Jump to content

मित्तल पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
মিত্তাল প্যাটেল (bn); మిట్టల్ పటేల్ (te); ਮਿੱਤਲ ਪਟੇਲ (pa); Mittal Patel (en); ᱢᱤᱛᱛᱟᱞ ᱯᱟᱴᱮᱞ (sat); মিত্তল পেটেল (as); मित्तल पटेल (mr) Indian activist (en); ناشطة هندية (ar); indijska aktivistica (hr); Indian activist (en)
मित्तल पटेल 
Indian activist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९८१
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • कार्यकर्ता
  • सामाजिक कार्यकर्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मित्तल पटेल (जन्म c. 1981 ) ह्या गुजरातमधील एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. शिक्षणानंतर, त्यांनी आदिवासी जमातीतील लोकांना समाजात समाकलित होण्यास मदत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांना भारत सरकार तर्फे २०१८ सालचा नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारकिर्द

[संपादन]

पटेल यांचा जन्म गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील संखलपूर गावात १९८१ साली झाला. त्यांचे आईवडील दोघेही शेती आणि पशुपालन करायचे. लहानपणापासूनच मित्तितलने आपल्या वडिलांना गरिबांना पैसे, धान्य आणि झोपड्या बांधण्यात मदत करताना पाहिले आहे. मित्तल यांनी देखील आपल्या वडिलांचा कित्ता गिरवला. लग्नानंतरही मित्तलने भटक्या जमातींचे काम सोडले नाही. याकामी त्यांना पती आणि सहा वर्षांची मुलगी हे आवश्यक अशी मदत करत असतात.[]

मित्तलने प्रथम भौतिकशास्त्रात पदवी घेतली. नंतर अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण केला.[] त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये स्थानिक लोकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. चार वर्षांनंतर, त्यांनी विचारता समुदय समर्थन मंच (VSSM) ची स्थापना केली, ही संस्था भटक्या लोकांना मदत करण्याचे काम करते.[] त्यांनी बावा, गडलिया, कांगसिया, मीर, नाथवाडी, सलाट आणि सरनिया जमातींसोबत काम केले. यात या लोकांना लग्न करण्यास, शाळा सुरू करण्यास, जमिनीचे हक्क मिळवण्यास आणि ओळखपत्रे मिळविण्यास मदत करणे अशी कामे करण्यात आली.[] गुजरात सरकारने २०१६ पर्यंत ६०,००० आदिवासींना मतदान कार्ड दिले होते. व्हीएसएम ही संस्था बँकेप्रमाने देखील काम करते. तसेच ही संस्था अहमदाबादमध्ये ७०० हून अधिक मुलांसाठी दोन वसतिगृहे चालवते.[] व्हीएसएमच्या सहकार्याने, कालूपूर सहकारी बँकेने १०० आदिवासींना घरे खरेदी करण्यासाठी ५०,००० रुपयांचे सूक्ष्मवित्त कर्ज दिले. तसेच लहान व्यवसायांना २५,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देखील दिले आहे.[]

गुजरातमध्ये २८ भटक्या जमाती आणि १२ विमुक्त जमाती आहेत.[] या जमाती पारंपारिकपणे चाकूला धार लावणे, कापडाचे वस्त्र विणणे, सापांचे खेळ करणे आणि दोरीवर चालणे अशी काम करतात.[] पटेल यांनी डफर समुदायाच्या लोकांसोबत देखील काम करण्यास सुरुवात केली. या समुदायातील लोकांना ब्रिटिश राजवटीत नोंदणीकृत गुन्हेगार म्हणून मानले जात असे. मित्तल यांनी या लोकांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे काम केले.[] गुजरातमध्ये ४५ ते ५० डाफर समुदाय (किंवा डांगा) आहेत, ज्यांची लोकसंख्या १८,००० आहे.[] २०१८ पर्यंत, गुजरातमधील ९० टक्के आदिवासी लोक मुख्य प्रवाहात आले होते. तथापि, पटेल यांना अजूनही आदिवासी लोकांना लक्ष्य करणाऱ्या जमावांविरुद्ध कारवाई करावी लागत आहे.[] २०१९ साली, पटेल यांची ओताराम देवासी यांच्यासोबत, नीती आयोगाच्या अंतर्गत एका मंडळावर नियुक्ती करण्यात आली. यामागील मुख्य उद्देश आदिवासी लोकांसाठी कल्याणकारी उपाययोजना सुचवणे होता.[] २०२० मध्ये, पटेल यांनी सुरनामा विनान मानवियो नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले.[] पटेल यांनी ८७ हून अधिक गुजरात मधील तलावांचे पुनरुज्जीवन केले आहे.[१०]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

मित्तल पटेल यांच्या मानवी हक्कांसाठीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानातील करण्यात आले. ८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c Chandra, Kavita Kanan (30 December 2017). "Mittal Patel has worked relentlessly to provide the nomadic and de-notified tribes of Gujarat with voter ID cards and social benefits". The Hindu (इंग्रजी भाषेत). 22 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b Dave, Harita (12 September 2020). "Mittal Patel: The Messiah for Nomadic and Denotified Tribes". Ashaval. 25 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  3. ^ a b Madhavan, N. (16 November 2015). "Bringing Nomadic Communities into the Mainstream". Moneylife (इंग्रजी भाषेत). 2 February 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Krishna, Geetanjali (21 May 2016). "A voice for nomads". Business Standard (इंग्रजी भाषेत). 26 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  5. ^ Jayaraman, Gayatri (14 February 2018). "A cooperative bank that gives loans to Gujarat's nomadic tribes based on trust". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 9 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Gujarat: Send children to schools, basic amenities assured, CM Patel tells nomadic tribes". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 14 May 2022. 28 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "Gujarat: Dafer community resolves to erase 'criminal tribe' stigma". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 December 2019. 27 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  8. ^ Das, Rathin (7 August 2018). "Giving nomads an identity". The Statesman. 28 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  9. ^ Ramachandran, Smriti Kak (15 June 2019). "Key appointments to board for denotified tribes pending". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 26 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Water warriors of India get a voice". The New Indian Express. 24 October 2019. 26 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 September 2022 रोजी पाहिले.