Jump to content

मीष्कुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीष्कुफ [ˈmɨʂkuf] हे पोलंडमधील एक शहर आहे, ज्याची लोकसंख्या ३१,६५० (२०१९) आहे. हे शहर वार्ता नदीवर, श्लोंस्का प्रांतातील (१९९९ पासून) वसलेले आहे, जे पूर्वी चेंस्तॉखोवा प्रांतात (१९७५-१९९८) होते. हे मीष्कुफ जिल्ह्यांची राजधानी आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मीष्कुफ हे मावोपोल्स्काचे भाग होते आणि पोलंडच्या फाळणीपर्यंत, हे शहर वसलेला परिसर क्राकुफ प्रांताच्या लेलूफ जिल्ह्याचा भाग होता. मीष्कुफ हे पोलंडमधील सर्वात जुन्या रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या वार्षावा-व्हियेना रेल्वेवर आणि मध्यवर्ती रेल्वे मार्गाजवळ वसलेले आहे.

राजचिन्ह

[संपादन]

मीष्कुफ हे खूप वर्षांपासून अवजड उद्योगाचे केंद्र राहिले आहे, आणि असं शहराच्या राजचिन्हात प्रतिबिंबित होते. १९६९मध्ये तयार केलेल्या या राजचिन्हात चार काळ्या धुराड्या असून, त्यातील मधल्या दोन धुराड्यांमधून धूर बाहेर पडताना दिसतो. धुराड्यांच्या वर पांढरा गरुड आहे, बाजूंना मक्याची दोन कणसे आहेत आणि निळी फीत वार्ता नदीचे प्रतीक आहे.

इतिहास

[संपादन]
आउगुस्त ष्मेल्चेरचे राजवाडा (१८९५)

मीष्कुफचा इतिहास खूप लांब नाही आहे, आणि तो १८२५ पर्यंत मागे जातो, जेव्हा क्येलेत्स्क्ये प्रांताचा भाग म्हणून मीष्कुफ तालुका(ग्मिना) तयार करण्यात आली. १९५० मध्ये त्याला 'नगर'चा दर्जा मिळाला आणि १९५६ मध्ये मीष्कुफ जिल्हा तयार करण्यात आला . दुसऱ्या महायुद्धानंतर (ऑगस्ट १९४५), मावोपोल्स्कामधील मीष्कुफला श्लोंस्का–दोंब्रॉव्स्क्ये प्रांतात हस्तांतरित करण्यात आले, ज्याचे नाव १९५० मध्ये बदलून कातोवित्से प्रांत असे ठेवण्यात आले. १९७५मध्ये मीष्कुफ हे चेंस्तॉखोवा प्रांताचा भाग बनले आणि १९८३ मध्ये पॉताष्निया, मिषिग्वूद, मिषिग्वूद्का, न्यिरादा, क्रफ्चीविल्क, रेंबे, वाब्रे आणि स्मूद्झव्का या गावांना जोडल्यावर शहराचा विस्तार झाला. परिणामी, सध्या मीष्कुफचा विस्तार मोठा आहे – लोकसंख्येच्या दृष्टीने हे पोलंडमधील १३९वे, परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टीने मीष्कुफ ५०वे शहर आहे.

भूगोल

[संपादन]

मीष्कुफ ७३.५९ चौरस किमी (२८.४१ चौ. मैल) क्षेत्रफळ व्यापते. हे एक मोठं शहर आहे, ज्यापैकी ५६% लागवडीयोग्य जमीन आणि २२% वन आहे. १९२५ पासून हे एका ग्मिनाचे (तालुकाचे) केंद्र आहे, परंतु १९५० पर्यंत मीष्कुफ अधिकृतपणे एक गावच राहिले, जेव्हा त्याला शहराचा दर्जा मिळाला. आजचे मीष्कुफ हे शतकानुशतके येथे अस्तित्वात असलेल्या अनेक पूर्वीच्या गावे, शहरे आणि वस्त्यांपासून ( मिषिग्वूद, नॉवा व्येश, पोखुलांका, बेंदुष, खेलेनुफ्का, मीष्कुफ, मियाचुफ, चिषुफ्का) बनलेले आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून २८० मीटर उंचीवर, श्लोंस्का पठार आणि पोलिश युरा यांच्यामधील एका खोऱ्यात वसलेले आहे आणि त्याचे काही जिल्हे जुरा लँडस्केप पार्कचा भाग आहेत. मिश्कोव हे त्याच्या वस्ती प्रकारच्या वास्तुकलेसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे, जी अनेक गावांच्या विलीनीकरणामुळे आहे.

विभाग

[संपादन]

मीष्कुफ हे अनौपचारिकपणे २२ प्रशासकीय विभागांमध्ये ( dzielnica/जेलनित्सा) विभागलेले आहे:


स्तारि मीष्कुफ

नॉवि मीष्कुफ

 मियाचुफ

पॉखुलांका

म्जिग्लुत्का

बेंदुष

नॉवा व्येश

ग्रुख्ला

क्रेंचीवील्क

चिषुफ्का

ऑशिंस्का गुरा

पॉताष्ञा

ञेरादा

बॉरि

स्मुजुफ्का

लाब्रि

मिखावुफ

पॉवॉम्या मीष्कुफ

रेंबि

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
मीष्कुफ रेल्वे स्टेशन

प्रेक्षणीय स्थळांमध्ये १९व्या शतकातील बांधलेलं रेल्वे स्टेशन, आउगुस्त ष्मेल्चेरचा राजवाडा (१८८० चे दशक) आणि संत स्तानिस्वाव नवगॉथिक देऊळ(१९०८-१९३६) यांचा समावेश आहे.

क्रीडा

[संपादन]

मीष्कुफएमकेएस मीष्कुफ या क्रीडा सभेचे घर आहे, ज्याची स्थापना १९४७मध्ये झाली होती आणि ज्याचे नाव अनेक वेळा बदलले ( Jedność, Stal, Papiernik, Krisbut, MŻKS/येद्नॉश्च, स्ताल, पाप्येर्निक, क्रिज्बुत, व एम्. झेत्. का. एस्. ).

उल्लेखनीय लोक

[संपादन]
  • माग्दालेना चेलेत्स्का (जन्म १९७२), नटी
  • यान कुवाकॉफ्स्की (१९३०-२०११), युरोपियन संसदेचे सदस्य
  • यारॉस्वाफ लासेत्स्की (जन्म १९६१), सिनेटर
  • वुकाष माष्चिक (जन्म १९८४), मुष्टियोद्धा
  • वॉजिम्येष सॉकॉवॉफ्स्की (१९४०-२०१२), पोल व्हॉल्टर
  • आदाम षुस्ताक (जन्म १९७८), रोमन कॅथोलिक धर्मगुरू
  • मार्युष त्रेप्का (जन्म १९६७), श्लोंस्कीय प्रांताधिकारी
  • याद्विगा विश्नेफ्स्का (जन्म १९६३), युरोपियन संसद सदस्य

जुळी शहरे/भगिनी शहरे

[संपादन]

मीष्कुफचे जुळे शहर आहे: []   लोस् आल्काथारेस्, स्पेन बेकेश, हंगेरी कोप्रिव्नित्से, चेक प्रजासत्तक नामेस्तॉवॉ, स्लोव्हाकिया त्स्वोनित्स, जर्मनी

संदर्भ

[संपादन]

"Miasta partnerskie". miastomyszkow.pl (पोलिश भाषेत). Myszków. 6 May 2025 रोजी पाहिले.

  1. "Miasta partnerskie". miastomyszkow.pl (पोलिश भाषेत). Myszków. 6 May 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]