मोनिका (अभिनेत्री)
Indian actress | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | ऑगस्ट २५, इ.स. १९८७ कोट्टायम | ||
|---|---|---|---|
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| |||
मोनिका (जन्म नाव: रेखा मारुतिराज) ही एक भारतीय माजी अभिनेत्री आहे, जिने प्रामुख्याने तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले.[१] १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करणारी मोनिका बहुतेकदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली. २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात तिने मुख्य भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ती अजाघी, इमसाई अरसन २३ पुलिकेसी आणि सिलंधी या तमिळ भाषेतील चित्रपटांमधील अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
२०१२ मध्ये, तिने मल्याळम चित्रपटात काम करतेवेळी तिचे नाव बदलून परवाना असे ठेवले.[२] २०१४ मध्ये, तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव बदलून एमजी रहिमा असे ठेवले. याच सोबत तिने अभिनय सोडल्याची घोषणा देखील केली.[३]
३० मे २०१४ रोजी, इस्लाम धर्म स्वीकारताना मोनिकाने तिचे नवीन नाव एमजी रहीमा असे ठेवले. ज्यात एम म्हणजे मारुती राज (वडील) आणि जी म्हणजे ग्रेसी (आई) असे लघुरूप घेतल्या गेले.[४][५] मोनिकाचे वडील हिंदू आहेत आणि आई ख्रिश्चन आहे.[६]
रहिमाने चेन्नई येथील उद्योजक मलिकशी लग्न केले, जो मूळचा सेलमचा आहे. मलिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात आणि निर्यातीचा व्यवसाय करतो.[७]
संदर्भ
[संपादन]- ^ Kalki interview
- ^ Monica will be Parvana in Mollywood. The Times of India (15 January 2017). Retrieved 2 June 2021.
- ^ Monica: Monica converts to Islam and quits films. The Times of India (16 January 2017) Retrieved on 2 June 2021.
- ^ Sameer (19 October 2015). "Tamil actress Monika converts to Islam and quits cinema". The Siasat Daily – Archive (इंग्रजी भाषेत). 20 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Film star plans marriage after embracing Islam". Arab News (इंग्रजी भाषेत). 3 June 2014. 20 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Another Indian Actress Converts to Islam, quits films. Jafria News. 4 June 2014
- ^ "Rahima ties the knot". 11 January 2015. 19 January 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 January 2015 रोजी पाहिले.