मेजर लीग क्रिकेट
| मेजर क्रिकेट लीग | |
|---|---|
|
| |
| देश | अमेरिका |
| आयोजक | अमेरिकन क्रिकेट एंटरप्राइजेस |
| प्रकार | ट्वेंटी२० |
| प्रथम | २०२३ |
| शेवटची | २०२५ |
| पुढील | २०२६ |
| स्पर्धा प्रकार | साखळी सामने आणि प्ले-ऑफ |
| संघ | ६ |
| सद्य विजेता |
एमआय न्यूयॉर्क (२रे विजेतेपद) |
| यशस्वी संघ | एमआय न्यूयॉर्क (२ विजेतीपदे) |
| सर्वाधिक धावा | फाफ डू प्लेसी (९३४) |
| सर्वाधिक बळी | ट्रेंट बोल्ट (४६) |
| संकेतस्थळ |
majorleaguecricket |
मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) तथा कॉग्निझंट मेजर लीग क्रिकेट[१][२] ही अमेरिकेतील एक व्यावसायिक ट्वेंटी२० (टी२०) क्रिकेट लीग आहे. यूएसए क्रिकेटने मंजूर केलेली ही स्पर्धा अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेस (एसीई) द्वारे आयोजित केली जाते. २०२३ मध्ये सुरू झालेल्या या लीगमध्ये सहा शहरांमधील संघ भाग घेतात. हे संघ प्रत्येक शहराचे एकमेव प्रतिनिधी असून खाजगी गुंतवणूकदार यांचे मालक आहेत.
या स्पर्धेचा पहिला हंगाम टेक्सासच्या ग्रँड प्रेरी येथील ग्रँड प्रेरी स्टेडियम आणि उत्तर कॅरोलिनाच्या मॉरिसव्हिल येथील चर्च स्ट्रीट पार्क मैदाना सुमारे तीन आठवडे चालला. याची समाप्ती ३० जुलै २०२३ रोजी अंतिम सामन्यासह झाली. २०२५ मध्ये एमएलसीमध्ये अजून संघ शामिल करण्याची घोषणा केली गेली. यांत कॅलिफोर्नियामधील ओकलंड आणि फ्लोरिडाच्या लॉडरहिल शहरांचा समावेश असेल. ओकलंडमधील संघ ओकलंड कोलिझियम (एमएलबीच्या ओकलंड एझ आणि एनएफएलच्या ओकलंड रेडर्सचे जुने मैदान) येथे तर फ्लोरिडातील संघ सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क येथे स्थित असेल. चर्च स्ट्रीट पार्क मैदानात २०२५ च्या हंगामातील सामने खेळले गेले नाहीत.
२०२५ पर्यंत एमएलसीने तीन हंगाम पूर्ण केले आहेत. एमआय न्यू यॉर्क हे सध्याचे विजेते आहेत, त्यांनी २०२५ च्या अंतिम फेरीत वॉशिंग्टन फ्रीडमचा पराभव केला होता. एमएलसी २०२१पासून मायनर लीग क्रिकेट (एमआयएलसी) ही शिकाऊ लीग देखील चालवते.
संदर्भयादी
[संपादन]- ↑ "Cognizant Named As Major League Cricket Title Partner" [कॉग्निझंटला मेजर लीग क्रिकेट टायटल पार्टनर म्हणून नियुक्त केले]. बातम्या | कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Cognizant named as Major League Cricket title partner" [कॉग्निझंटची मेजर लीग क्रिकेट टायटल पार्टनर म्हणून निवड]. द टाइम्स ऑफ इंडिया. २७ जून २०२४. ISSN 0971-8257. 2025-07-29 रोजी पाहिले.