Jump to content

मेरी कार्टराइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी ल्युसी कार्टराइट (१८ डिसेंबर, १९००३ एप्रिल, १९९८) या एक ब्रिटिश गणितज्ञ होत्या. त्या केम्ब्रिज विद्यापीठातील गर्टन कॉलेजच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी गणितात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले असून प्रामुख्याने क्लिष्ट विश्लेषणात त्यांचे काम मोठे आहे.

चरित्र

[संपादन]

कार्टराइटचे वडील विल्यम डिग्बी कार्टराईट हे ख्रिश्चन पादरी होते. मेरी कार्टराइटचे शिक्षण ऑक्सफर्डमधील सेंट ह्युज कॉलेजमध्ये झाले. त्यांनी तेथून गणितात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी जी.एच. हार्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून डी.फिल. पदवी मिळवली.[]

कारकीर्द

[संपादन]

त्यांनी जे.ई. लिटलवूड यांच्याबरोबर अनेक वर्षे काम केले. त्यांनी नॉन-लिनियर डिफरेंशियल इक्वेशन्स आणि पुढे केओस थियरीमध्ये काम केले. त्यांची अनेक गणितीय प्रमेये आजही अभ्यासात वापरली जातात.[]

त्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला गणितज्ञ होत्या. तसेच लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या पहिला महिला अध्यक्ष होत्या.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "मॅरी कार्टराईट यांचे चरित्र". सेंट अँड्र्यूज विद्यापीठ. २ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.
  2. "मॅरी ल्युसी कार्टराईट - ब्रिटानिका". एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. २ एप्रिल २०२६ रोजी पाहिले.