मेलानिया ट्रम्प
मेलानिया ट्रम्प [a] (२६ एप्रिल, १९७०:नोव्हो मेस्तो, स्लोव्हेनिया, युगोस्लाव्हिया - ) या स्लोव्हेनियन-अमेरिकन मॉडेल आणि धंदेवाईक महिला आहे. या डॉनल्ड ट्रम्प यांच्या पत्नी म्हणून २०१७-२०२१ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.
मेलानिया ट्रम्पचे लहानपण स्लोव्हेनिया (तेव्हा युगोस्लाव्हियाचा भाग) मध्ये गेले. त्यांनी मिलान आणि पॅरिस तसेच १९९६ पासून न्यू यॉर्क शहरात फॅशन मॉडेल म्हणून काम केले. २००५मध्ये त्यांनी दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व आणि स्थावर मिळकतींचा व्यापारी डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी लग्न केले. त्यांना २००६मध्ये बॅरॉन नावाचा मुलगा झाला. त्यानंतर लगेचच त्यांनी अमेरिकन नागरिकत्व घेतले लुईसा अॅडम्स नंतर अमेरिकेत न जन्मलेल्या त्या दुसऱ्या अमेरिकन प्रथम महिला तर इंग्लिश मातृभाषा नसलेल्या पहिल्या आहेत. [b]
आपल्या पतीची सद्दी संपल्यानंतर मेलानिया ट्रम्प सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत. [१]
पूर्वजीवन, कुटुंब आणि शिक्षण
[संपादन]मेलानिया ट्रम्पचा जन्म मेलानिया क्नेव्ह्स नावाने नोव्हो मेस्टो, युगोस्लाव्हिया येथे झाला. युगोस्लाव्हियाचे विघटन झाल्यावर हे शहर स्लोव्हेनियाचा भाग झाले.[२] [३] तिचे वडील, व्हिक्टर क्नेव्ह्स सरकारी मालकीच्या वाहन निर्मात्या कंपनीच्या विक्रीस्थळांचे व्यवस्थापन करीत असत. [४] [५] तिची आई अमालिया सेव्हनिका येथील मुलांच्या कपड्यांवरील चित्रणे तयार करीत असे. [६] [७] सेव्हनिकामध्येच हे कुटुंब सरकारी गृहनिर्माण संकुल मध्ये राहत असे. [८]
मॉडेलिंग कारकीर्द
[संपादन]युरोप
[संपादन]मेलानियाने १५व्या वर्षी तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीला सुरुवातीस आपले क्नेव्हस हे आडनाव बदलून जर्मन वाटणारे क्नाउस असे करून घेतले. तिने काम शोधण्यासाठी युरोप धुंडाळले. [८] स्लोव्हेनियन फॅशन फोटोग्राफर स्टेन जेर्कोकडून छायाचित्रे काढून घेतल्यावर क्नाउसला सोळाव्या वर्षी व्यावसायिक काम मिळण्यास सुरुवात झाली. [९] [१०] अठराव्या वर्षी तिने मिलान, इटली येथील मॉडेलिंग एजन्सीशी करार केला. [११] क्नाउसने पॅरिस आणि मिलानमधील कंपन्यांसाठी मॉडेलिंग केले. तेथेच त्यांना आपले भावी पती डॉनल्ड ट्रम्पचा मित्र भेटला. त्याने क्नाउसला अमेरिकेत जाण्याचा सल्ला दिला. [१२] क्नाउस १९९६मध्ये मॅनहॅटनला गेल्या. [१२] [१३]
क्नाउसने १९९६मध्ये मॅक्स नियतकालिकाच्या जानेवारी १९९६ च्या अंकासाठी अर्धनग्न छायाचित्रे काढून दिली. [१४] त्यांनी जीक्यू मासिकाच्या जानेवारी २००० आवृत्तीमध्ये नग्न छायाचित्रे देखील छापवून आणली.[१५] डॉनल्ड ट्रम्पच्या मते असे करणे वेगळे किंवा गैर नाही. [१६] [१७]
न्यू यॉर्क
[संपादन]१९९६मध्ये मॅनहॅटनला आल्यावर ती[८] छायाचित्रकार मॅथ्यू एटानियनसोबत रहात असे. [१२] ती अमेरिकेत पर्यटन व्हिसा घेउन आली होती व त्यानुसार तिला काम करण्याची परवानगी नव्हती. असे असताही तिने सुमारे दहा ठिकाणी मॉडेलिंग करून २०,००० अमेरिकन डॉलर मिळवले. कालांतराने तीने एच-१बी व्हिसा घेतला.[८] [१८]
सप्टेंबर १९९८मध्ये, क्नाउस एका पार्टीत तत्कालीन-व्यापारी डॉनल्ड ट्रम्पला भेटल्या आणि त्यांनी एकमेकांना भेटणे सुरू ठेवले. [१९] त्यावेळी डॉनल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या पत्नी मार्ला मेपल्सपासून घटस्फोट घेण्याच्या खटल्यात होते. [२०] [२१] क्नाउस आणि ट्रम्प यांनी १९९९ हॉवर्ड स्टर्नच्या दूरचित्रवाणी कार्यक्रमात अश्लील मुलाखत देउन आपल्याकडेलक्ष वेधून घेतले. [५] [२२]
लग्न
[संपादन]क्नाउस आणि ट्रम्प यांचा साखरपुडा २००४ मध्ये झाला आणि २२ जानेवारी, २००५ रोजी, त्यांनी फ्लोरिडामधील पाम बीच शहरातील चर्चमध्ये अँग्लिकन पद्धतीने लग्न केले.[२३] [२४] हे तिचे पहिले आणि डॉनल्ड ट्रम्पचे तिसरे लग्न होते. [२४] [२५]
२० मार्च, २००६ रोजी तिने त्यांचा मुलगा बॅरन विल्यम ट्रम्पला जन्म दिला. [२६] [२७] याला अँकर बेबी असे म्हणले गेले आहे. या शिवाय तिला चार सावत्र मुले आहेत -- डॉनल्ड ट्रम्प जुनियर आणि एरिक ट्रम्प आणि सावत्र मुलगी इव्हान्का ट्रम्प हे डॉनल्डच्या पहिल्या बायको इव्हाना झेल्निकोवा पासून तर टिफनी ट्रम्प यांनी मार्ला मेपल्सशी केलेल्या दुसऱ्या लग्नापासून.
क्नाउस जुलै २००६ मध्ये अमेरिकन नागरिक झाल्यानंतर तिने आपले आई आणि वडीलांना नागरिक करून घेतले. इतरांनी केलेल्या या प्रकारच्या चेन मायग्रेशन विरुद्ध प्रचार करून डॉनल्ड ट्रम्पने मते मिळवली. [२८] [२९] [२८] [३०]
फेब्रुवारी २०१७मध्ये मेलानिया ट्रम्पने डेली मेल आणि जनरल ट्रस्ट या डेली मेल नावाच्या ब्रिटिश टॅब्लॉइडच्या मालकावर खटला दाखल केला. ऑगस्ट २०१६ च्या लेखात मेलानियाने अनेक वर्षांपूर्वी एस्कॉर्ट सेवेसाठी (धंदेवाईक सोबतीण) काम केल्याचा दावा केल्याने तिचे नुकसान झाले त्याबद्दल तिने १५ कोटी अमेरिकन डॉलरची भरपाई मागितली. एप्रिल २०१७मध्ये डेली मेलने आपला दावा खरा नसल्याचे म्हणले व २९ लाख डॉरची भरपाई दिली.[३१] [३२] [३३] [३४]
अमेरिकेची प्रथम महिला (२०१७-२०२१)
[संपादन]मेलानिया ट्रम्प २० जानेवारी, २०१७ रोजी अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [३५] [३६] त्यांनी व्हाइट हाउसमध्ये आपल्या पती बरोबर न राहता मॅनहॅटनमध्ये ट्रम्प टॉवरमध्ये आपला मुलगा बॅरनसोबत राहणे पसंत केले. [३७] [३८] वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टर मेरी जॉर्डनने २०२०मध्ये लिहिलेल्या चरित्रात हे उघडकीस आले की मेलानिया तिच्या आणि त्यांच्या मुलासाठी ट्रम्प यांच्या विवाहपूर्व करारामध्ये आपला फायदा करून घेण्यासाठी न्यू यॉर्कमध्ये राहिली. [३९]
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Lerer, Lisa; Rogers, Katie (2023-07-26). "The Very Private Life of Melania Trump". The New York Times (इंग्रजी भाषेत). 2023-07-28 रोजी पाहिले.
- ^ Collins, Lauren (May 9, 2016). "The Model American: Melania Trump is the exception to her husband's nativist politics". The New Yorker. November 19, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 3, 2016 रोजी पाहिले.
- ^ "O Melaniji je prvi poročal Dolenjski list" [The First to Report about Melania was Dolenjski List]. Dolenjski list [Lower Carniola Newspaper] (स्लोव्हेनियन भाषेत). November 10, 2016. November 11, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 11, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Melania Trump Biography: Model (1970–)". Biography.com (FYI / A&E Networks). November 21, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 22, 2016 रोजी पाहिले.
- ^ a b Greenhouse, Emily (August 17, 2015). "Vitamins & Caviar: Getting to Know Melania Trump". Bloomberg Politics. August 30, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 4, 2015 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Greenhouse17Aug" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Tednik CELJAN". Celjan.si. May 13, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 25, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Melania Trump: Slovenian Model Legend". April 13, 2016. July 17, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ a b c d Caroli, Betty Boyd (2019). "Chapter 11: The Ever-Changing Role of First Lady". First Ladies: The Ever Changing Role, from Martha Washington to Melania Trump (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-066913-3. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Caroli" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ "Melania Trump Juggles Motherhood, Marriage, and a Career Just Like Us". Parenting.com. January 14, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 18, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Stane Jerko – Fotograf, ki Je odkril Melanijo" [Stane Jerko, the Photographer Who Discovered Melania] (स्लोव्हेनियन भाषेत). April 24, 2016. November 9, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 18, 2020 रोजी पाहिले.
- ^ Charles, Marissa (August 16, 2015). "Melania Trump would be a First Lady for the Ages". New York Post. June 1, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 17, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b c Peretz, Evgenia (April 21, 2017). "Inside the Trump Marriage: Melania's Burden". Vanity Fair. July 18, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "VanityFair" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Ioffe, Julia (April 27, 2016). "Melania Trump on Her Rise, Her Family Secrets, and Her True Political Views: "Nobody Will Ever Know"". GQ. September 6, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 29, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Donald Trump responds to Melania's newly-surfaced racy photo shoot". Fox News. August 1, 2016. January 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 18, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Melania Trump – the First Lady in our nude photo shoot". GQ. November 8, 2016. June 18, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 18, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Melania Trump's girl-on-girl photos from racy shoot revealed". New York Post. August 1, 2016. June 7, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 10, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Melania Trump like you've never seen her before". New York Post. July 30, 2016. June 7, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 10, 2019 रोजी पाहिले.
- ^ Caldwell, Alicia; Day, Chad; Pearson, Jake (November 5, 2016). "Melania Trump Modeled in US Prior to Getting Work Visa". Associated Press. April 24, 2022 रोजी पाहिले.
- ^ {{स्रोत बातमी|last=Horowitz|first=Jason|url=https://www.nytimes.com/2016/09/01/fashion/donald-trump-melania-modeling-agent-paolo-zampolli-daily-mail.html%7Ctitle=When Donald Met Melanie, Paolo Was There|date=August 31, 2016|work=[[The न्यू यॉर्क टाइम्स|access-date=June 15, 2023|archive-url=https://web.archive.org/web/20171117190228/https://www.nytimes.com/2016/09/01/fashion/donald-trump-melania-modeling-agent-paolo-zampolli-daily-mail.html%7Carchive-date=November 17, 2017}}
- ^ "After The Gold Rush". Vanity Fair. September 1, 1990. January 12, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 1, 2016 रोजी पाहिले.
- ^ {{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nytimes.com/1993/12/21/nyregion/vows-it-s-a-wedding-blitz-for-trump-and-maples.html%7Ctitle=It's a Wedding Blitz for Trump and Maples|date=December 21, 1993|website=[[The न्यू यॉर्क टाइम्स|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190608055207/https://www.nytimes.com/1993/12/21/nyregion/vows-it-s-a-wedding-blitz-for-trump-and-maples.html%7Carchive-date=June 8, 2019|access-date=June 21, 2019}}
- ^ "Melania Trump: The unusual, traditional First Lady". BBC. February 9, 2017. July 10, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 25, 2018 रोजी पाहिले.
