मृगया
Appearance
1976 Indian film directed by Mrinal Sen | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार |
| ||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
मृगया हा १९७६ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे जो मृणाल सेन दिग्दर्शित आणि के. राजेश्वर राव निर्मित आहे. भागवती चरण पाणिग्रही यांच्या शिकार या ओडिया लघुकथेवर हा आधारित आहे.[१] या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि ममता शंकर यांची भूमिका आहे; व दोघेही या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
चित्रपटाचे संगीत सलील चौधरी यांनी दिले होते, तर के.के. महाजन यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली होती. २४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, मृगयाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि मिथुन चक्रवर्तीला सर्वोत्कृष्ट अभिनेता असे दोन पुरस्कार मिळाले. १९७७ मध्ये १० व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण पुरस्कारासाठी नामांकन मिळण्याव्यतिरिक्त, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेर समीक्षक पुरस्कार देखील मिळाला.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ Gulazāra; Nihalani, Govind; Chatterjee, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi Cinema (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-066-5.
- ^ "Complete list of winners of Filmfare Awards 1977". The Times of India. August 27, 2013 रोजी पाहिले.
- ^ Kohli, Suresh (13 December 2012). "Mrigayaa (1976)". The Hindu. 11 February 2015 रोजी पाहिले.