Jump to content

मुक्ता आर्ट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुक्ता आर्ट्स (mr); مکتا آرٹس (ur); Mukta Arts (fr); मुक्ता आर्ट्स (hi); Mukta Arts (en); موكتا آرتس (ar); Mukta Arts (nb); Mukta Arts (da) Indian film production company (en); شركة هندية (ar); भारतीय फिल्म निर्माण कंपनी (hi); Indian film production company (en)
मुक्ता आर्ट्स 
Indian film production company
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय
उद्योगमनोरंजन
स्थान भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १९७८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मुक्ता आर्ट्स लिमिटेड ही एक मुंबई मधील भारतीय चलचित्र निर्मिती कंपनी आहे.[] १९७८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सिनेमा आणि सर्जनशील कलांचे उत्पादन, वितरण, प्रदर्शन करते ज्यात दूरदर्शन मालिका, वेब मालिका आणि माहितीपट देखील आहे.[] रोखे बाजारावर सूचीबद्ध झालेली ही पहिली हिंदी चित्रपट निर्मिती कंपनी आहे.[][] मुक्ता आर्ट्स लिमिटेडने आजपर्यंत हिंदी आणि इतर भाषांमध्ये ४२ चित्रपटांची निर्मिती आणि सहनिर्मिती केली आहे. मुक्ता मूव्हीज डिस्ट्रिब्युटर्स या नावाखाली ४०० हून अधिक चित्रपट वितरित केले आहेत. २०१२ मध्ये त्याने प्रदर्शन क्षेत्रात प्रवेश केला आणि मुक्ता ए२ सिनेमा या नावाने मल्टिप्लेक्स थिएटर्सची स्वतःची शृंखला सुरू केली, जी आता भारतातील १८ ठिकाणी आहे.[][][]

२४ ऑक्टोबर १९७८ रोजी चित्रपट दिग्दर्शक-निर्माते सुभाष घई यांनी स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी मुक्ता फिल्म्स स्थापन केली आणि कर्ज नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली.[] १९८२ मध्ये, सुभाष घई यांनी मुक्ता आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक नवीन स्वतंत्र कंपनी स्थापन केली आणि २००० पर्यंत हिरो, कर्मा, राम लखन, सौदागर, त्रिमूर्ती, खलनायक, परदेस आणि ताल यासह अनेक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले.[]

मुक्ता आर्ट्स ही तिच्या ताल चित्रपटाद्वारे चित्रपट विमा सुरक्षित करण्याची प्रथा स्थापित करणारी पहिली भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी ठरली. या विम्याला आता "सिने मुक्ता विमा" असे नाव देण्यात आले आहे.[१०][११]

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष चित्रपट भाषा
१९८० कर्ज हिंदी
१९८३ हिरो
१९८५ पैसा ये पैसा
१९८६ कर्मा
१९८७ उत्तर् दक्षिण
१९८९ राम लखन
१९९१ सौदागर
१९९२ प्रेम दिवाने
१९९३ खलनायक
१९९५ त्रीमुर्ती
१९९७ परदेस
१९९८ शाम घनशाम
१९९९ ताल
२००१ यादें
राहुल
२००३ जॉगर्स पार्क
एक और एक गारह
२००४ ऐतराज
बढाई हो बढाई
२००५ इक्बाल
किस्ना: द वॉरीयर पोएट
२००६ ३६ चायना टाउन
शादी से पहले
अपना सपना मनी मनी
२००७ गुड बॉय, बॅड बॉय
खन्ना ॲन्ड अय्यर
२००८ बॉम्बे टू बँकॉक
युवराज
ब्लॅक अँड व्हाइट
सनई चौघडे मराठी
वळू
२००९ पेइंग गेस्ट हिंदी
२०१० राइट या राँग
हॅलो डार्लींग
२०११ लव्ह एक्सप्रेस
सायकल कीक
कश्मकश
२०११ नौकाडुबी बंगाली
२०१३ संहिता मराठी
२०१४ कांची: द अनब्रेकेबल हिंदी
निंबेहुली कन्नड
डबल दी ट्रबल पंजाबी
२०१५ हिरो हिंदी
२०२२ ३६ फार्महाउस हिंदी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Mukta Arts Company Profile". Linkedin.com. 28 September 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "List of Public Companies Worldwide – BusinessWeek – BusinessWeek". Investing.businessweek.com. 2 August 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Goyal introduces single-window clearance for Indian filmmakers; Eros, Mukta, Balaji gain". 1 February 2019. 14 March 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Mukta Arts Ltd". 14 March 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "Subhash Ghai's Mukta Arts to transfer cinema business to new arm". The Economic Times. 2021-01-15 रोजी पाहिले.
  6. ^ "Welcome to Mukta A2 Cinemas". www.muktaa2cinemas.com (इंग्रजी भाषेत). 11 October 2017 रोजी पाहिले.
  7. ^ "Multiplex count to double in south India by 2021". 18 December 2018. 14 March 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Subhash Ghai on 39 Years of His Banner Mukta Arts: 'I Love to March with Time or Ahead of Time'". 25 October 2017. 2019-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 March 2019 रोजी पाहिले.
  9. ^ "Subhash Ghai: From No Man To Show Man". www.outlookindia.com/. 2021-01-15 रोजी पाहिले.
  10. ^ "Film insurance: A 'hit' among producers". 29 March 2013. 14 March 2019 रोजी पाहिले.
  11. ^ "With a Rs 330-crore insurance cover, Rajinikanth sets another record with Robot 2". 19 March 2016. 14 March 2019 रोजी पाहिले.