Jump to content

येकापील्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येकापील्स
Jēkabpils
Jakobstadt
राज्य शहर
Flag of Jēkabpils
Coat of arms of Jēkabpils
Jēkabpils is located in Latvia
Jēkabpils
येकापील्स
लात्व्हियामध्ये ठिकाण
समन्वय: 56°29′58″N 25°52′42″E / 56.49944°N 25.87833°E
देश  लात्व्हिया
नगरपालिका येकापील्स नगरपालिका
नगराधिकार १६७०
सरकार
  महापौर राइविस रागानिस
  नगरपरिषद सदस्यांचा संख्या १३
क्षेत्रफळ
  एकूण
२५.४५ किमी2 (९.८३ चौ. मैल)
  जमीन २१.९० किमी2 (८.४६ चौ. मैल)
  पाणी ३.५५ किमी2 (१.३७ चौ मैल)
उंची
७७ मी (२५३ फूट)
लोकसंख्या
 (२०२५)[]
  एकूण
२१,०१४
  घनता ९५९.५/किमी2 (२,४८५/चौ मैल)
जीडीपी
  राज्य शहर २८,८६,५२,००० युरो (२०२१)
  दरडोई १३,४२१ युरो (२०२१)
कालविधी यूटीसी+२
  उन्हाळी यूटीसी+३
टपाल अनुक्रमांक
LV-52(0१/02)
कॉल कोड (+३७१) ६५२
वेबसाइट www.jekabpils.lv

येकापील्स (लात्व्हियन: Jēkabpils; जेकबचा किल्ला) हे आग्नेय लात्व्हियामधील येकापील्स नगरपालिकेचे प्रशासकीय केन्द्र आणि स्वायत्त शहर आहे. ते राजधानी रिगा आणि दौगावपिल्स यांच्या साधारणपणे मध्यावर दौगाव्हा नदीच्या काठावर वसलेले आहे.

जुने येकापील्स शहर नदीच्या डाव्या तीरावर सेलोनियामध्ये वसलेले आहे, तर जुने क्रुस्तपील्स (जर्मन: Kreutzburg, क्रोइत्सबेर्क) हे शहर नदीपलीकडे उजव्या तीरावर, लात्गालेमध्ये वसलेले आहे. सोव्हिएत सत्तेदरम्यान १९६२ मध्ये ही दोन्ही शहरे येकापील्स या नावाने एकत्र केली असले तरीही त्यांनी आपले स्वतःचे वैशिष्ट्य जपले आहे.

इतिहास

[संपादन]
क्रुस्तपील्स किल्ला

दगडी क्रुस-किल्ला – क्रुचेबोर्ख (जर्मन: Kreutzburg) – हे १२३७ मध्ये रिगाच्या बिशपने बांधले होते. जवळच्या असोटे टेकडीवरील पुरातत्वीय उत्खननावरून असे दिसून येते की, हे ठिकाण लात्व्हियन जमातींपैकी एक असलेल्या लात्गाली लोकांसाठी एक गजबजलेले व्यापारी केंद्र होते आणि किमान इ. स. पू. १००० पासून येथे वस्ती होती. जेव्हा क्रुस्तपील्स किल्ला पहिल्यांदा बांधला गेला, तेव्हा तिथे जवळच एक वस्ती आधीपासूनच होती; ती किल्ल्याभोवती क्रुस्तपील्स गाव म्हणून विकसित झाली. पोलिश-स्वीडिश लढायांसारख्या युद्धांदरम्यान हे गाव अनेकदा उद्ध्वस्त झाले, पण नंतर ते नेहमीच पुन्हा वसवले गेले.

१७ व्या शतकात, रूसामध्ये छळलेल्या स्तारोवेरी दौगाव्हा नदीच्या काठावर वस्ती केली. १६७० मध्ये, साला मधुशालेभोवती हळूहळू वाढत जाणारी ही वस्ती येकाप्म्येस्त्स (Jēkabmiests, जर्मनमध्ये Jakobstadt) म्हणून ओळखली जाऊ लागली. कूरलांदचे ड्यूक, याकोब फॉन केटलर यांच्या सन्मानार्थ, ज्यांनी शहराला माग्डेबुर्गचे अधिकार प्रदान केले.

शहराच्या उत्पत्तीबद्दलची एक आख्यायिका सांगते की, एके दिवशी ड्यूक शिकार करत असताना रस्ता चुकला. दौगावा नदीजवळ त्याला एकाच वेळी देवदाराच्या झाडाखाली एक वनमार्जार आणि एक शहर दिसले. देवदाराखालील वनमार्जाराची ही प्रतिमा शहराचे राजचिन्ह आहे.

