मौना किया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मौना किया
center}}
डिसेंबर २००७ मधील मौना कियाचे छायाचित्र
मौना किया is located in हवाई
मौना किया
मौना किया
हवाईतील मौना कियाचे स्थान
उंची
१३८०३.५ फूट (४२०७.३[१] मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
१५ वा
ठिकाण
हवाई, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
हवाई बेटे
गुणक
19°49′14″N 155°28′05″W / 19.820664°N 155.468066°W / 19.820664; -155.468066
पहिली चढाई
नोंद करण्यात आलेली: गुडरिच (१८२३)[२]
सोपा मार्ग
मौना किया पायवाट


मौना किया हवाई बेटावरील एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याच्या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची ४२०७.३ मी (१३८०३.५ फुट) आहे. या पर्वताचा बराचसा भाग समुद्राखाली आहे. त्याच्या समुद्रातील तळापासून मोजले असता उंची १०,००० मी (३३,००० फुट) आहे. मौना किया सुमारे दहा लाख वर्ष जुना आहे. त्यामुळे त्याचा सर्वात सक्रीय टप्पा निघून गेला आहे. मौना कियाचा शेवटचा उद्रेक सुमारे ४००० ते ६००० वर्षांपूर्वी झाला होता. आता तो सुप्त अवस्थेत आहे.

हवाईच्या पुराणामध्ये हवाईतील सर्व बेटांना पवित्र मानले जाते. जुन्या काळातील हवाईतील पर्वताच्या उतारावर राहणारे लोक अन्नासाठी पर्वताच्या आसपासच्या घनदाट जंगलांवर अवलंबून होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये युरोपीय लोक आले व त्यांच्यासोबत शेळ्या, मेंढ्या, गुरं घेऊन आले. त्यातील बरेचसे रानटी झाले आणि तिथल्या पर्यावरणाला नुकसान पोहोचवू लागले.

उच्च उंची, कोरडे वातावरण आणि हवेच्या स्थिर प्रवाहामुळे मौना कियाचे शिखर खगोलशास्त्रीय निरीक्षणांसाठी जगातील सर्वोत्कृष्ट ठिकाणांपैकी एक आहे. १९६४ मध्ये शिखरापर्यंतच्या रस्त्याची निर्मिती झाल्यानंतर तिथे अकरा देशांनी अर्थसहाय्य केलेल्या तेरा दुर्बिणी उभ्या राहिल्या.

संदर्भ[संपादन]