वाय.व्ही. रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(याग वेणुगोपाल रेड्डी या पानावरून पुनर्निर्देशित)

याग वेणुगोपाल तथा वाय.व्ही. रेड्डी (ऑगस्ट १७, इ.स. १९४१) हे भारतीय रिझर्व बँकेचे २१ वे गव्हर्नर होते. ते १९६४ सालातील भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांना २०१० सालात पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

डॉ. रेड्डी यांनी अनेक वर्षे योजना आणि अर्थ खात्याशी संबंधित काम केले आहे. रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळण्यापूर्वी ते आंध्र प्रदेश सरकारचे प्रधान सचिव आणि रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही कार्यरत होते.


मागील:
डॉ. बिमल जालान
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
सप्टेंबर ०६, २००३सप्टेंबर ०५, २००८
पुढील:
डॉ. डी. सुब्बाराव