कूरलांदच्या डचीच्या काळात, या शहराचे रहिवासी प्रामुख्याने रूसी स्तारोवेरी, पोलिश आणि लिथुएनी होते. ड्यूक याकोबने जवळच्या लोखंडाच्या भट्टीमधून मालाची वाहतूक करण्यास शहरात एक छोटे बंदर बांधले. १७ व्या शतकाच्या संपत असताना, येकापील्स नांगर बनवण्याची टांकसाळ, तोफा बनवण्याचा कारखाना, चुना आणि डांबराच्या भट्ट्या व इतर अनेक कारखाने होते.

१७०४ मध्ये, महान उत्तर युद्धाच्यादरम्यान, रूसांनी शहरावर ताबा मिळवला. तरीही, काही महिन्यांनंतचर शहराच्या जवळ एक मोठी लढाई ( येकापील्सची लढाई ) झाली. आडाम लेवेनहाउप्टच्या नेतृत्वाखालील स्वीडिश सैन्याने मोठ्या रूसी सैन्याचा पराभव केला आणि अशा प्रकारे रूसी साम्राज्याला डचीमध्ये पुढील आक्रमण करण्यापासून रोखले.

युद्ध आणि प्लेगच्या साथीनंतर, शहराची पुन्हा भरभराट झाली. बेलारूसमधून येणाऱ्या नावांमधून धान्य, मध, तंबाखू, मद्य, कापड इत्यादींची आयात केली जात होती. त्याच वेळी, १८व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रीड्रिशस्टाटमधून होणारी जमिनीवरील वाहतूक वर्षाला अंदाजे ९,००० बैलगाड्यांइतकी होती. येकापील्स हे येल्गाव्हा ते फ्रीड्रिशस्टाट आणि पुढे इलुक्स्त पर्यंतच्या टपाल मार्गाचा देखील एक भाग होते.

१७०४ मधील याकोबस्टाडची लढाई

१७६४ मध्ये शहरातून क्रुस्टपील्सला जाणारी पहिली फेरी सेवा सुरू झाली. पीटर फॉन बिरॉनच्या कारकिर्दीत, शहरात रूसी आणि पोलिश लोकांव्यतिरिक्त जर्मन-भाषिक कारागिरांचा एक छोटा समुदाय दिसून येत होता. तथापि, ज्यू लोकांना शहरात प्रवेश करण्यास मनाई होती. १७९५ मध्ये, संपूर्ण कूरलांद आणि सेमिगालियाच्या डचीप्रमाणेच, याकोबस्टाटला रूसी साम्राज्यात विलीन केले.

१८२६ मध्ये फ्रीडरिश गेओर्ग विल्हेल्म फॉन स्ट्रुव्हने शहराच्या जवळ आपली भूमितीय मोजमापे घेतली.

१८३४ साली शहरात पहिले रुग्णालय उघडले. याच काळात एक नाट्यगृह आणि ग्रंथालयही उघडले, आणि रस्त्यांवर प्रथमच दगडी फरसबंदी केली.

१८६१ मध्ये क्रस्टपिल्स मार्गे रिगा-दौगावपील्स रेल्वे सुरू झाल्यामुळे वाहतुकीचे मुख्य साधन म्हणून दौगावा नदी आणि नावांची भूमिका कमी झाली. तरीही, लाकडाच्या तराफ्यांसाठी अजूनही नदी वापरली गेली.

१९२० मध्ये महान रस्ता (Lielā iela).

२०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तेथे एक बँक, एक विमा कंपनी, एक आगपेटीचा कारखाना, एक वाफेची गिरणी, एक मद्यनिर्मितीचा कारखाना, मुद्रणकला आणि इतर अनेक उद्योग होते. पहिल्या महायुद्धादरम्यान शहराच्या जवळ भीषण लढाया झाल्या आणि शहरातील सु. २८० वास्तू नष्ट झाल्या किंवा त्यांचे नुकसान झाले.

भूगोल

[संपादन]

येकापील्स शहराची लोकसंख्या २९,१०० आहे. येकापील्सचे दोन ऐतिहासिक भाग - क्रुस्टपील्स आणि ऐतिहासिक येकापील्स दौगावा नदीवरील पुलाने जोडलेले आहेत.

हवामान

[संपादन]

Jēkabpils मध्ये दमट खंडीय हवामान आहे (कोप्पन Dfb).

