मोरकंठी लिटकुरी
शास्त्रीय नाव | Eumyias thalassina (Swainson) |
---|---|
कुळ | जल्पकाद्य (Muscicapidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Verditer Flycatcher |
संस्कृत | मयूरग्रीव शलभाश |
हिंदी | मोरगला पतेना |
वर्णन
[संपादन]मोरकंठी लिटकुरी हा साधारण १५ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नर गडद हिरवट-निळ्या रंगाचा असतो आणि त्याची चोच व डोळ्यामधील भाग काळा असतो तर मादी आणि अर्धविकसीत नर थोड्या फिकट रंगाचे त्यावर राखाडी झाक असलेले असतात. हवेत उडत असणारे कीटक पकडण्यात पटाईत असल्यामुळे या वर्गातील पक्ष्यांना इंग्रजीत Flycatcher तर चंचल स्वभावामुळे मराठीत नाचरे पक्षी असे म्हणतात.
वास्तव्य/आढळस्थान
[संपादन]मोरकंठी लिटकुरी राजस्थानचा शुष्क प्रदेश सोडून हिमालयाच्या १ ते ३ हजार मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशासह उर्वरीत भारतभर सर्वत्र आढळतो तसेच पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.
खाद्य
[संपादन]हा पक्षी मध्यम उंचीच्या झाडांपासून ते जमिनीपर्यंत सर्वत्र कीटक शोधत, जोडीने किंवा इतर नाचऱ्या (नर्तक) पक्ष्यांसोबत फिरतो.
प्रजनन काळ
[संपादन]साधारणपणे एप्रिल ते जुलै हा या पक्ष्यांचा प्रजनन काळ आहे. यांचे घरटे झाडांच्या उघड्या पडलेल्या मूळांमध्ये, घरांच्या भिंतीतील छिद्रात वगैरे तयार केले जाते. मादी एकावेळी ३ ते ४ फिकट गुलाबी रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनाची सर्व कामे मोरकंठी लिटकुरी नर-मादी मिळून करतात.
चित्रदालन
[संपादन]-
पूर्ण वाढ झालेला नर
-
पूर्ण वाढ होण्याआधीची स्थिती
-
उन्हाळ्यात हिमालयात दिसून येणारा पक्षी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |