मीनाक्षी पाहुजा
Indian academic and marathon swimmer | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | इ.स. १९७८ | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| पुरस्कार | |||
| |||
मीनाक्षी पाहुजा (जन्म:१९७८) या एक भारतीय व्याख्याता आणि मॅरेथॉन जलतरणपटू आहेत. स्पर्धात्मक जलतरणपटू म्हणून यशस्वी कारकिर्दीनंतर, पाहुजा यांनी लेडी श्री राम कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इथून पुढे त्यांनी खुल्या पाण्यातील जलतरणात प्रवेश केला. यासाठी त्यांना २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रारंभिक आयुष्य
[संपादन]मीनाक्षी पाहुजाचा जन्म १९७८ मध्ये दिल्ली येथे झाला.[१] तसेच त्यांचे संगोपन देखील दिल्लीत झाले. पाहुजा यांना अजून दोन लहान भावंडे आहेत. त्यांचे वडील व्ही.के. पाहुजा मॉडर्न स्कूलमध्ये पोहण्याचे शिक्षण देत असत.[२] पाहुजा यांनी पहिल्यांदा वयाच्या पाचव्या वर्षी पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि नऊ वर्षांची होण्यापूर्वी ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ज्युनियर वयोगटातील राष्ट्रीय विजेते देखील बनल्या[२]
कारकिर्द
[संपादन]भारताचे प्रतिनिधित्व करताना, पाहुजा यांनी १९९६ मध्ये दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या आशिया पॅसिफिक वयोगटातील जलतरण स्पर्धेत ४०० मीटर वैयक्तिक मेडलीमध्ये पदक जिंकले.[२] त्यांनी राष्ट्रीय खेळांमध्ये तीन वेळा विजेते पदक जिंकले होते.[३] २००१ मध्ये, त्यांनी जलतरणातून निवृत्ती घेतली[२] आणि त्या दिल्ली विद्यापीठाचा भाग असलेल्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शारीरिक प्रशिक्षणाची व्याख्याता झाल्या.[१]
ऑगस्ट २००६ मध्ये, पाहुजा यांनी मॅरेथॉन पोहणे सुरू केले. त्यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे भागीरथी-हुगळी नदीवर १९ किमीच्या स्पर्धेत भाग घेतला.[२] त्यानंतर त्या २००७ च्या लेक झुरिच स्विम ( रॅपर्सविल ते झुरिच पर्यंत २६.४ किमी) मध्ये भाग घेण्यासाठी स्वित्झर्लंडला गेल्या, जिथे त्या पाचव्या स्थानावर फिनिशर म्हणून होत्या.[२][४] पाहुजा यांना त्यांचे वडील आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दीपक पेंटल या दोघांनी आर्थिक मदत केली.[२]
पाहुजाने इंग्लिश चॅनेल पोहण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. पहिला प्रयत्न २००८ मध्ये करण्यात आला होता. डोव्हरमध्ये येण्याच्या एक आठवडा आधी, पाहुजा यांनी भगीरथी-हुगळी नदीवर ८१ किमीच्या स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांना "चिखल आणि नदीतील साप" यांचा सामना करावा लागला. तरीही त्यांनी हे अंतर १२ तास २७ मिनिटांत पूर्ण केले.[२] तथापि, समुद्रात पोहण्याचा अनुभव नसल्याने, त्यांना खाडीतील प्रवाहाशी मोठ्या प्रमाणात झुंजावे लागले शेवटी ११ किमी पार केल्या नंतर पाहुजा यांना माघार घ्यावी लागली.[४] पाहुजाने २०१४ मध्ये परत दुसऱ्यांदा प्रयत्न केला, पुन्हा एकदा इंग्लंडच्या बाजूने सुरुवात केली. १४ तास १९ मिनिटांत ४० किमी पोहल्यानंतर, बदलत्या भरती-ओहोटीमुळे त्या माघारी परतल्या. यावेळेस त्या केवळ ३ किमी दूर होत्या.[५][६]
