Jump to content

मुसंदम द्वीपकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुसंदन द्वीपकल्प (अरबी: جَزِيْرَة مُسَنْدَم \ رَأْس مُسَنْدَم; जझिरात मुसंदम) किंवा रुऊस अल जिबाल (अरबी:رُؤُوْس ٱلْجِبَال; पर्वतशिखरे)[] हा अरबी द्वीपकल्पाचा डोंगराळ ईशान्य टोकावरील प्रदेश आहे आहे. याच्या पश्चिमेला इराणचे आखात आणि पूर्वेला ओमानचे आखात आहेत; तर उत्तरेला यांना जोडणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे. या प्रदेशाचे राजकीय नियंत्रण संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात विभागलेले आहे.

इतिहास

[संपादन]

ऐतिहासिक काळात मुसंदम द्वीपकल्पावर अनेक आक्रमणे झाली. अखमनी साम्राज्यसासानी साम्राज्यांनी येथे आपला तळ बसविण्याचा नेहमी प्रयत्न केला. इस्लामिक कालखंड सुरू होईपर्यंत या साम्राज्यांचा ऱ्हास झाला होता. इस्लामी सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर पोर्तुगीज आणि इतर भुरट्या सत्तांनी येथे असेच प्रयत्न केले.

आधुनिक कालखंड

[संपादन]

आधुनिक काळातही या द्वीपकल्पावर परकीय ताबा सुरूच राहिला. १५०७ मध्ये अफोन्सो डी अल्बुकर्क याने ओमानच्या किनारपट्टीवरील सूर, मस्कत आणि खासाब यांसारखी महत्त्वाची ठिकाणे काबीज केली.[][] तेव्हापासून १६५० पर्यंत, पोर्तुगीजांनी खासाबचा वापर खजुराच्या व्यापारासाठी पुरवठा केंद्र म्हणून आणि त्यांच्या जहाजांसाठीचे सुरक्षित बंदर म्हणून केला. १६०० च्या दशकाच्या सुरुवातीस स्थानिक टोळ्यांनी भागातील पोर्तुगीजांना हाकलणे सुरू केले. १६२२ मध्ये सफावींनी पोर्तुगीजांकडून हॉर्मुझ बेट परत मिळवल्यानंतर तीस वर्षांनी ओमानच्या यारुबिद घराण्यातील इमाम नासिर बिन मुर्शिद आणि इमाम सुलतान बिन सैफ यांनी मुसंदन द्वीपकल्प जिंकून घेतला.[]

१९व्या शतकात ब्रिटिशांनी ट्रुशियल स्टेट्सचा भाग म्हणून हा परिसर व्यापला आणि १८९१ मध्ये मस्कत आणि ओमान हे ब्रिटिश संरक्षित राज्य बनले.[] खासाबचा प्रदेश बंदरासाठी योग्य नसल्यामुळे आणि अत्यंत कडक हवामानामुळे वसाहतीसाठी प्रतिकूल असल्याने त्याचा फारसा विकास झाला नाही. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात संयुक्त अरब अमिरातीची स्थापना झाली. या भागातील बहुतेक अमिराती त्यात सामील झाल्या. रास अल खैमा सुरुवातीला या राष्ट्राचा भाग नव्हते.[][] अखेरीस १९७२ मध्ये ते अमिरातीत सामील झाले. यादरम्यानच्या वाटाघाटींमध्ये मुसंदन द्वीपकल्प ओमानला देण्यात आला.

भूगोल

[संपादन]
हे सुद्धा पहा: ओमानचा भूगर्भशास्त्र, संयुक्त अरब अमिरातीचा भूगर्भशास्त्र, ओमानचा भूगोल, आणि संयुक्त अरब अमिरातीचा भूगोल
मुसंदन द्वीपकल्पाचा भूरचनात्मक नकाशा, ज्यामध्ये एल्फिन्स्टन खाडी आणि माल्कम खाडी दिसत आहेत

हा द्वीपकल्प हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिणेस, इराणचे आखात आणि ओमानचे आखात यांच्या मध्ये आहे.[] शिहूह जमातीचे लोक येथे राहतात. या प्रदेशाचा मुख्य भाग ओमानच्या मुसंदन प्रशासकीय विभागांतर्गत येतो, तर काही भाग संयुक्त अरब अमिरातीच्या नियंत्रणाखाली आहे. अमीरातींमधील मुसंदम द्वीपकल्प रस अल खैमा आणि दिब्बामध्ये आहे.[][]

