मोहमद मोर्सी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मोहमद मोर्सी | |
|
|
|
| कार्यकाळ ३० जून २०१२ – ३ जुलै २०१३ |
|
| मागील | होस्नी मुबारक |
|---|---|
| पुढील | अब्देल फताह एल-सिसी |
|
|
|
| जन्म | २० ऑगस्ट, १९५१ अल शार्किया, इजिप्त |
| राजकीय पक्ष | मुस्लिम बंधुत्व |
| धर्म | सुन्नी इस्लाम |
मोहमद मोर्सी (अरबी: محمد مرسي عيسى العياط;) (जन्म: २० ऑगस्ट १९५१) हा इजिप्त देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २०११ सालच्या इजिप्तमधील क्रांतीनंतर हुकुमशहा होस्नी मुबारकची सत्ता उलथवून टाकण्यात आली. मे-जून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून ३० जून २०१२ रोजी मोर्सी इजिप्तचा पहिला लोकशाही मार्गाने निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष बनला.
सत्तेवर आल्यानंतर मोर्सीने इजिप्तच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या व इतर कारणांस्तव जनतेमध्ये अप्रिय बनलेल्या मोर्सीला केवळ एका वर्षानंतर जून २०१३ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्ता सोडावी लागली.