Jump to content

मौंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मौदे या पानावरून पुनर्निर्देशित)
मौंदे
गाव
देश भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा सिंधुदुर्ग
तालुका वैभववाडी
प्रमाणवेळ UTC+5:30 (IST)
पिन
416813

मौंदे हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक छोटेसे, निसर्गरम्य आणि जंगलाने वेढलेले गाव आहे. सह्याद्रीच्या कड्या-कपारीत वसलेले हे गाव शांततेसाठी आणि समृद्ध वनसंपदेसाठी ओळखले जाते.

इतिहास

[संपादन]

गावाची स्थापना साधारणतः चारशे वर्षांपूर्वी झाल्याचे मानले जाते. पूर्वी येथे कासार आणि घाडी समाज राहत होता. सुमारे 200 वर्षांपूर्वी अंबाळकर उर्फ कदम हे कासारडे जांभळवाडी येथून तर मोरे हे जावळी (पैठण) येथून येथे स्थलांतरित झाले.

मौदे गाव

भौगोलिक स्थिती

[संपादन]

मौंदे गावाच्या —

  • पूर्वेला – मानमोडा डोंगर
  • उत्तरेला – देवाळी डोंगर
    देवाळी डोंगर
  • दक्षिणेला – भुत्याचा डोंगर
  • पश्चिमेला – अरुणा नदीवरील प्रकल्प
  • ईशान्येला – गाधाडा डोंगर

येथूनच अरुणा नदीचा उगम झालेला आहे. चिवरचा ओढा, उंबराचा ओढा, व्हाईनसकल आणि वागरोणी हे ओढे अरुणा नदीला मिळतात.

लोकसंख्या

[संपादन]
  • 2011 मधील लोकसंख्या – 384
  • 2025 मधील एकूण मतदार – 323
    • पुरुष – 149
      मानमोडा
    • स्त्रिया – 174
मौदे शाळेचे लेझीम पथक

वाड्या

[संपादन]
  • धनगरवाडी
  • गावठणवाडी
  • बौद्धवाडी
  • फासे मळी
  • कदमवाडी
  • वरची वाडी

गावातील बहुतेक घरे चिऱ्याची असून काही ठिकाणी अजूनही पारंपरिक मातीची घरे आहेत.

सफर मौद्याची

शेती

[संपादन]

येथे पावसावर आधारित शेती होते. सध्या घेतली जाणारी पिके —

  • भात
  • नाचणी
    नाचणा खुडताना

पूर्वी घेतली जाणारी पारंपरिक पिके —

  • वरी
  • काळातीळ
  • हरिक
  • राळा
    नांगरणी
  • बरक

फळबागांमध्ये आंबा आणि काजूची लागवड केलेली आहे. तसेच गाई-म्हशी, शेळ्या आणि कोंबड्यांचे लहान प्रमाणात पालन केले जाते.

पाणीपुरवठा

[संपादन]

गावात तीन जुन्या विहिरी आहेत ज्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होतो. जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर बांधलेली असली तरी योजना अद्याप कार्यान्वित नाही.

मौदयाच्या वाटेवरील धबधबा

धार्मिक स्थळे

[संपादन]

गावात खालील प्रमुख मंदिरे आहेत —

  • बावचा देवीचे प्राचीन मंदिर – कोदा दगडाचे खांब, जंगली बुरम व फणस लाकूड वापरलेले बांधकाम, कोदा दगडातील दीपमाळ
    Temple decoration
  • गांगो देवाचे मंदिर
  • दत्त मंदिर
  • बौद्ध विहार
Mounde

शैक्षणिक सुविधा

[संपादन]
  • ग्रापंचायत – 7 सदस्य
  • एक अंगणवाडी
  • बालभवन विद्यामंदिर मौंदे (इयत्ता 1 ते 7)

गावात माध्यमिक शाळा नसून विद्यार्थ्यांना 12 किमी अंतरावर जावे लागते.

वनसंपदा

[संपादन]

गाव व सभोवतालचे जंगल समृद्ध आहे. मुख्य वृक्षप्रकार — जांभूळ, शिरस, किंजळ, ऐन, कळशेंगळ, शिवण, नान्या, धामण, कुंभळ, सुरंग, हेळा, हिरडा, सागवान, कोसम, खैर, आंबा.

औषधी वनस्पती — हासन, कळशेंगळ, इकारी, जांभूळ सातवीन, वर्ड, आवळा, शेगुल, रक्तवड, वावळा इत्यादी.

प्राणीजीव

[संपादन]

येथे विविध वन्य प्राण्यांचा वावर आहे — बिबट्या, गवे, सांबर, ससे, साळींदर, कोल्हा, कोळसुंद्रा, गेळ्या, खवले मांजर, मुंगूस, माकडे, वानर. सापांच्या विविध जाती — घोणस, नाग, अजगर, मन्यार इत्यादी.

मौदयातील सजीव संपन्नता

संस्कृती आणि सण

[संपादन]
  • होळी – सर्वात मोठा सण. मुंबईहून चाकरमानी परत येतात. बावचा देवी मंदिराभोवती उत्सव, मांड उभा करणे, पालखी नाचवणे.
  • गणेशोत्सव
  • टिप्पर
  • दसरा
  • सप्ताह

इतर लहान-मोठ्या जत्रा-उत्सवांसह सर्व सण उत्साहात साजरे होतात.

समस्या

[संपादन]
  • उन्हाळ्यात पाण्याची टंचाई
  • मोबाईल नेटवर्क नाही
  • दुर्गम भाग असल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था
फणसासह बालचामू
बावचादेवी मंदिर

संदर्भ

[संपादन]