Jump to content

मीरा कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीरा कुमार ( मार्च ३१, १९४५) या भारतीय राजकारणी आहेत.जून इ.स. २००९ पासून त्या १५ व्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा व्हायचा मान त्यांना मिळाला आहे.सर्वप्रथम त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८५ मध्ये पोटनिवडणुकीतून उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली राज्यातील करोल बाग लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.

मागील:
सोमनाथ चटर्जी
लोकसभेचे अध्यक्ष
मे १६, इ.स. २००९जून ४, इ.स. २०१४
पुढील:
सुमित्रा महाजन