मोदेना
Italian city and municipality | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| Patron saint |
| ||||
| स्थान | मोडेना प्रांत, एमिलिया-रोमान्या, इटली | ||||
| Visitor center |
| ||||
| महत्वाची घटना |
| ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| मागील |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
मोदेना हे इटलीमधील एमिलिया-रोमान्या प्रदेशातील एक ऐतिहासिक शहर आणि याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर प्रामुख्याने तेथील समृद्ध पाककला, ऑपेरा गायकी आणि जगातील प्रसिद्ध स्पोर्ट्स कार निर्मिती केंद्रांसाठी ओळखले जाते. युनेस्कोने १९९७ मध्ये मोदेना येथील कॅथेड्रल, तोरे सिव्हिका आणि पियाझ्झा ग्रांदे या स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे.[१]
इतिहास
[संपादन]मोदेनाचा इतिहास प्राचीन काळापासून सुरू होतो. रोमन कालखंडात हे शहर मुतिना या नावाने ओळखले जात असे. इ.स.पू. १८३ मध्ये हे शहर एक रोमन वसाहत म्हणून उदयास आले. मध्ययुगात मोदेना हे स्वतंत्र कम्युन झाले आणि नंतर १२८८ मध्ये ते एस्ते घराण्याच्या आधिपत्याखाली आले. १५९८ मध्ये फेरारा हे शहर कॅथोलिक चर्चने ताब्यात घेतल्यावर एस्ते घराण्याने आपली राजधानी मोदेना येथे हलवली आणि हे शहर मोदेनाची डची आणि रेजो एमिलियाची राजधानी झाले.[२]
मेदिची घराण्याशी संबंध
[संपादन]मोदेनाचा इतिहास फिरेंझेच्या शक्तिशाली मेदिची घराण्याशी जवळून जोडलेला आहे. सोळाव्या शतकात राजकीय सत्ता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एस्ते आणि मेदिची घराण्यांमध्ये अनेक विवाह संबंध झाले होते. यात १५५८ मध्ये फिरेंझेचा ग्रँड ड्युक कोसिमो पहिला मेदिची याची मुलगी लुक्रेझ्झिया दे मेदिची हिचा विवाह मोदेनाचा ड्युक अल्फोन्सो दुसरा एस्ते याच्याशी झाला होता. या विवाहाने इटलीयामधील या दोन प्रभावशाली घराण्यांना एकत्र आणले आणि मोदेनाच्या राजकारणात मेदिची घराण्याचा प्रभाव वाढला.[३]
भूगोल आणि हवामान
[संपादन]मोदेना हे शहर पो नदीच्या खोऱ्यात वसलेले असून ते सेकिया आणि पनारो या दोन नद्यांच्या मध्ये आहे. शहराचे हवामान हे दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथील उन्हाळा उष्ण असतो आणि हिवाळा थंड असतो व येथे अनेकदा धुके पसरलेले असते.
लोकसंख्या
[संपादन]२०२५ च्या सुमारास मोदेनाची लोकसंख्या १,८४,७३९ असून तेथील लोकसंख्या घनता १,००८/चौ.किमी. आहे. २०११ मध्ये येथील १८ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचे प्रमाण १६.२ टक्के होते, तर निवृत्त झालेल्या लोकांचे प्रमाण २२.५ टक्के होते. याची तुलना इटलीच्या सरासरी १८.१ टक्के (अल्पवयीन) आणि १९.९ टक्के (निवृत्तीवेतनधारक) केल्यास मोदेनामधील सेवारत व्यक्तींचे प्रमाण कमी दिसते. मोदेना येथील रहिवाशांचे सरासरी वय ४४ वर्षे (इटलीची सरासरी ४२ वर्षे) आहे. २०११ ते २०२१ दरम्यान मोदेनाच्या लोकसंख्येत ३.२ टक्क्यांनी वाढ झाली, तर संपूर्ण इटलीयाच्या लोकसंख्येत ०.७ टक्क्यांनी घट झाली होती. मोदेनाचा सध्याचा जन्मदर दर १,००० रहिवाशांमागे ९.६२ आहे, तर इटालियाची सरासरी ९.४५ आहे.
