युद्ध कांड
| ह्याचा भाग | रामायण |
|---|---|
| Form of creative work | कविता |
| Has version, edition or translation | Ramayan (Lankakanda) |
| लेखक | वाल्मीकि |
| वापरलेली भाषा | संस्कृत भाषा |
| Depicts | war between Rama and Ravana |
युद्ध कांड किंवा लंका कांड हा हिंदू धर्मग्रंथ रामायण मधील सहावा भाग आहे. वाल्मिकी यांनी रचलेल्या ह्या महाकाव्याचे सात भाग आहेत.

सारांश
[संपादन]या भागामध्ये रामाचे (वानर) आणि रावणाचे (राक्षस) सेनांदरम्यान झालेल्या युद्धाचे वर्णन आहे. हनुमानाने सीतेची माहिती दिल्यानंतर राम आणि लक्ष्मण आपले सहकारी घेऊन दाक्षिणात्य समुद्राच्या किनाऱ्याकडे निघाले. तिथे त्यांच्यात रावणाचा भाऊ विभिषण सामील होतो. वानर नल आणि नील हे रामसेतू उभारतात.[१]
राजकुमार आणि त्यांची सेना समुद्र ओलांडतात. एका युद्धात, रावणाचा मुलगा मेघनाद लक्ष्मणावर प्रचंड शस्त्र फेकतो आणि लक्ष्मण गंभीर जखमी होतो. यावर हनुमान आपली महान आकृती धारण करतो आणि लंकावरून हिमालयाकडे उडतो. पोहोचल्यावर, लक्ष्मणाचा उपचार करणारी संजीवनी वनस्पती ओळखणे हनुमानाला जमत नाही आणि म्हणून तो संपूर्ण पर्वत लंकाला घेऊन आणण्याचा निर्णय घेतो. अखेरीस, राम रावणाचा वध केल्यावर युद्ध समाप्त होते. त्यानंतर राम विभिषणाला लंकेच्या सिंहासनावर बसवतो.
सीतेला भेटल्यावर राम व सर्व अयोध्येत परतले. आपल्या राज्यातील लोकांकडून सीतेच्या पवित्रतेबद्दलची टीका ऐकता राम खूप उदास होतो. नागरिकांची चुकी सिद्ध करण्यासाठी आणि तिच्यावर लावलेली खोटे आरोप दूर करण्यासाठी सीता अग्निपरीक्षा देते. अग्नीदेव स्वतः सीतेला सांभाळून रामकडे परत आणतात व तिच्या पवित्रतेची साक्ष देतात. नंतर राम सीताला आनंदाने स्वीकारतो. (इतर रामायणाच्या आवृत्तीत अग्निपरीक्षेत सीताला बदलले जाते. माया सीता पहा.)[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ Rajarajan, R. K. K. (2014). "Reflections on 'Rāma-Setu' in South Asian Tradition". The Quarterly Journal of the Mythic Society. 105 (3): 1–14. ISSN 0047-8555. 6 November 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Book VI : Yuddha Kanda, Sarga 118". sanskritdocuments.org. 12 September 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 September 2021 रोजी पाहिले.