- ^ Donnelly, Shannon (January 23, 2005). "Donald Trump wedding: Vow wow". Palm Beach Daily News. November 25, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 25, 2016 रोजी पाहिले.
The beauty of The Episcopal Church of Bethesda-by-the-Sea was unadorned, with only giant bows fashioned from orchids and white roses at the end of each pew and simple but elegant white arrangements on the candlelit altar. The bride walked down the aisle carrying only an ancient rosary not to Lohengrin or Wagner, but to a vocalist singing Ave Maria in an exquisite soprano voice. The Reverend Ralph R. Warren performed the traditional Episcopalian service at the landmark church, which was filled to capacity.
- ^ a b Stoynoff, Natasha (January 23, 2005). "Donald Trump Weds Melania Knauss". People. July 24, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 17, 2015 रोजी पाहिले.
- ^ Gillin, Joshua (July 21, 2015). "The Clintons really did attend Donald Trump's 2005 wedding". Politifact (Tampa Bay Times/Miami Herald). August 27, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 21, 2015 रोजी पाहिले.
- ^ "The Donald's youngest son, Barron". Chicago Tribune. September 22, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 18, 2017 रोजी पाहिले.
- ^ Schneider, Karen S. (May 1, 2006). "Billion Dollar Baby: He Has Mom's Eyes, Dad's Lips, His Own Floor in Trump Tower and Doting Parents: Welcome to the World of Barron William Trump". People. September 25, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 7, 2015 रोजी पाहिले.
- ^ a b {{स्रोत बातमी|last=Correal|first=Annie|url=https://www.nytimes.com/2018/08/09/nyregion/melania-trumps-parents-become-us-citizens.html%7Ctitle=Melania Trump's Parents Become U.S. Citizens, Using 'Chain Migration' Trump Hates|last2=Cocharne|first2=Emily|date=August 9, 2018|work=[[The न्यू यॉर्क टाइम्स|access-date=April 24, 2022}}
- ^ Bennett, Kate (July 15, 2019). "Melania Trump silent as her husband attacks congresswomen by implying they aren't US citizens". CNN. July 19, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 20, 2019 रोजी पाहिले.
- ^ "First lady Melania Trump sponsored parents' green card application: Sources". ABC News. August 9, 2018. January 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 8, 2020 रोजी पाहिले.
Viktor and Amalija Knavs were naturalized as U.S. citizens on Thursday.
- ^ Puente, Maria (February 7, 2017). "Melanie Trump's 'Daily Mail' Lawsuit: A FLOTUS First?". USA Today. February 10, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 10, 2017 रोजी पाहिले.
- ^ Reid, Paula (February 7, 2017). "Melania Trump libel suit settled, another filed". CBS News. February 9, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 10, 2017 रोजी पाहिले.
- ^ "UK's Daily Mail to Pay Melania Trump Damages over Modeling Claims". Reuters. April 12, 2017. April 12, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 12, 2017 रोजी पाहिले.
- ^ Paiella, Gabriella (April 12, 2017). "Melania Trump's Daily Mail Lawsuit Settled for $2.9 Million". Out. April 12, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 12, 2017 रोजी पाहिले.
- ^ Diamond, Jeremy (November 10, 2016). "America, meet your new first lady". CNN. November 20, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Louisa Adams – First Ladies". History (American TV network). October 26, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 19, 2016 रोजी पाहिले.
- ^ "Melania, Barron Trump to remain in NYC until end of school year". Fox News Channel. November 20, 2016. November 28, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 29, 2016 रोजी पाहिले.
- ^ Andrews-Dyer, Helena (November 20, 2016). "Donald Trump confirms that wife Melania and son Barron will stay in New York after the presidential inauguration". The Washington Post. November 21, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 20, 2016 रोजी पाहिले.
- ^ Haberman, Maggie (June 20, 2020). "Book Says Melania Trump Delayed Washington Move as Negotiating Tack". The New York Times. January 14, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 8, 2020 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.