Jump to content

मीरा ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Meera Thakur (es); Meera Thakur (pt-br); Meera Thakur (de); Meera Thakur (fr); మీరా ఠాకూర్ (te); मीरा ठाकूर (mr); ᱢᱤᱨᱟ ᱴᱷᱟᱠᱩᱨ (sat); Meera Thakur (pt); মীৰা ঠাকুৰ (as); Meera Thakur (en); ਮੀਰਾ ਠਾਕੁਰ (pa); மீரா தாக்கூர் (ta)
मीरा ठाकूर 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

मीरा ठाकूर ह्या बिहार राज्यातील एक महिला असून त्यांना सिक्की गवताची हस्तकला अवगत असून त्या ही कला इतरांना देखील शिकवत असतात. या कामासाठी त्यांना युनेस्को तर्फे 'हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्टतेची मोहोर' (सील ऑफ एक्सेलेंस फॉर हॅण्डिक्राफ्ट्स) आणि 'नारी शक्ती पुरस्कार' असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

कारकिर्द

[संपादन]
सिक्की गवतापासून बनवलेली झाकी

मीरा ठाकूरचा जन्म बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्यातील उमरी येथे झाला. वयाच्या चौथ्या वर्षी तिने तिच्या आईकडून सिक्की गवताची हस्तकला शिकायला सुरुवात केली, या हस्तकलेद्वारे घरगुती सजावट, फुलदाण्या तसेच पेट्या आदी वस्तू बनवल्या जातात. [] सिक्की हे फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशात आढळणारे गवत आहे, ज्याच्या तंतूना सोनेरी रंगाची झळक असते.[] ठाकूर ह्या मधुबनी येथे राहत असून, येथे त्या हस्तकला विकास केंद्र चालवतात. सदरील संस्था वंचित महिलांना हस्तकला प्रशिक्षण देते.[][] त्यांनी पारंपरिक हस्तकला प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे.[]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

दिल्ली क्राफ्ट्स कौन्सिलने १९८८ मध्ये ठाकूर यांना बाल शिल्पी कलाकार पुरस्कार दिला होता. २००५ मध्ये त्यांना युनेस्कोकडून हस्तकला क्षेत्रातील उत्कृष्टतेची मोहोर हा सन्मान प्रदान करण्यात आला.[][] तसेच २०२२ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Dhiman, Ramesh K. (16 December 2005). "Lifestyle". The Tribune. 3 November 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b Bhatia, Gaurav (3 December 2012). "Creations of sikki grass draw visitors". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "29 get Nari Shakti Awards". The Tribune (इंग्रजी भाषेत). 9 March 2022. 11 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2022 रोजी पाहिले.
  4. ^ a b Kainthola, Deepanshu (8 March 2022). "President Presents Nari Shakti Puraskar for the Years 2020, 2021". Tatsat Chronicle (इंग्रजी भाषेत). 9 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "मधुबनी की मीरा को राष्ट्रपति ने किया सम्मानित, यूनेस्को सील ऑफ एक्सीलेंस अवॉर्ड मिला था 2005 में". Bihar Express. 11 March 2022. 4 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2022 रोजी पाहिले.