मालविका बनसोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालविका बनसोड
मालविका बनसोड
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव नागपूर, महाराष्ट्र
पूर्ण नाव मालविका बनसोड
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक १५ सप्टेंबर, २००१ (2001-09-15) (वय: २२)
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन
प्रशिक्षक संजय मिश्रा


मालविका बनसोड (जन्म : नागपूर, १५ सप्टेंबर २००१) ही महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील एक बॅडमिंटन खेळाडू आहे. २०१९ मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीझ बॅडमिंटन स्पर्धा [१]आणि अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका (नेपाळ) या स्पर्धांंत तिने आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवली. मालविकाने राष्ट्रीय कनिष्ठ व ज्येष्ठ गट स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

महाराष्ट्रातील नागपूर शहरात बनसोडचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. ती एक हुशार विद्यार्थिनीसुद्धा आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविले होते. आपल्या परीक्षेची तयारी करत असताना तिने आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती.

कारकीर्द[संपादन]

मालविकाला यश अगदी सुरुवातीपासूनच मिळत गेले. तिने राज्यस्तरीय स्पर्धेत १३ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील वयोगटात विजेतेपदे जिंकली. २०१८मध्ये आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशिपसाठी ती पात्रता फेरीतच अपयशी ठरली, मात्र त्यानंतर तिने सलग दोन स्पर्धा जिंकत, कॅनडामध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

डिसेंबर २०१८ मध्ये काठमांडू, नेपाळ येथे आयोजित दक्षिण आशियाई प्रादेशिक अंडर-21 स्पर्धेत ती वैयक्तिक आणि सांघिक गटांमध्ये विजेती ठरली.२०१९मध्ये तिने अखिल भारतीय सिनिअर रँकिंग स्पर्धा आणि अखिल भारतीय ज्युनिअर रँकिंग स्पर्धा जिंकली. डावखुरी खेळाडू असलेली मालविका बनसोड दोन-वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि पाच-वेळा विश्वविजेता ठरलेला चीनचा बॅडमिंटनपटू लिन डॅन याला आदर्श मानते.

वरिष्ठ  आंतरराष्ट्रीय  पदार्पण[संपादन]

नागपूरच्या या कन्येने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण सप्टेंबर २०१९मध्ये मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत केले आणि तेव्हाच या स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. [१]एका आठवड्यानंतर तिने नेपाळची अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिकाही जिंकली. [२]त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये आयोजित बाहरेन आंतरराष्ट्रीय मालिकेत तिने कांस्यपदक जिंकले. भारत आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत ती उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली. अवघ्या दोन महिन्यांत झालेल्या या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील तिच्या कामगिरीमुळे तिने जगातील अव्वल २०० खेळाडूंच्या मानांकन यादीत प्रवेश केला.[३] सध्याच्या जागतिक क्रमवारीत तिचा १३० वा क्रमांक आहे.[४]

पुरस्कार[संपादन]

मालविका बनसोड हिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील एका ना-नफा संस्थेतर्फे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार, खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट ॲथलीट अवॉर्ड आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टीओपीएस) ॲथलीट अवॉर्ड यांचा समावेश आहे.

मालविकाने मिळवलेली पदके[संपादन]

सुवर्ण पदक : मार्च २०२१ युगांडा इंटरनॅशनल[५]

सुवर्ण पदक : २०१९ची मालदीव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीज, माले

सुवर्णपदक : २०१९ची अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका, नेपाळ

कांस्यपदक : २०१९ची बहरीन आंतरराष्ट्रीय मालिका

कांस्यपदक : २०१९ची बल्गेरियन ज्युनिअर आंतरराष्ट्रीय स्पर्धा

सुवर्णपदक : २०१८ची दक्षिण आशियाई प्रादेशिक २१ वर्षांखालील स्पर्धा, काठमांडू, नेपाळ (वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ a b Sep 23, Suhas Nayse / TNN /; 2019; Ist, 10:01. "Malvika Bansod wins badminton title on international debut in Maldives | Badminton News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ Sep 29, Suhas Nayse / TNN /; 2019; Ist, 20:47. "Back-to-back international badminton titles for Nagpur's Malvika Bansod | Badminton News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ Nov 26, Suhas Nayse / TNN /; 2019; Ist, 23:18. "Malvika Bansod among world's top-200 in just two months | Badminton News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-16 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ "Malvika BANSOD | Profile". bwfbadminton.com. 2021-03-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Indian shuttlers Varun Kapur, Malvika Bansod win Uganda International titles". The New Indian Express. 2021-03-16 रोजी पाहिले.