२००६ च्या सांख्यिकीनुसार येथील लोकसंख्येपैकी ८९.६ टक्के लोक इटालियन होते. परदेशी लोकांचा सर्वात मोठा गट युरोपमधील इतर भागांतून (प्रामुख्याने रोमेनिया आणि आल्बेनिया) आला आहे: ३.९ टक्के. त्यानंतर उत्तर आफ्रिका: २.४ टक्के आणि उप-सहारा आफ्रिका: १.९ टक्के असा क्रम लागतो.
प्रख्यात व्यक्ती
[संपादन]- वित्तोरियो बेलेंटानी (१९०६–१९६८), अभियंता आणि कारशर्यत चालक
- मोदेनाचा आरोन बेरेचिया (१५४९–१६३९), ज्यू कबालिस्ट आणि लेखक[४]
- मॉरिझियो सेरेसोली (जन्म १९८३), कारशर्यत चालक
- ज्युसेप्पे कास्टाग्नेटी (१९०९–१९६५), रोमन कॅथोलिक राजकारणी
- अब्राहाम बेन डॅनियल (१५११–१५७८), कवी आणि रब्बी
- एन्झो फेरारी (१८९८–१९८८), फेरारीचे संस्थापक
- मिरेला फ्रेनी (१९३५–२०२०), ऑपेरा सोप्रानो गायिका
- फ्रांसेस्को गुचिनी (जन्म १९४०), गायक आणि गीतकार
- स्टेफानो मोदेना (जन्म १९६३), कारशर्यत चालक
- लुचियानो पाव्हरोत्त्ती (१९३५–२००७), ऑपेरा टेनर गायक
- अब्राहाम रोव्हिगो (१६५०–१७१३), ज्यू कबालिस्ट, रब्बी आणि विद्वान.
- सेर्जियो सिघिनोल्फी (१९२५–१९५६), कारशर्यत चालक
अर्थव्यवस्था आणि उद्योग
[संपादन]मोदेनाला जगाची मोटार राजधानी म्हणून संबोधले जाते. जगातील सर्वात महागड्या आणि वेगवान गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची मुख्यालये मोदेना किंवा त्याच्या आसपास आहेत. यामध्ये खालील कंपन्यांचा समावेश होतो:
- फेरारी: एन्झो फेरारी यांचा जन्म याच शहरात झाला होता आणि त्यांचे संग्रहालय येथे आहे.
- मासेराती
- लॅम्बोर्गिनी
- पागानी
याव्यतिरिक्त येथे अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. पारंपारिक बाल्सॅमिक व्हिनेगर हे फक्त याच भागात तयार केले जाते.
निवडक प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- मोदेना कॅथेड्रल: हे रोमन वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते.
- पालाझ्झो दुकाले: एस्ते घराण्याचे हे भव्य निवासस्थान आता लष्करी अकादमी म्हणून वापरले जाते.
- आन्झो फेरारी संग्रहालय: फेरारी कंपनीच्या इतिहासावर आधारित हे एक आधुनिक संग्रहालय आहे.
जुळी शहरे
[संपादन]मोदेनाचे खालील शहरांशी जुळेशहर संबंध आहेत:[५][६]
अल्माटी, कझाकस्तान
बेन्क्सी, चीन
हायलँड पार्क, इलिनॉय, युनायटेड स्टेट्स
लिंत्झ, ऑस्ट्रिया
लोंद्रिना, ब्राझील
नोव्ही साद, सर्बिया
सेंट पॉल, मिनेसोटा, युनायटेड स्टेट्स
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Cathedral, Torre Civic and Piazza Grande, Modena". UNESCO World Heritage Centre. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Modena - History, Culture & Engines". Britannica. १२ मार्च २०२६ रोजी पाहिले.
- ↑ Murphy, Caroline P. (२००८). Murder of a Medici Princess. Oxford University Press. ISBN 978-0195314397.
- ↑ "Modena, Italy". Jewish Virtual Library. 2 July 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Gemellaggi e Reti nazionali ed europee". comune.modena.it (इटालियन भाषेत). Modena. 2019-09-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-16 रोजी पाहिले.
- ↑ "Sister Cities". visitlakecounty.org. Highland Park. 2019-12-16 रोजी पाहिले.
