Jump to content

यी वेई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेई यी
२०२५ मध्ये वेई
देश चीन चीन
जन्म२ जून, १९९९ (1999-06-02) (वय: २७)
यानचिंग, चीन
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २७५४ (क्र. ९) (डिसेंबर २०२५)
सर्वोच्च गुणांकन २७६३ (ऑक्टोबर २०२४)

वेई यी (जन्म: २ जून १९९९) हा एक चिनी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. वेई १३ वर्षे, ८ महिने आणि २३ दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर झाला, जो इतिहासातील ९ वा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो २७०० गुणांकन गाठणारा सर्वात तरुण खेळाडू आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी ही कामगिरी केली. वेईने चीन बुद्धिबळ लीगमध्ये जियांग्सू क्लबचे प्रतिनिधित्व करतो आणि तीन वेळेचा चीनी बुद्धिबळ विजेता तसेच २०१८ चा आशियाई बुद्धिबळ विजेता आहे. २०२३ मध्ये, वेई यीने २०२२ च्या आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रॅपिड स्पर्धेत ७½/९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.[] त्याने २०२४ मध्ये टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा जिंकली.[] तो २०२५ च्या बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेता राहिला आणि २०२६ च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Asian Games: Wei Yi and Zhu Jiner win individual titles". www.fide.com (इंग्रजी भाषेत). २०२३-०९-२८.
  2. डॉगर्स, पीटर (२०२४-०१-२८). "Wei Yi Wins 2024 Tata Steel Chess Masters In Thrilling Tiebreak".
  3. "जावोखिर सिंदारोव्ह ठरला सर्वात तरुण फिडे विश्वचषक विजेता; टायब्रेकमध्ये वेई यीचा पराभव..." Network18. २०२५-११-२६.[permanent dead link]