Jump to content

मॅकलेन (व्हर्जिनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅकलेन (व्हर्जिनिया)
census-designated place in the United States, unincorporated community
स्थापना1910 संपादन
अधिकृत नावMcLean संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानफेरफॅक्स काउंटी (व्हर्जिनिया) संपादन
प्रमाणवेळपूर्व प्रमाण वेळ विभाग संपादन
Located in the statistical territorial entityWashington metropolitan area संपादन
भौगोलिक गुणक३८°५५′४२″N ७७°१०′३१″W संपादन
Map

मॅकलेन हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील फेरफॅक्स काउंटीमधील एक वस्तीवजा शहर आहे.[] २०२० च्या अमेरिकेच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५०,७७३ इतकी होती.[] हे ठिकाण वॉशिंग्टन महानगर क्षेत्रांतर्गत पोटोमॅक नदी आणि व्हिएन्ना शहराच्या दरम्यान वसलेले आहे.

मॅकलेन हे वॉशिंग्टन, डी.सी., पेंटॅगॉन आणि सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या अगदी जवळ असल्याने येथे अनेक श्रीमंत नागरिक, राजनैतिक मुत्सद्दी, लष्करी अधिकारी, काँग्रेसचे सदस्य आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी राहतात. रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या पत्नी एथेल केनेडी यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेल्या हिकोरी हिल येथे आहे. याशिवाय अमेरिकन क्रांतियुद्धातील अधिकारी लाइट-हॉर्स हॅरी ली यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेले सॅलोना देखील येथेच आहे.

इतिहास

[संपादन]

या परिसराला द वॉशिंग्टन पोस्टचे माजी प्रकाशक आणि मालक जॉन राउल मॅकलेन यांचे नाव देण्यात आले आहे. १९०२ मध्ये त्यांनी स्टीवन बेंटन एलिकिन्स आणि फ्रेंच उमराव ज्याँ-पिएर गुएनार्ड यांच्यासोबत ग्रेट फॉल्स अँड ओल्ड डोमिनियन रेल्वेची सनद खरेदी केली. १९०६ मध्ये पूर्ण झालेला हा रेल्वेमार्ग या भागाला वॉशिंग्टन, डी.सी.शी जोडत असे. मॅकलेन यांनी ओल्ड डोमिनियन ड्राइव्ह आणि जुन्या चेन ब्रिज रोडच्या तिठ्यावरील एका रेल्वे स्थानाकाला आपले नाव दिले. याच्या बांधकामासाठी १,५०० डॉलर्स खर्च आला होता आणि त्यातील ५०० डॉलर्स स्थानिक लोकांकडून गोळा केले गेले होते.[] १९१० मध्ये लेविन्सव्हिल आणि लँगली या दोन वसाहतींचे विलीनीकरण होऊन मॅकलेनची अधिकृत स्थापना झाली.

भूगोल

[संपादन]

मॅकलेन हे उत्तर व्हर्जिनियामधील कॅपिटल बेल्टवे (इंटरस्टेट ४९५) वर स्थित आहे. मॅकलेनचा मध्यवर्ती भाग वॉशिंग्टन, डी.सी.च्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी (८ मैल) वायव्येला आणि फेरफॅक्स या काउंटी मुख्यालयापासून १४ किमी (९ मैल) ईशान्येला आहे.[]

जनसांख्यिकी

[संपादन]