पाहुजा या फ्लोरिडातील की वेस्ट मध्ये पोहणारी आणि टेक्सासमधील लेक ट्रॅव्हिस सोलो पूर्ण करणारी पहिली भारतीय व्यक्ती होती.[४] याच सोबत टेक्स रॉबर्टसन हाईलँड लेक्स चॅलेंज पूर्ण करणारी पहिली भारतीय व्यक्ती असा देखील त्यांना अजून एक मान मिळाला. इथे त्यांनी पाच दिवसांत पुढील पाच तलावात पोहून काढले: लेक बुकानन, इंक्स लेक, लेक एलबीजे, लेक मार्बल फॉल्स आणि लेक ट्रॅव्हिस.[३] रॉबेन आयलंड - ब्लूबर्गस्ट्रँड कोर्समध्ये (७.४ किमी) भारतीय जलतरणपटू मध्ये पाहुजा या दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद महिला होत्या.[७] पाहुजा यांनी २०१२ मध्ये मलेशियातील लाबुआन सी क्रॉस शर्यतीत कांस्यपदक जिंकले[४] आणि २०१४ मध्ये न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन आयलंड मॅरेथॉन पोहण्यात तिसरे स्थान पटकावले.[८] आल्प्स मधील कोन्स्टान्स सरोवर ओलांडणारी पहिली भारतीय जलतरणपटू म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांची नोंद झाली.[१]
पाहुजा यांच्या मते खुल्या पाण्यात पोहताना पुढील चार समस्यांशी सामना करण्यासाठी जलतरणपटूंनी तयार असले पाहिजे: हवामान, समुद्री जीवन, सहनशक्ती आणि मानसिक दृढता.[३] मुर्शिदाबाद येथे एका नदीत पोहत असताना त्यांची एका मृतदेहाशी गाठ पडली होती. त्यांना प्रथम हा एखादा स्पर्धक असावा असे वाटले होते. जेव्हा हा मृतदेह एका स्काउट बोटीवर आदळला तेव्हा त्यांना सत्य समजले.[९]
पाहुजा यांनी भारतीय खेळाडूंना, विशेषतः महिला खेळाडूंना जनाधार आणि सरकारी पाठिंबा मिळण्याची नितांत गरज व्यक्त केली.[१०][११] पाहुजा या "ब्रेक द टॅबू. पीरियड" या लघुपटाची सह-निर्माती होती.[१२]
पुरस्कार
[संपादन]
पाहुजा यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.[१२]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c Ajmal, Anam (20 October 2020). "Test your limits, marathon swimmer tells Bennett University students". The Times of India. 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h Pritam, Norris (2 June 2011). "Water woman!". The Hindu (इंग्रजी भाषेत). 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c Goswami, Neev (29 July 2020). "Swimming in India is a 'work in progress': Pahuja". The Daily Guardian. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ a b c d Mishra, Archana (19 August 2014). "She has a passion for swimming". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "English Channel". Swimming Coaching Institute. 2020-11-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Meenakshi Pahuja 2014". Channel Swimming Association (इंग्रजी भाषेत). 18 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Records Database". Cape Long Distance Swimming Association. 12 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Fastest at Manhattan Island Swim (Woman)". The Coca-Cola Company (इंग्रजी भाषेत). 2021-01-12 रोजी पाहिले.
- ^ Goswami, Neev (30 July 2020). ""Want to see this whole world through water": Meenakshi Pahuja". NewsX (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "In conversation with Journalists". Centre For Civil Society (इंग्रजी भाषेत). 7 September 2018. 2020-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "Panel Discussion at Session XI : Towards Gender Parity and Empowering Sports through Women". Confederation of Indian Industry. 7 July 2017. 2 January 2021 रोजी पाहिले.
- ^ a b "Meenakshi Pahuja Honored For Her Achievements". WOWSA. 8 March 2020. 18 November 2020 रोजी पाहिले.