येथील प्रमुख भूरूपांमध्ये पश्चिम हजर पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतरांगा हजर रांगेच्या सर्वात उत्तरेकडील भाग आहे. या पर्वतरांगेच्या शिखरांवरून या द्वीपकल्पाला रुऊस अल जिबाल असेही म्हणले जाते.[][] वाडी बीह ही मुसंदनमधील सर्वात मोठी वाडी असून हा प्रदेश येथील मुख्य जलनिस्सारण खोरे आहे.[१०][११] जबल हरिम हे मुसंदन आणि रुऊस अल जिबालमधील सर्वात उंच शिखर आहे.

हवामान

[संपादन]
हे सुद्धा पहा: ओमानचे हवामान आणि संयुक्त अरब अमिरातीचे हवामान

हिवाळ्यात या प्रदेशात, विशेषतः जैस, यानास आणि मेब्राह या पर्वतीय भागात हवामान बऱ्यापैकी थंड असू शकते.[१२][१३]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Thomas, B. (March 1927). Travels in Oman. Visit of B. Thomas to the Musandam Peninsula. 1928. Notes on Shihuh dialects & people, also Kumzaris' [10r]. British Library: India Office Records and Private Papers. p. 9.
  2. 1 2 "Portuguese Era – NLA". www.nla.ae. 2026-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-02-15 रोजी पाहिले.
  3. "Oman (09/04)". U.S. Department of State. 2026-02-15 रोजी पाहिले.
  4. "History of Oman | Royal Air Force of Oman". RAF Museum (इंग्रजी भाषेत). 2026-02-15 रोजी पाहिले.
  5. Sterling, Jade (25 May 2022). "Lessons from Operation Intradon in the Musandam". Khalifa University. 17 March 2026 रोजी पाहिले.
  6. Yates, Athol; Hughes, Geraint (2022-10-03). "Operation Intradon in the Musandam, 1970–1971: what this counterinsurgency operation says about British military operations in the Arabian Gulf". Small Wars & Insurgencies (इंग्रजी भाषेत). 33 (7): 1236–1258. doi:10.1080/09592318.2022.2066305. ISSN 0959-2318.
  7. Diba, B. A. (2011). Is Iran legally permitted to close Strait of Hormuz to countries that impose sanctions against Iran's oil?. Cupertino, California: Payvand Iranian-American Website. 2021-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-05-12 रोजी पाहिले.
  8. 1 2 Edmonds, J.-A.; Budd, K. J.; Al Midfa, A.; Gross, C. (2006). "Status of the Arabian Leopard in United Arab Emirates" (PDF). Cat News (Special Issue 1): 33–39. 2020-10-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2026-05-12 रोजी पाहिले. Unknown parameter |name-list-style= ignored (सहाय्य)
  9. 1 2 Spalton, J. A.; Al-Hikmani, H. M. (2006). "The Leopard in the Arabian Peninsula – Distribution and Subspecies Status" (PDF). Cat News (Special Issue 1): 3–47. 2020-10-19 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2026-05-12 रोजी पाहिले. Unknown parameter |name-list-style= ignored (सहाय्य)
  10. Lancaster, Fidelity; Lancaster, William (2011). Honour is in Contentment: Life Before Oil in Ras Al-Khaimah (UAE) and Some Neighbouring Regions. Berlin, New York City: Walter de Gruyter. pp. 3–598. ISBN 978-3-1102-2339-2.
  11. Allen, Calvin H. Jr. (2016-02-05). "1: Land and People". Oman: the Modernization of the Sultanate. Abingdon, New York: Routledge. pp. 1–8. ISBN 978-1-3172-9164-0.
  12. Al Serkal, Mariam M. (2019-03-10). "UAE to see cold days ahead, temperatures drop to 2.6°C". Gulf News. 2019-03-17 रोजी पाहिले.
  13. Al Serkal, Mariam M. (2019-02-28). "UAE to get 5 days of rain and "significant drop in temperature"". Gulf News. 2019-03-17 रोजी पाहिले.