साचा:US Census population

वंशीय आणि वांशिक रचना

[संपादन]
नियतकालिक रचना - मॅकलेन सीडीपी
वंश (नॉन-हिस्पॅनिक) २०२०[] २०१०[] २०००[] १९९०[] १९८०[]
श्वेत (व्हाइट) ६४.७%
(३२,८४५)
७५.४%
(३६,२७३)
८१.३%
(३१,६६७)
८४.८%
(३२,३७२)
८९.९%
(३२,०३९)
कृष्णवर्णीय (ब्लॅक / आफ्रिकन अमेरिकन) २%
(९९६)
१.८%
(८५१)
१.५%
(६०२)
१.७%
(६३५)
०.९%
(३०३)
अमेरिकन इंडियन ०.१%
(३०)
०.१%
(४८)
०.१%
(२९)
०.१%
(५६)
०.१%
(३९)
आशियाई (एशियन) २१%
(१०,६५८)
१४.९%
(७,१५६)
१०.६%
(४,१२४)
९.१%
(३,४८८)
४.८%
(१,७1७)
पॅसिफिक आयलँडर ०%
(१७)
०%
(१४)
०%
(१२)
इतर वंश ०.७%
(३५३)
०.३%
(१४५)
०.२%
(८१)
०%
(१४)
०.४%
(१५९)
बहुवंशीय (मल्टिरेशिअल) ५.६%
(२,८५६)
२.७%
(१,२९३)
२.२%
(८५०)
हिस्पॅनिक / लॅटिनो (कोणताही वंश) ५.९%
(३,०१८)
४.९%
(२,३३५)
४%
(१,५६४)
४.२%
(१,६०३)
३.९%
(१,३८५)

अर्थव्यवस्था

[संपादन]
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीचे मुख्यालय

'मार्स इनकॉर्पोरेटेड' आणि 'गिबो' यांसारख्या कंपन्यांची मुख्यालये मॅकलेनमध्ये आहेत.[१०] शेजारील टायसन्स परिसरातील अनेक व्यवसायांचा पत्ता वेस्ट मॅकलेन (पिन कोड २२१०२) च्या अंतर्गत येत असल्यामुळे ते अधिकृत दळणवळणासाठी मॅकलेन या नावाचा वापर करतात.

मॅकलेनच्या लँगली भागात सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) चे मुख्य केंद्र आहे. तसेच नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकांचे कार्यालय देखील येथेच स्थित आहे. अमेरिकेच्या वाहतूक विभागाचे 'टर्नर-फेरबँक हायवे रिसर्च सेंटर' देखील सीआयएच्या मुख्यालयाजवळच कार्यरत आहे.[११]

शिक्षण

[संपादन]
लँगली हायस्कूल हे मॅकलेनमधील प्रमुख सरकारी शाळांपैकी एक आहे

सार्वजनिक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा

[संपादन]

मॅकलेनमधील रहिवासी फेरफॅक्स काउंटी पब्लिक स्कूल्सच्या अखत्यारीत येतात. यामध्ये खालील शाळांचा समावेश होतो:

  • चेस्टरब्रुक, चर्चिल रोड, हेकॉक, केंट गार्डन्स, फ्रँकलिन शेर्मन आणि स्प्रिंग हिल प्राथमिक शाळा.[११]
  • जेम्स फेनिमोर कूपर मिडल स्कूल आणि हेन्री वड्सवर्थ लाँगफेलो मिडल स्कूल.[११]
  • लँगली हायस्कूल आणि मॅकलेन हायस्कूल.[११]

फॉल्स चर्च सिटी पब्लिक स्कूल्सच्या अंतर्गत येणारी माऊंट डॅनियल शाळा देखील मॅकलेनच्या हद्दीत आहे.[११][१२]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Kelly, John (2008). "New in Town, Stranger?". Local Pronunciations. 2008-07-17 रोजी पाहिले.
  2. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; "McLean CDP Profile" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. "Along the 0. D. Railroad". The Washington Post. July 7, 1920.
  4. "Virginia Official State Transportation Map – Cities in Detail". Virginia Department of Transportation. 2011-07-31 रोजी पाहिले.
  5. "HISPANIC OR LATINO, AND NOT HISPANIC OR LATINO BY RACE (2020)". data.census.gov. U.S. Census Bureau.
  6. "HISPANIC OR LATINO, AND NOT HISPANIC OR LATINO BY RACE (2010)". data.census.gov. U.S. Census Bureau.
  7. Virginia: 2000 (PDF). U.S. Census Bureau. pp. 50–51.
  8. Virginia: 1990 (PDF). U.S. Census Bureau. p. 41.
  9. General Social and Economic Characteristics: Virginia (PDF). U.S. Census Bureau. p. 39.
  10. "Locations ." Mars, Incorporated. Retrieved on September 1, 2009.
  11. 1 2 3 4 5 "McLean CDP, Virginia Archived 2011-04-30 at the वेबॅक मशीन. ." U.S. Census Bureau. Retrieved on September 1, 2009.
  12. "Contact Us ." Mount Daniel School. Retrieved on March 24, 2010.