मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे
2023 Hindi film by Ashima Chibber | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार | |||
| मूळ देश | |||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक |
| ||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा २०२३ चा भारतीय हिंदी -भाषेतील कायदेशीर नाट्य चित्रपट आहे जो आशिमा चिब्बर लिखित आणि दिग्दर्शित आहे. ह्या चित्रपटात राणी मुखर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता आणि जिम सरभ यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.[१] हा चित्रपट अनुरूप भट्टाचार्य आणि सागरिका चक्रवर्ती यांच्या वास्तविक जीवनातील कथेपासून प्रेरित आहे, जे एक भारतीय जोडपे होते ज्यांच्या मुलांना २०११ मध्ये नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातून काढून घेतले होते.[२][३]
हा चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.[४] मुखर्जींच्या अभिनयामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) चा फिल्मफेर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - महिलासाठी झी सिने क्रिटिक्स पुरस्कार यांचा समावेश आहे.[५][६]
कथानक
[संपादन]हा चित्रपटाचे कथानक देबिका बद्दल आहे जी तिचा पती अनिरुद्ध, मुलगा शुभ आणि पाच महिन्यांची मुलगी सुची यांच्यासोबत स्टावांग्यिर, नॉर्वे येथे राहतात. शुभ आणि सुचीला घेऊन जाण्यापूर्वी नॉर्वेजियन बाल कल्याण सेवांचे दोन कर्मचारी नियमितपणे त्यांना भेट देतात. चॅटर्जींना सांगितले जाते की ते त्यांच्या मुलांचा ताबा घेण्यास अयोग्य आहेत, म्हणून देबिका तिच्या मुलांचा ताबा परत मिळवण्याचा निर्णय घेते. तिच्यावर लावण्यात आलेल्या काही आरोपांमध्ये मुले पालकांसोबत एकाच बेडरूम मध्ये झोपतात, त्यांना हाताने खायला दिले जाते आणि त्यांची आई मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि मुलांचे पालनपोषण करण्यास अयोग्य आहे. लवकरच देबिकाला कळते की बाल कल्याण सेवा हा स्थलांतरितांकडून पैसे उकळण्याचा एक मोठा घोटाळा आहे. तिला आपले मुलं कुठे आहे त्या ठिकाणाची माहिती मिळते आणि ती त्यांना स्वीडनला घेऊन जाते; पण लवकरच ती सीमेवर पकडली जाते. ती कायदेशीर अडचणींवर मात कशी करते आणि तिच्या दयनीय पतीशी व्यवहार करताना तिच्या मुलांशी कशी पुनर्मिलन होते, यावरून उर्वरित कथेचा उलगडा होतो.
कलाकार
[संपादन]- राणी मुखर्जी - देबिका चॅटर्जी
- अनिर्बान भट्टाचार्य - अनिरुद्ध "अनिरुद्ध" चटर्जी, देबिकाचा नवरा
- जिम सरभ - डॅनियल सिंग सियुपेक, नॉर्वेचे वकील
- नीना गुप्ता - वसुधा कामत, भारतीय परराष्ट्र मंत्री (सुषमा स्वराज वर आधारित पात्र)[७]
- कार्ट तम्मजर्व - सिया, (वेलफ्रेड येथील अधिकारी)
- ब्रिटा सॉल - माटिल्डा मॅग्नस, (वेलफ्रेड येथील अधिकारी)
- बरुण चंदा - अभिजीत दत्ता, कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
- बालाजी गौरी - वकील सुनैना प्रताप
- मिठू चक्रवर्ती - अनिरुद्धची आई
- सौम्या मुखर्जी - अनुराग चॅटर्जी, अनिरुद्धचा भाऊ
- बोधिसत्व मजुमदार - देबिकाचे वडील
- सास्वती गुहा ठाकुरता - देबिकाची आई
- वरुण वझीर - बिस्वजीत सरकार
- चारु शंकर - नंदिनी
- रूपंगी वनवरी - राबिया
- सारा सौली - बेरिट हॅन्सन, वेल्फ्रेड येथील बालवाडी शिक्षिका
- युवा वनवारी - शुभा चॅटर्जी, देबिका आणि अनिरुद्ध यांचा मुलगा
- इरहा अली - सुची चॅटर्जी, देबिका आणि अनिरुद्ध यांची मुलगी
- क्रिस्टजन सर्व - लार्स क्रिस्टियनसेन (वेलफ्रेड येथील अधिकारी)
निर्माण
[संपादन]मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा एस्टोनियामध्ये चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. मार्च २०२१ मध्ये राणी मुखर्जीने या चित्रपटाची घोषणा केली होती.[८] या चित्रपटातून बंगाली अभिनेता अनिर्बान भट्टाचार्यचा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे.
हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती आणि तिच्या पतीच्या खऱ्या कथेपासून प्रेरित आहे, जे नॉर्वेमध्ये राहणारे एक भारतीय जोडपे आहे. त्यांची मुले नॉर्वेजियन बाल कल्याण सेवांनी काढून घेतली होती, ज्यांना भारतीय संस्कृतीत सामान्य मानल्या जाणाऱ्या पालकत्वाच्या सवयींबद्दल आक्षेप होता.[९][१०]
चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झाले.[११] पहिल्यांचा चित्रण हे एस्टोनियामध्ये झाले आणि २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत ते पूर्ण झाले.[१२] चित्रीकरण हे १८ ऑक्टोबर २०२१ रोजी संपले.[१३][१४]चित्रपट १७ मार्च २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.[१५]
संगीत
[संपादन]चित्रपटाचे संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले आहे. गीते कौसर मुनीर यांनी लिहिली आहेत. ह्यात तीन गाणी आहेत: "शुभो शुभो", "मा के दिल सा" आणि "आमि जानी रे".[१६]
समालोचन
[संपादन]इंडिया टुडेच्या झिना बंदोपाध्याय यांनी चित्रपटाला पाच पैकी ३.५ स्टार दिले आणि म्हणाल्या, "चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे निःसंशयपणे राणी मुखर्जीचा अभिनय. तथापि, शेवटी, चित्रपट थोडा ताणलेला वाटतो."[१७]
रेडिफ.कॉमच्या सुकन्या वर्मा म्हणाल्या, "पोकळ नाट्य आहे."[१८] एनडीटीव्हीचे सैबल चॅटर्जी यांनी चित्रपटाला पाच पैकी १.५ स्टार दिले.[१९]
२० एप्रिल २०२३ पर्यंत, या चित्रपटाने जगभरात ₹३६.५३ कोटींची कमाई केली आणि ७४५ हजार नॉर्वेजियन क्रोनची कमाई केली आहे. हा चित्रपट नॉर्वेमध्ये सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.[२०] नंतर तो ८३५६ वेळा बघितल्याने नॉर्वेमध्ये सर्वाधिक पाहिलेला दक्षिण आशियाई चित्रपट बनला.[२१]
भारतातील नॉर्वेजियन दूतावासाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एक निवेदन जारी केले व देशाच्या बाल कल्याण सेवांचे खरे काम काय ते दाखवले. त्यांनी पुढे लिहिले की ते "बाधित कुटुंबांबद्दल, विशेषतः मुलांबद्दल सहानुभूती बाळगातात." संबंधितांसाठी, असे अनुभव कठीण असतात हे नाकारता येत नाही."[२२]
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, नॉर्वेजियन राजदूत हान्स जेकब फ्रायडेनलुंड यांनी चित्रपटावर टीका केली आणि म्हटले की, "हा चित्रपट नॉर्वेच्या कौटुंबिक जीवनावरील विश्वास आणि विविध संस्कृतींबद्दलचा आपला आदर चुकीच्या पद्धतीने दर्शवितो." यावर सागरिका चक्रवर्ती यांनी टीका केली आणि त्यांच्या विधानांचा निषेध केला, "जेव्हा संपूर्ण जग माझ्या आणि माझ्या मुलांमधील बंध पाहू शकते, तेव्हा नॉर्वेजियन सरकार तिची कहाणी न कळता तिच्याबद्दल खोटे बोलणे सुरूच ठेवते". तिने असेही म्हटले की तिला जगभरातून खूप प्रेम मिळत आहे आणि चित्रपटानंतर लोक तिला भेटायला येऊ इच्छितात. सागरिका म्हणाली की भारत सरकारने तिला खूप मदत केली आहे.[२३]
पुरस्कार
[संपादन]| पुरस्कार | श्रेणी | विजेता | निकाल | संदर्भ. |
|---|---|---|---|---|
| फिल्मफेर पुरस्कार | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | राणी मुखर्जी | नामांकन | [२४] |
| सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) | विजयी | |||
| झी सिने पुरस्कार | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - महिला | नामांकन | ||
| सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) - महिला | विजयी | |||
| आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | विजयी | [२५] [६] |
संदर्भ
[संपादन]- ↑ Kanabar, Nirali (21 March 2022). "Birthday Girl Rani Mukerji on her next Mrs Chatterjee vs Norway and not being typecast". India Today. 30 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Indian couple's children taken away by Norway authorities". NDTV. 24 December 2011. 23 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 October 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukherjee's 'Mrs Chatterjee vs Norway' Is Based On This Indian Couple's Story". NDTV.com. 26 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji's 'Mrs Chatterjee vs Norway' to make debut in theaters on March 17". The Times of India. 26 January 2023. 26 January 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Filmfare Critics Awards 2024: Vikrant Massey Wins Best Actor, Rani Mukerji, Shefali Shah Tied for Best Actress". Times Now. 29 January 2024. 29 January 2024 रोजी पाहिले.
- 1 2 "IIFA 2024: Shah Rukh Khan Wins Best Actor, Rani Mukerji Bags Best Actress Award. Check Out Full List Of Winners". ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2 October 2024 रोजी पाहिले.
- ↑ Hungama, Bollywood (6 March 2023). "REVEALED: Neena Gupta in Rani Mukerji-starrer Mrs Chatterjee vs Norway plays a character inspired by Sushma Swaraj : Bollywood News - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 23 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji opens up on her next Mrs Chatterjee vs Norway". 21 March 2022. 30 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji's Starrer Mrs Chatterjee vs Norway Is Inspired By THIS Indian Couple's Story". News18 (इंग्रजी भाषेत). 25 February 2023. 26 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ "The true story behind Rani Mukherjee's latest film 'Mrs Chatterjee vs Norway'". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 25 February 2023. 26 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji heads to an international destination for Mrs Chatterjee vs Norway shoot". 6 August 2021. 30 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Rani wraps her Estonia schedule". Ahmedabad Mirror. 7 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji finishes shooting for Mrs Chatterjee Vs Norway: 'I went through a rollercoaster of emotions'". Hindustan Times. 20 October 2021. 30 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "It's a wrap for Rani Mukerji's Mrs Chatterjee Vs Norway". 20 October 2021. 3 December 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2022 रोजी पाहिले.
- ↑ "In 'Mrs. Chatterjee Vs Norway', Rani Mukerji essays role of Sagarika Chakraborty whose heart-breaking fight for kids' custody shook the world". The Economic Times. 25 February 2023. ISSN 0013-0389. 26 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 February 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Mrs Chatterjee Vs Norway – Original Motion Picture Soundtrack". Jiosaavn. 2 March 2023. 2 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ Zinia Bandyopadhyay (14 March 2023). "Mrs Chatterjee Vs Norway Movie Review: Rani Mukerji delivers one of her career-best performances". India Today. 18 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ Sukanya Verma. "Mrs Chatterjee Vs Norway Review: Rani's Screechy Ode To Motherhood!" Check
|url=value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 16 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 March 2023 रोजी पाहिले. - ↑ Saibal Chatterjee (17 March 2023). "Mrs Chatterjee Vs Norway Review: Rani Mukerji Lets It Rip And The Film Trips On Its Excesses". NDTV. 17 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Mrs. Chatterjee Vs Norway Office". Bollywood Hungama. 17 March 2023. 20 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Rani Mukerji's Mrs. Chatterjee VS Norway' becomes the most watched South Asian film in Norway". Firstpost (इंग्रजी भाषेत). 19 April 2023. 22 April 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2023 रोजी पाहिले.
- ↑ Royal Norwegian Embassy in New Delhi (17 March 2023). "Statement on Mrs Chatterjee vs Norway". Norgesportalen. 26 March 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Nikkhil Advani and Sagarika Chakraborty slam Norwegian Ambassador on allegations against Rani Mukerji's 'Mrs Chatterjee Vs Norway'". The Times of India. 17 March 2023. 17 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 March 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Nominations for the 69th Hyundai Filmfare Awards 2024 with Gujarat Tourism: Full list out". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 21 January 2024 रोजी पाहिले.
- ↑ "IIFA Awards Announces Its Highly Anticipated 2024 Nominations". IIFA (इंग्रजी भाषेत). 2 October 2024 रोजी पाहिले.