Jump to content

मेघनाद देसाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेघनाद देसाई हे एक विख्यात अर्थशास्त्रज्ञ होते.

मेघनाद देसाई
जन्म इसवी सन १९४०
बडोदा संस्थान, भारत
मृत्यू २९ जुलै २०२५ मंगळवार.
लंडन
निवासस्थान ब्रिटन
नागरिकत्व ब्रिटिश
वांशिकत्व भारतीय
धर्म धर्म
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र,लेखक
प्रशिक्षण पेनसिल्व्हानिया विद्यापीठ
ख्याती अर्थशास्त्रज्ञ
पुरस्कार पद्मभूषण,लॉर्ड

[]

बालपण व शिक्षण

[संपादन]

मेघनाद देसाई ह्यांचा इसवी सन १९४० मध्ये त्यावेळच्या बडोदा मध्ये जन्म झाला. इसवी सन १९६५ मध्ये त्यांनी पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र ह्या विषयात पीएचडी प्राप्त केली.

कारकीर्द

[संपादन]

इसवी सन १९६५ मध्ये ते लंडन येथे गेले.तेथे ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये व्याख्याते म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते प्राध्यापक आणि प्राध्यापक एमेरिटस ह्या पदावर कार्यरत राहिले.लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यापन केले. इसवी सन १९९१ मध्ये त्यांना मजूर पक्षातर्फे ब्रिटिश संंसदेत हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सदस्य पिअर म्हणून काम करावयाची संधी उपलब्ध झाली.

विविधांगी व्यक्तिमत्त्व

[संपादन]

ते अर्थशास्त्र विषयातील विविध शाखात काम करीत असत.अर्थशास्त्राबरोबरच त्यांनी राजकारण,इतिहास,चित्रपट,संस्कृती,जागतिकीकरण,खाजगीकरण ह्या विषयातसुद्धा सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी २०० पेक्षा जास्त संशोधन निबंध आणि २५ पुस्तके लिहिली. ते कृतिशील अर्थतज्ञ होते.ते पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते तर विकासाभिमुख जागतिकीकरण आणि खाजगीकरण आणि लोकाभिमुख विकासावर भर देणारे अर्थतज्ञ होते. त्यांची महत्त्वाची कारकीर्द ब्रिटनमध्ये गेली.तरीही त्यांनी भारताबरोबर नाळ जुळवून ठेवली. ते जितके ब्रिटन चे होते तितकेच ते भारताचे होते. ब्रिटन मधील गांधी स्मारकाचे ते अध्यक्ष होते.

पुरस्कार

[संपादन]

त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरव केला.

देहावसान

[संपादन]

मेघनाद देसाई ह्यांचे मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले. []

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, बुधवार,३० जुलै २०२५
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार ३१ जुलै २०२५