Jump to content

मुर्शिदाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुर्शिदाबाद
মুর্শিদাবাদসংক্ষিপ্ত
पश्चिम बंगालमधील शहर

मुर्शिदाबाद रेल्वे स्थानक
मुर्शिदाबाद is located in पश्चिम बंगाल
मुर्शिदाबाद
मुर्शिदाबाद
मुर्शिदाबादचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 24°10′48″N 88°16′12″E / 24.18000°N 88.27000°E / 24.18000; 88.27000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा मुर्शिदाबाद
क्षेत्रफळ १७.२५ चौ. किमी (६.६६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४४,०१९
  - घनता २,५५२ /चौ. किमी (६,६१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

मुर्शिदाबाद हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक शहर आहे. हूगळी नदीच्या पूर्व किनार्यवर वसलेले मुर्शिदाबाद १८व्या शतकात बंगालमधील एक प्रमुख् व्यापार केंद्र होते. इ.स. १७११ ते इ.स. १७९३ ह्या कालावधीमध्ये मुर्शिदाबाद हे बंगाल सुबा ह्या मुघल प्रांताच्या राजधानीचे शहर होते.

१७५७ साली झालेल्या प्लासिच्य लढाईत बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज उद-दौला ह्याचा पराभव झाला व त्यानंतर मुर्शिदाबादची अधोगती सुरू झाली. ब्रिटिशांनी बंगाल प्रांताची राजधानी कलकत्ताला हलवली व मुर्शिदाबादचे महत्त्व कमी झाले.

२०११ साली मुर्शिदाबादची लोकसंख्या सुमारे ४४,००० होती.

बाह्य दुवे

[संपादन]