Jump to content

मिनीयापोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिनियापोलिस या पानावरून पुनर्निर्देशित)
मिनीयापोलिस
Minneapolis
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


ध्वज
चिन्ह
मिनीयापोलिस is located in मिनेसोटा
मिनीयापोलिस
मिनीयापोलिस
मिनीयापोलिसचे मिनेसोटामधील स्थान
मिनीयापोलिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मिनीयापोलिस
मिनीयापोलिस
मिनीयापोलिसचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 44°58′48.36″N 93°15′50.76″W / 44.9801000°N 93.2641000°W / 44.9801000; -93.2641000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिनेसोटा
स्थापना वर्ष इ.स. १८३७
क्षेत्रफळ १५१.३ चौ. किमी (५८.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८३० फूट (२५० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,८२,५७८
  - घनता २,७१० /चौ. किमी (७,००० /चौ. मैल)
  - महानगर ३३,१८,४८६
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.minneapolismn.gov


मिनीयापोलिस (इंग्लिश: Minneapolis) हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असलेले मिनियापोलिस अमेरिकेमधील ४८वे मोठे शहर आहे. मिनियापोलिस शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनेसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलीस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.

मिनीयापोलिसमधील मिसिसिपी नदीकाठ

शिकागो खालोखाल अमेरिकेच्या मिड-वेस्ट परिसरातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या मिनियापोलिसमधील वाणिज्य, आरोग्यसेवा इत्यादी प्रमुख उद्योग आहेत. येथील मॉल ऑफ अमेरिका हा अमेरिकेमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलपैकी एक आहे.

इतिहास

[संपादन]

फ्रेंच शोधक येथे १६८० साली पोचले. त्यापूर्वी ह्या भागात सू लोकांचे वास्तव्य होते.

भूगोल

[संपादन]

मिनियापोलिस शहर मिसिसिपी नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथील मोठा भूभाग पाण्याने व्यापला आहे.

हवामान

[संपादन]

ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे मिनियापोलिसचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. हिवाळ्यांदरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.

वाहतूक

[संपादन]

मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे.

खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
मिनेसोटा व्हायकिंग्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग मेट्रोडोम १९६१
मिनेसोटा टिंबरवुल्व्झ बास्केटबॉल टार्गेट सेंटर नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन १९८९
मिनेसोटा ट्विन्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल टार्गेट फील्ड १८९४

शहर रचना

[संपादन]
विस्तृत चित्र

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "NowData - NOAA Online Weather Data". २०११-१२-१५ रोजी पाहिले.
  2. ^ "Monthly Averages for Minneapolis, MN". २००७-१० रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Climatological Normals of Minneapolis". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-11 रोजी पाहिले.