मिलान-लिनाते विमानतळ
इटलीमधील विमानतळ | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| याचे नावाने नामकरण |
| ||||
| स्थान |
| ||||
| चालक कंपनी |
| ||||
| अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||||
| महत्वाची घटना |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| अदलाबदली स्थानक |
| ||||
| मागील. |
| ||||
| आय.ए.टी.ए. कोड |
| ||||
| आय.सी.ए.ओ. कोड |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
मिलान लिनाते विमानतळ (आहसंवि: LIN, आप्रविको: LIML) हे इटलीतील दुसरे सर्वात मोठे शहर मिलानमधील तीन पैकी एक विमानतळ आहे. २०२४ मध्ये या विमानतळावरून १.०६ कोटी प्रवाशांनी तसेच १,१८,०६० विमानांनी ये-जा केली. हा विमानतळ इटलीतील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.[१] प्रवासी संख्येच्या बाबतीत, माल्पेन्सा आणि बर्गामो नंतर मिलान महानगर क्षेत्रातील हे तिसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे, तर विमानांच्या हालचालींच्या बाबतीत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.[२] मिलान माल्पेन्सा आणि मिलान बेर्गामो या विमानतळांसह लिनाते विमानतळ मिलान विमानतळ प्रणालीचा भाग आहे. २०२४ मध्ये या तीन विमानतळांवरून ५.६९ कोटी प्रवाशांनी ये-जा केली.[३]
सुविधा
[संपादन]टर्मिनल
[संपादन]लिनाते विमानतळावर तीन मजली प्रवासी इमारत (टर्मिनल) आहे. तळमजल्यावर चेक-इन, आलेल्या प्रवाशांना सामान घेण्याची सुविधा आहेत. तसेच बसने विमानापर्यंत जाण्या साठी येथे एक दुय्यम प्रस्थान द्वार क्षेत्र आहे. पहिल्या मजल्यावर मुख्य प्रस्थान क्षेत्र असून तिथे अनेक दुकाने, उपाहारगृहे आणि सेवा सुविधा आहेत. दुसऱ्या मजल्याचा वापर कार्यालयीन कामांसाठी केला जातो.[४]
एप्रन आणि धावपट्टी
[संपादन]मुख्य इमारतीमध्ये पाच प्रस्थानद्वारे असून ती सर्व जेट-ब्रिजने सज्ज आहेत. याशिवाय एप्रनवर विमाने उभे केलेल्या विमानांपर्यंत प्रवाशांना बसद्वारे नेले जाते.
== विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने[५]
==
सांख्यिकी
[संपादन]

व्यस्त देशांतर्गत मार्ग (२०१७)
[संपादन]| क्रमांक | शहर | प्रवासी संख्या | विमान कंपनी |
|---|---|---|---|
| १ | रोम–फ्युमिचिनो | ११,८३,७५३ | आयटीए एरवेझ |
| २ | काग्लियारी | ६,२७,२९९ | आयटीए एरवेझ, व्होलोटिया |
| ३ | कॅटानिया | ५,८५,८०९ | आयटीए एरवेझ |
| ४ | नेपल्स | ५,०९,२५१ | आयटीए एरवेझ |
स्थानिक वाहतूक
[संपादन]मेट्रो
[संपादन]मिलान मेट्रो लाईन ४ विमानतळाला शहराच्या मध्यवर्ती भागाशी साधारण १५ मिनिटाच्या प्रवासाने जोडते.[७]
बस सेवा
[संपादन]मिलानो चेंत्राल रेल्वे स्थानकावरून लिनाते विमानतळासाठी लिनाते शटल आणि एरपोर्ट बस एक्सप्रेस यांसारख्या अनेक शटल सेवा उपलब्ध आहेत. सेंट्रल स्टेशनपासून प्रवासाचा वेळ सुमारे २५ मिनिटे लागतो.
कार
[संपादन]विमानतळ व्हियाले एनरिको फोर्लानिनी या भागात असून तो आउतोस्त्रादा ए५१ या महामार्गाला जोडलेला आहे.
अपघात आणि दुर्घटना
[संपादन]- ८ ऑक्टोबर २००१ रोजी स्कँडिनेव्हियन एरलाइन्स फ्लाइट ६८६ दाट धुक्यामध्ये धावपट्टीवर एका छोट्या विमानाशी धडकली. या दुर्घटनेत विमानातील सर्व ११४ लोकांचा आणि जमिनीवरील ४ जणांचा मृत्यू झाला. ही इटलीच्या इतिहासातील सर्वात भीषण हवाई दुर्घटना मानली जाते.
- ३ ऑक्टोबर २०२१ रोजी लिनाते विमानतळावरून उड्डाण केलेले पिलॅटस पीसी-१२ प्रकारचे एक खासगी विमान एका रिकाम्या इमारतीवर कोसळले. या अपघातात रोमेनियातील उद्योगपती डॅन पेत्रेस्कु यांच्यासह विमानातील सर्व ८ जणांचा मृत्यू झाला.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;Assaeroportiनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ "Dati di traffico - 2022" (PDF). Assaaeroporti. 2024-12-20 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2026-04-04 रोजी पाहिले.
- ↑ "Archivio 2024". Assaeroporti (इटालियन भाषेत).
- ↑ milanolinate-airport.com – Maps, २३ जून २०१५ रोजी मिळवलेले दुवे.
- ↑ "Flight destinations from Linate". www.milanolinate-airport.com. 2014-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-04-04 रोजी पाहिले.
- ↑ Liu, Jim. "American/AerLingus Expands Codeshare Service in Aug 2022". Aeroroutes.com.
- ↑ "How to get to Linate by Underground". Milano Linate Airport.