येकापील्स (झीलानी, १९९१-२०२० सरासरी, अतिरेक १९४३–आज) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) १०.० ११.८ १८.० २६.३ ३०.० ३२.३ ३४.७ ३४.३ ३०.५ २२.६ १६.६ १०.३ nil
(nil)
सरासरी कमाल °से (°फॅ) -१.८ -१.२ ३.८ ११.८ १७.७ २१.१ २३.६ २२.४ १६.७ ९.६ ३.३ -०.४
दैनंदिन °से (°फॅ) -४.० -४.० -०.१ ६.६ १२.१ १५.७ १८.१ १६.९ ११.९ ६.१ १.४ -२.१
सरासरी किमान °से (°फॅ) -६.५ -७.१ -३.९ १.६ ६.१ १०.१ १२.७ ११.७ ७.६ ३.१ -०.९ -४.४
विक्रमी किमान °से (°फॅ) -३५.४ -३६.७ -२४.६ -१४.४ -४.६ -०.४ ४.१ ०.३ -४.२ -१०.९ -२२.० -३५.२ nil
(nil)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) ४७.८ ४०.४ ३७.२ ३७.० ५९.६ ७५.० ७१.० ७४.५ ५६.० ६९.४ ५४.७ ४७.५३
सरासरी पर्जन्य दिवस (≥ १ मिमी) १२ १० १० ११ ११ ११ ११ १२
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) ८७.९ ८५.६ ७७.३ ६८.५ ६८.० ७२.६ ७४.६ ७७.० ८२.० ८६.४ ८९.५ ८९.४
स्रोत #1: LVĢMC[][]
स्रोत #2: NOAA []

लोकसंख्याशास्त्र

[संपादन]

१ जानेवारी २०१७ रोजी शहराची लोकसंख्या २३,७५० होती.

२०१७ येकापील्समध्ये लोकसंख्याशास्त्र लोकसंख्येची जनगणना[]
लात्व्हियन
 
60.6%
रूसी
 
26.7%
बेलारूसी
 
3.1%
पोलिश
 
2.9%
उक्रेनी
 
1.8%
दुसरे
 
5.0%

आकर्षणे

[संपादन]

येकापील्स

[संपादन]

शहराच्या कही जुन्या भागांमध्ये इमारती जतन केल्या आहेत. क्रुस्टपील्सच्या किल्ल्यामध्ये येकापील्स आणि क्रुस्टपील्सचे ऐतिहासिक संग्रहालय आहे.

उल्लेखनीय लोक

[संपादन]
  • अब्राम लेइबॉविच (१८६९-१९४१), उद्योजक
  • उगा स्कुल्मे (१८९५-१९६३), चित्रकार
  • कोन्स्तांतिन अनिसिमॉविच पाव्लोव्ह (१९०७-१९७६), प्रतिमा चित्रकार आणि पुनर्संस्कारक
  • एलिता क्लाविया (जन्म १९६६), अभिनेत्री
  • युरिस उंब्राश्को (जन्म १९७८), बास्केटबॉल प्रशिक्षक
  • आर्विस विगल्स (जन्म १९८७), कवी, अनुवादक
  • देनिस्स राकेल्स (जन्म १९९२), फुटबॉलपटू
  • रेनिस नितिस (जन्म १९९५), वर्ल्ड रॅलीक्रॉस चालक
  • सांदिस जिर्गेन्स (जन्म १९८०), राजकारणी.
  • आंद्रेय्स प्येदेल्स (जन्म १९७०), फुटबॉलपटू.
  • आंद्रिस जेरिन्श (जन्म १९८८), आइस हॉकी खेळाडू.

गॅलरी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Reģionu, novadu, pilsētu un pagastu kopējā un sauszemes platība gada sākumā". Central Statistical Bureau of Latvia. Retrieved 7 January 2025.
  2. "Iedzīvotāju skaits pēc tautības reģionos, pilsētās, novados, pagastos, apkaimēs un blīvi apdzīvotās teritorijās gada sākumā (pēc administratīvi teritoriālās reformas 2021. gadā)".
  3. "Iekšzemes kopprodukts un bruto pievienotā vērtība pa darbības veidiem reģionos un valstspilsētās faktiskajās cenās (pēc administratīvi teritoriālās reformas 2021. gadā)".
  4. "Klimatisko normu dati". Latvian Environment, Geology and Meteorology Centre. January 13, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 21, 2023 रोजी पाहिले.
  5. "Gaisa temperatūras rekordi". Latvian Environment, Geology and Meteorology Centre. January 13, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 21, 2023 रोजी पाहिले.
  6. "World Meteorological Organization Climate Normals for 1981-2010" (इंग्रजी भाषेत). National Oceanic and Atmospheric Administration. March 31, 2023 रोजी पाहिले.
  7. [permanent dead link]