मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात सार्वजनिक परिवहन वापरण्यासाठी ट्रॅम, बस, रेल्वे हे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व सेवांचे खाजगीकरण झाले असून अनुक्रमे यारा ट्रॅम, नॅशनल बस(व इतर) व कॉनेक्स या कंपन्या या सेवा चालवतात. या सर्व परिवहन सेवांसाठी एकच तिकिट काढावे लागते. मात्र कोणत्याही वाहनात चढल्यावर तिकिट पंच करणे आवश्यक आहे. सार्वजनिक परिवहनासाठी शहराचे झोन १ व झोन २ असे विभाग पाडले आहेत. झोन १ हा शहराजवळ आहे तर झोन २ हा शहरापासून दुरचा भाग आहे. तिकिटाचे दर झोन २ मध्ये अधिक आहेत. आंतरजालावर मेटलिंक (इंग्रजी: metlink) या संस्थेच्या मेटलिंकमेलबर्न या संकेतस्थळाद्वारे प्रवासाची आखणी आधीच करून घेता येते. एकच तिकिट सर्व ठिकाणी चालत असल्याने प्रवास करणे सुलभ आहे. मात्र सकाळी व सायंकाळी या कार्यालयीन कामकाज भरण्या-सुटण्याच्या वेळी गर्दी असु शकते. साधारण पणे रात्री १ वाजे नंतर बहुतेक सावजनिक परिवहनाची साधने बंद होतात. काही ठिकाणी नाईट रायडर Archived 2007-08-29 at the Wayback Machine. ही सेवा मात्र सुरू असते.

सदर्न क्रॉस स्टेशन हे मेलबर्न शहरातले मुख्य रेल्वे स्थानक आहे. मुख्य शहरांना जोडण्याऱ्या गाड्या सुटतात. तसेच टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाला जोडणारी स्कायबस सेवा येथूनच सुटते.