Jump to content

म्हैसूर पाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्हैसूर पाक

म्हैसूर पाक ही तुपात तयार केली जाणारी एक भारतीय मिठाई आहे. याचा उगम भारतातील कर्नाटक राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या म्हैसूर शहरात झाला. हा पदार्थ तूप, साखर, बेसन आणि वेलचीपासून बनवला जातो. याचा पोत लोणीयुक्त आणि दाट कुकिसारखा असतो.[१][२][३]

म्हैसूर पाकाचे तुकडे

इतिहास

[संपादन]

हा पदार्थ दक्षिण भारतात डोहाळजेवण, लग्न आणि इतर सणांमध्ये तयार केला जातो. म्हैसूरचे महाराज असलेले कृष्ण राजा वाडियार चतुर्थ हे अन्नप्रेमी होते आणि त्यांनी म्हैसूरच्या अंबा विलास पॅलेसमध्ये एक मोठे स्वयंपाकघर तयार केले होते, ज्यामध्ये मंदिरांसाठी प्रसादम ते युरोपियन पदार्थ अशा विविध पाककृती बनवल्या जात होत्या.

ही मिठाई त्यांचे मुख्य आचारी काकासुर मडप्पा यांनी तयार केली होती. वेळ संपत असताना हताश मडप्पा हे राजाला काहीतरी असामान्य सादर करू इच्छित होते आणि त्यासाठी प्रयोग करू लागले. परिणामतः बेसन, तूप आणि साखर घालून मऊ पाक (किंवा मिश्रण) त्यांनी बनवला. शाही थाळीत त्यांनी ती गरमागरम, आणि गोड असणारा पदार्थ वाढला. जेव्हा त्यांना बोलावून त्याचे नाव विचारले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मनात आलेली पहिली गोष्ट सांगितली - 'म्हैसूर पाक'.

चिकट साखरेच्या पाक हा पाण्यात साखर उकळून बनवला जातो. विशेषतः म्हैसूर पाकसाठी साखरेचा सिरप गरम केला जातो. पाक हा सरबत, जिलेबी, बदाम पुरी, म्हैसूर पाक आणि इतर विविध भारतीय मिठायांमध्ये प्राथमिक गोड करणारे एजंट म्हणून वापरला जातो. सरबत वेलची, गुलाब, मध इत्यादी मसाल्याच्या सारांसह चव दिली जाते. पाक सरबत तयार करणे ही एक कुशल कला आहे ज्यामध्ये काही स्वयंपाकी प्रभुत्व मिळवतात. त्यापैकी काही त्यांच्या पद्धती गुप्त ठेवतात.

हा गोड म्हैसूर पाक काळानुसार सुधारला. तथापि मूळ रेसिपीसह बनविलेला मूळ म्हैसूर पाक अजूनही देवराजा मार्केटमधील प्रसिद्ध "गुरू स्वीट्स" स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. या पदार्थाचे मूळ शोधक श्री काकासुरा मडप्पा यांचे पणतू श्री नटराज हे दुकान चालवतात.

म्हैसूर पाक

साहित्य

[संपादन]

म्हैसूर पाक हा बेसन, तूप, साखर आणि पाण्यापासून बनवला जातो. हा सामान्यतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात बनवला जातो. बेकिंग सोडा आणि वेलची हे इतर घटकदेखील वापरले जाऊ शकतात.

म्हैसूर पाक

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Mujumdar, Neha (24 November 2012). "In search of Mysore Pak" – www.thehindu.com द्वारे.
  2. ^ "Four generations - mysore pak still crowd puller here" – www.deccanchronicle.com द्वारे.
  3. ^ https://www.ndtv.com/south/how-the-famous-mysore-pak-was-invented-674512?amp=1&akamai-rum=off How the Famous Mysore Pak Was Invented