Jump to content

मुमताज काझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ممتاز ایم قاضی (skr); মমতাজ এম কাজী (bn); Mumtaz M. Kazi (fr); Mumtaz M. Kazi (ast); मुमताज काझी (mr); Mumtaz M. Kazi (de); Mumtaz M. Kazi (pt); ممتاز ایم قاضی (ur); Mumtaz M. Kazi (pt-br); Mumtaz M. Kazi (nl); মুমতাজ এম. কাজী (as); मुमताज़ एम. काज़ी (hi); ముంతాజ్ ఎం. కాజీ (te); ਮੁਮਤਾਜ਼ ਮ. ਕਾਜ਼ੀ (pa); Mumtaz M. Kazi (en); ᱢᱩᱢᱛᱟᱡ ᱮᱢ ᱠᱚᱡᱤ (sat); Mumtaz M. Kazi (es); மும்தாஜ் எம். காசி (ta) Indian train engine driver (en); Technicienne de train indienne (fr); Indian train engine driver (en); Indiaas treinbestuurster (nl); ہندوستانی ٹرین انجن ڈرائیور (ur); maquinista india (ast)
मुमताज काझी 
Indian train engine driver
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • train driver
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
मुमताज काझी नारी शक्ती पुरस्कार स्विकारताना (२०१७)

मुमताज मकसूद अहमद काझी किंवा मुमताज एम. काझी ह्या एक भारतीय रेल्वे अभियंता आहेत. मुमताज यांना डिझेल इंजिन रेल्वे चालवणारी पहिली भारतीय महिला म्हणून ओळखले जाते.[] खरं तर, सुरेखा यादव ह्या आशियातील पहिली महिला लोकोमोटिव्ह ड्रायव्हर आहेत. यादव ने १९८८ मध्ये मुंबईतील उपनगरी रेल्वे चालक म्हणून काम सुरू केले होते. मार्च २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मुमताज यांना प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[]

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

काझी यांचा जन्म आणि वाढ महाराष्ट्र राज्याची व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईत झाली. त्यांचे कुटूंब मूलगामी मुस्लिम परंपरा पाळणारे आहे. काझी यांनी १९८९ मध्ये सांताक्रूझमधील सेठ आनंदीलाल रोडर हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली.[] त्यांचेवडील अल्लारखू इस्माईल काठवाला हे भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी होते. मुमताजने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पूर्णवेळ ट्रेन ड्रायव्हर म्हणून कारकिर्दिस सुरुवात केली. प्रारंभी त्यांच्या वडिलांनी रेल्वे विभागात नोकरी करण्यास विरोध केला. त्यांनी मुमताजला मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा कोर्स पूर्ण करायला सांगितले. परंतु मुमताज यांनी आपल्या वडिलांचे मत परिवर्तन करून रेल्वे चालकचे काम करण्यास परवानगी मिळवली.[]

कारकिर्द

[संपादन]

१९८९ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याच वर्षी मुमताज यांनी इंजिन चालक पदासाठी अर्ज केला.[] १९९१ मध्ये त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी ट्रेन चालवायला सुरुवात केली आणि १९९५ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने मुमताजला पहिल्या आशियाई महिला लोकोमोटिव्ह ड्रायव्हर म्हणून मान्यता दिली.[][]

२००५ मध्ये मुमताज यांना एएलपी-डिझेलमधून दुसरी मोटरवुमन म्हणून बढती देण्यात आली. तेव्हापासून मुमताज भारतातील सर्वात गर्दीच्या रेल्वे मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - ठाणे विभागात लोकल ट्रेन चालवतात.[]

मुमताज यांना २०१७ साली भारत सरकारने नारी शक्ती पुरस्कार दिला. हा पुरस्कार भारतात दरवर्षी महिलांच्या कामगिरीची दखल घेऊन दिला जातो.[] []

मुमताजच्या पतीचे नाव मकसूद काझी असून ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Meet Mumtaz M. Kazi, Asia's first lady Diesel locomotive driver" (इंग्रजी भाषेत). 2019-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Nari Shakti Puraskar awardees full list". Best Current Affairs. 9 March 2017. 2020-04-18 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Mumtaz M Kazi Asian Woman Train Driver | Indian Railway Train Pilot". Diary Store (इंग्रजी भाषेत). 2022-07-10. 2021-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-03 रोजी पाहिले.
  4. ^ "India's first 'motor-woman' lives her dream on the railway tracks". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-03-22. 2019-11-03 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Asia's first woman to drive a diesel train is an Indian". Rediff (इंग्रजी भाषेत). 2019-11-03 रोजी पाहिले.
  6. ^ Tahseen, Ismat (8 March 2019). "Meet the Mumbai women who drive the city's trains". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-11-03 रोजी पाहिले.
  7. ^ "Mumbai rains: Motorwoman Mumtaz Kazi pilots CST-Thane train for 23 hours". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 8 September 2017. 2019-11-03 रोजी पाहिले.
  8. ^ "Mumtaz - Asia's First Woman Diesel Engine Driver, Gets 'Nari Shakti Puraskar' By The President". indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2017-03-09. 2019-11-03 रोजी पाहिले.
  9. ^ Taneja, Richa (2017-03-08). "Mumbai's Mumtaz, Asia's First Woman Diesel Engine Driver, Gets "Nari Shakti Puraskar"". Everylifecounts.NDTV.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-11-03 रोजी पाहिले.