Jump to content

मिनी वासुदेवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Mini Vasudevan (es); মিনি ভাসুদেভান (bn); Mini Vasudevan (nl); മിനി വാസുദേവൻ (ml); Mini Vasudevan (ast); Mini Vasudevan (ca); मिनी वासुदेवन (mr); మినీ వాసుదేవన్ (te); Mini Vasudevan (ga); মিনি বাসুদেৱন (as); Mini Vasudevan (sq); Mini Vasudevan (en); மினி வாசுதேவன் (ta) animal rights activist (en); पशु प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते (mr); മൃഗാവകാശ പ്രവർത്തക (ml); activista pels drets dels animals (ca)
मिनी वासुदेवन 
पशु प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९६५
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मिनी वासुदेवन (१९६५ (?) - ) या कोइंबतूर येथील एक भारतीय पशुप्रेमी कार्यकर्त्या आहेत. त्यांना २०१९ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

वासुदेवन यांचा जन्म सुमारे १९६५ मध्ये झाला. अकरा वर्षांची असताना वासुदेवन यांनी मांसाहारासाठी एक कोंबडी कापताना पाहिली. हे न पटल्याने त्यांनी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.[] मिनी वासुदेवन ह्या १९८२ च्या बॅचमधील कझकूटम येथील सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थीनी आहेत.[] पुढे वासुदेवन यांनी आपले अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.[] लग्ना नंतर वासुदेवन ह्या आपल्या पती मधु गणेश सह काहीकाळ अमेरिकेत वास्तव्यास होत्या.[]

ह्यूमेन अ‍ॅनिमल सोसायटी

[संपादन]

२००४ मध्ये, वासुदेवन आणि त्यांच्या नवरा, मधु गणेश,[] अमेरिकेहून कोइम्बतूरला वापस आले. इथे त्यांना रस्त्यावरील कुत्रे जखमी आणि आजारी अवस्थेत भटकताना दिसली, ज्याचे त्यांना अतीव दुःख झाले. त्यांना प्राणी पालनाचा छंद होता. याशिवाय अमेरिकेत पाळीव प्राण्यांचे काही शिस्तबद्ध नियम होते, जे की भारतात पाळले जात नव्हते. याचा परिपाक म्हणून त्यांनी मोकाट कुत्र्यांसाठी काहीतरी करण्याचा निश्चय केला. वासुदेवन जखमी आणि गर्भवती प्राण्यांना मदत करण्यासाठी पशुवैद्यकांना पैसे द्यायची, पण काही पशुवैद्य रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांवर उपचार करण्यास नकार देत असत. शिवाय उपचार केलेल्या प्राण्यांना बरे होण्यासाठी कुठेही योग्य असा निवारा देखील नव्हता. यामुळे उभयतांनी २००६ मध्ये ह्यूमेन अ‍ॅनिमल सोसायटी नावाची एक संस्था सुरू केली.[] तत्पूर्वी रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीबद्दल त्यांनी मनेका गांधींशी पत्रव्यवहार केला होता. सुरुवातीला गांधींना त्या परदेशी नागरिक आहेत असे वाटल्याने त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष केले. नंतर गांधींना कळले की वासुदेवन ह्या कोइम्बतूरमध्ये राहतात तेव्हा त्यांनी वासुदेवन यांना यावर काहीतरी तोडगा काढण्यास सुचवले.[]

सुदैवाने कोइम्बतूर कॉर्पोरेशनने त्याच वर्षी पशु निर्बीजीकरण कार्यक्रम सुरू केला. त्याच सोबत वासुदेवन जोडप्याला केंद्र चालवण्यासाठी सीरनाईकेनपलयम मध्ये जागा दिली. पुढे मिनी यांनी प्राण्यांचे नसबंदी केंद्र कसे चालवायचे, त्यातील अडचणी आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे शिकण्यासाठी चेन्नईतील ब्लू क्रॉस ऑफ इंडियामध्येही वेळ घालवला.[]

त्यांनी एक कर्मचारी, एक मदतनीस आणि एक पशुवैद्यकीय डॉक्टर यापासून सुरुवात केली. आता एनजीओ आणि केंद्रात दोन पशुवैद्य आणि ७० हून अधिक लोक सहभागी आहेत. मार्च २०१८ पर्यंत, त्यांनी किमान ५०,००० कुत्र्यांना बऱ्यापैकी मदत केली. ज्यामध्ये २५,००० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. तर उर्वरित कुत्र्यांना दत्तक घेण्यात आले आहे किंवा त्यांची सुटका करून पुनर्वसन करण्यात आले.[][][] २०१९ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने वासुदेवन यांना नारी शक्ती पुरस्कारासाठी निवडले होते. भारतातील महिलांसाठीचा हा सर्वोच्च पुरस्कार मानल्या जातो.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f "For all creatures great and small". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2019-03-08. 2025-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Sainik School Old Boys Association". sskzmoba.org. 2020-05-12 रोजी पाहिले.
  3. ^ "HAS - Management Team" (इंग्रजी भाषेत). 2020-04-10 रोजी पाहिले.
  4. ^ a b c Ramkumar, Pratiksha (27 February 2019). "Coimbatore-based animal rights activist Mini Vasudevan selected for Nari Shakti Puraskar". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-04-10 रोजी पाहिले.
  5. ^ a b "Coimbatore-based animal rights activist Mini Vasudevan selected for Nari Shakti Puraskar". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.