Jump to content

मेरी हेलेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी हेलेन - (जन्म - जॉर्जिया, यूएसए, मृत्यू - ७ फेब्रुवारी १९९८) श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या एक अमेरिकन अनुयायी. छायाचित्रकार, लेखिका, चित्रकार, वनस्पती-अभ्यासक

जीवन व कार्य

[संपादन]

मेरी हेलेनचा जन्म कोलंबस, जॉर्जिया, यूएसए येथे झाला. वडील अमेरिकन सैन्यात कर्नल होते आणि मेरी बालपणात लिबिया आणि जपानसह अनेक देशांमध्ये राहिल्या होत्या.

मेरी यांना तरुण वयातच श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याविषयी माहिती मिळाली व ऑगस्ट १९६६ मध्ये श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या भारतात आल्या. १९६८ मध्ये ऑरोविलच्या उद्घाटनासाठी त्या पुन्हा श्रीअरविंद आश्रमात आल्या. त्यांनी ऑरोविल माहिती आणि डिझाइन कार्यालयात काही महिने काम केले. काही वर्षे अमेरिकेत परतल्यानंतर त्या पुन्हा १९७१ मध्ये आश्रमात परतल्या. पुढे त्यांनी ऑरोविल येथे मातृमंदिर गार्डन्सच्या नर्सरीमध्ये १० वर्षे काम केले. त्यांनी वनस्पतींच्या असंख्य प्रजाती गोळा केल्या आणि त्यांचा अभ्यास केला. त्यांनी उष्णकटिबंधीय वनस्पतींवर संशोधन केले होते.

त्यांनी ऑरोविलच्या प्रगतीची माहिती देणारे प्रोग्रेस नावाचे एक नियतकालिक सुरू केले. [][]

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • 'फ्लॉवर्स अँड देअर मेसेजेस' - श्रीमाताजींनी फुलांना जे आध्यात्मिक अर्थ प्रदान केले होते त्याचे संकलन असणाऱ्या 'फ्लॉवर्स अँड देअर मेसेजेस' या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसाठी अनेक रेखाचित्रे मेरी यांनी काढली.
  • द हँडबुक ऑन प्लुमेरिया कल्चर - सहलेखक रिचर्ड एगनबर्गर ऊर्फ नारद
  • द हँडबुक ऑन ऑलिंडर्स - सहलेखक रिचर्ड एगनबर्गर ऊर्फ नारद
  • लेक्सिकाॅन ऑफ ॲन इन्फिनिट माइंड - सहलेखक रिचर्ड एगनबर्गर ऊर्फ नारद [][]

सन्मान

[संपादन]
  • २००१ मध्ये त्यांना दक्षिण कॅलिफोर्निया प्लुमेरिया सोसायटीचे आजीवन सदस्य होण्याचा मान देण्यात आला.
  • त्यांच्या सन्मानार्थ तीन फुलांना मेरी यांचे नाव देण्यात आले. बोगनविले सोसायटी ऑफ अमेरिका, अटलांटा, जॉर्जिया आणि हवाई येथील लोकांनी अनुक्रमे बोगनविले, फ्लॉक्स आणि प्लुमेरिया या फुलांना त्यांचे नाव दिले आहे.[]

पूरक

[संपादन]

पोएम्स टू मेरी हेलेन - लेखक रिचर्ड एगनबर्गर ऊर्फ नारद

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Mary Helen". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Auroville Today is Auroville's monthly news magazine since 1988. | Auroville Today". auroville.today. 2025-03-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Amazon.com: Lexicon of an Infinite Mind: A Dictionary of Words and Terms in Sri Aurobindo's Savitri (9781495433986): Richard Eggenberger (Narad), Mary Helen Eggenberger: Books". www.amazon.com. 2025-03-09 रोजी पाहिले.