 12 November 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.
  7. ^ "Социально-экономическое положение Республики Армения в январе-декабре 2012г. Транспорт" (PDF) (रशियन भाषेत). 4 August 2013 रोजी पाहिले.
  8. ^ "Investing deep: Yerevan Metro gets continued assistance from European donors". ArmeniaNow.com. 5 December 2012. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.
  9. ^ Elliott, Raffi (26 February 2019). "Yerevan Gearing Up for Subway Extension". The Armenian Weekly. 19 June 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "ОСНОВНЫЕ ТЕХНИКО-ЭКСПЛУАТАЦИОННЫЕ : ХАРАКТЕРИСТИКИ МЕТРОПОЛИТЕНОВ ЗА 2017 ГОД" (PDF). Asmetro.ru. 9 March 2022 रोजी पाहिले.
  11. ^ Основные технико-эксплуатационные характеристики метрополитенов за 2019 год [Main technical and operational specifications for Subways in Year 2019] (PDF) (रशियन भाषेत). Международная Ассоциация "Метро" [International Association of Metros]. 2020-08-25 रोजी पाहिले.
  12. ^ "Chief Architect of Yerevan hopes to launch construction works of new subway station in early 2020". armenpress.am. 19 June 2019 रोजी पाहिले.
  13. ^ "Yerevan Gearing Up for Subway Extension". The Armenian Weekly. 26 February 2019. 29 July 2019 रोजी पाहिले.
  14. ^ Elliott, Raffi (26 February 2019). "Yerevan Gearing Up for Subway Extension". The Armenian Weekly. 19 June 2019 रोजी पाहिले.
  15. ^ "Investing deep: Yerevan Metro gets continued assistance from European donors". ArmeniaNow.com. 5 December 2012. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]