मिडियाविकी:संपादन गाळणी ८७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन स्विकारले गेले नाही. सहसा छाया(चित्र) संचिका विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवले जाणे अभिप्रेत असते, स्वयमेव संपादन गाळणीने आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे. विकिमिडीया कॉमन्स वरील बहुतांश छायाचित्रे मराठी विकिपीडियातही वापरता येतात, सोबत विकिमिडीया कॉमन्सवर संचिका चढवण्याचे इतरही उपयोग आहेत. विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.

विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपण स्वत: न काढलेले छाया(चित्र) आपल्याकडून अनवधानाने चढवले जात असण्याची शक्यता आहे का ? विश्वकोशास अयोग्य/प्रताधिकारीत (कॉपीराईटेड) मजकूर तर आपल्या हातून चढवला/नकलवला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी, आणि आपण स्वत: काढलेली आणि प्रताधिकारमुक्त छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवावीत हि नम्र विनंती. आपण चढवू इच्छित असलेला मजकुर आणि तत्संबंधी कारण मिमांसा संबधीत पानाच्या चर्चा पानावर लिहून इतर जाणत्या सदस्यांना आपण सहकाऱ्याची विनंती करू शकता.



आपल्या छायाचित्रास सुयोग्य प्रताधिकार मुक्ती सूचना परवाना जोडणे अभिप्रेत असते.